मी मोनिका भाग #13 (अंतिम भाग)
भाग #१३ सारांश….
अपंग म्हणून जन्माला येणं हे कोणाच्या हातात नाही पण चांगलं जन्माला येऊन पण अपंगत्व स्वीकारणं आणि पदोपदी ते झेलण म्हणजे खूपच विदारक आहे…
आपण अपंग लोकांना पाहिलं की नाक मुरडतो,त्याची घाण करतो आणि तिथून निघून जातो..
आज सगळी नाती असताना पण केवळ शरीराने अपंग असणारे लाखो जण आज बेघर आहेत…
त्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी कधी ट्रॅफिक सिगनल जवळ तर कधी मंदिराबाहेर असतात..अपेक्षा एवढीच असते की आहे त्या दिवसाच एका वेळच तरी जेवण आपल्याला मिळालं पाहिजे म्हणून…
मनाची कष्टाची तयारी असली तरी शरीरच साथ देत नसेल तिथे मन तरी काय करणार….
मुलींचा अपंग असण्याचा तर अजून नराधम फायदा उचलतात आणि स्वतःची गरज पूर्ण करतात,माणुसकी हरवून गेली… माणूसच जनावर झाला….
मान्य आहे,अपंगत्व लोकांसाठी आपण काय करणार फार तर त्याना थोडी पैशाची मदत करू..किंवा कधी खाण्यापिण्याची सोय तर करूच शकतो ना…
आता थोडी का होईना परिस्थिती बदली आहे,सामाजिक संस्था आता पुढे आल्या आहेत,काम करू लागल्या आहेत,त्यांना हातभार लावून माणूस म्हणून एक जबाबदारी तुम्ही घेऊ शकता….
माणुसकी माणसात आहे,ती जपली पाहिजे,नाहीतर माणसाचं जनावर होयला वेळ नाही लागत…..
सांगण्याचं उद्देश एवढाच की,अपंग लोकांना जमेल तसं सहकार्य करा,आधीच त्यांना खूप त्रासदायक जीवन जगावे लागते…त्यात आपण ते थोडं हलकं करूयात….
सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांच्या साठी थोडं देवमाणूस होऊयात……