माझ सुख – माझे संस्कार
“#सुख म्हणजे हेच का”
“फार काही दिवस झाले नाहीत, गेल्या आठवड्यातीलच गोष्ट आहे… कदाचित तुमच्या पण घरात झालं असेल हे.. डीआयडी चा नवा सिझन चालू झाला..लहान मुलांचा आहे म्हणल्यावर…अजूनच उत्साह वाटतो,तशी माझ्या घरात पण दोन लहान मूल आहेतच आणि दोघे पण डान्स दिवाने आहेत… म्हणून सहज त्यांना मी सुचविले,ही बघा डान्स..तेवढंच मनोरंजन होईल..पण खरं सांगू त्यांना पाहायला सांगायचा मागचा उद्देश एवढंच होते की ,त्यांना आरसा दाखवायचा होता..जे मी बोलून त्यांना समजत नव्हता ना!!!म्हणून….
आणि मी स्वतः पाहिलं तेव्हा तर मी च शॉक झाले…. म्हणजे ना खरच विचार करायला भाग पडले आणि आलाय विचार डोक्यात तर थोडा तुम्हाला पण सांगावं म्हणलं” रितिका..लिहीत होती…तिच्या मनातली…
डीआयडी पाहून गोंधळून गेली होती…आणि तिच्या मुलीच्या डोळ्यातील ती आसव पाहून अजूनच अधीर झाली होती…
“काय झालं,वेदा”रितिका विचारते..
“काही नाही ,मम्मा” वेदा..
“काय सुंदर ,डान्स केला ना तिने” रितिका..
“हो ना,आणि ते पण तिने कोरिओग्राफ केलाय,कोणाच्या ही मदतीशिवाय…म्हणजे ना मला विश्वासच बसत नाही”वेदा..
“हो ना,तेवढं वेडी आहे ती डान्स साठी” रितिका…
“म्हणजे ना ,मम्मा मला माहित आहे ,की कोणतीही गोष्ट करायची म्हणली ना तरी त्या गोष्टीची आवड असणं गरजेचे आहे… आणि त्याचा तेवढ्याच आवडीने सराव पण”वेदा अगदी ,तळमळीने सांगत होती..
“हो ना,वेदा… पण तुला एवढं काय झालं”रितिका मुद्दामूनच जरा खुदवून विचारते..
“म्हणजे ना,मम्मा ” वेदा ला शब्द फुटत नसतात…काय बोलावे म्हणून…अंतःकरण भरून आले होते…
“हो ना,मला ना ती जगातील सुखी माणूस ,मुलगी वाटली..केवढ समाधान होते तिच्या चेहऱ्यावर आणि किती खुश होती ती..म्हणजे घरची परिस्थिती एवढी नाजूक असताना,कसल्याही सुख सुविधा नसताना…एक तर ती एवढा छान डान्स तर करतेच आहे पण ती मनापासून खुश आहे म्हणून कदाचित तिचा चेहरा माझ्या अजून पण लक्षात आहे…नाव नाही राहिले लक्षात..पण विलक्षण असं चेहऱ्यावरचे तेज मात्र नेहमी लक्षात राहील माझ्या…अगदी शी इज डेफिनेशन ऑफ हॅप्पी लाईफ…” रितिका पण बोलत होती अगदी ,तिला तिच्याकडे पाहून जे वाटलं ते..
“हो ना,मला पण तेच सांगायचे होते,म्हणजे…डान्स तिची पॅशन आहे…ठीक आहे…पण अग घर किती साधं आहे…पिझा म्हणून चपाती चा बनवून खातात आणि मी????” वेदा च्या थोडं जास्तच मनाला लागलं होतं..
“हो,शेवटी माणसालाच बनवते परिस्थिती गं,तिची एवढी परिस्थिती नाजूक आहे म्हणून कदाचित तिला कष्टाची किंमत आहे…” रितिका पण गंभीर होऊन म्हणते..
“हो,ना..माझ्या बड्डे ला कितीही मोठा केक असला तरी गिफ्ट नाही म्हणून मी किती तरी बड्डे खराब केलेले आठवतात मला आणि एक कप केक मध्ये खुश होणारी ती…किती आनंदी आहे ग” वेदा….
रितिका वेदा जवळ जाऊन बसते..
“तुला यातला फरक समजला तरी खूप झालं ,बाळा” रितिका वेदाचा हात हातात घेऊन म्हणते…
“मम्मा”म्हणून वेदा शांत विचारात बसते…
रितिका ही किचन मध्ये निघून जाते…
“परिस्थिती कशी पन असू दे,पण कष्ट करण्याची ताकद ही पाहिजेच अगदी लहानपणापासूनच..मग जरी तुमचा बाप जगातील खूप श्रीमंत असला तरी आणि तो जगातील खूप गरीब असला तरी देखील….एकुलता एक असला तरी पण किंवा खूप साऱ्या भावंडांमध्ये असला तरी”….
कुटुंब पद्धत छोटी आहे आणि त्यामुळे मुलाच्या अवाजवी पण गरजा पूर्ण केल्या जातात..कोणत्या गोष्टींची किंमत राहिली नाही…
पहिली पेन्सिल हरवली तरी,रडून रडून नको होयच आणि आणि किती तरी दिवस मनात राहायचं.. पण आता अस नाही राहिले…सामान्य कुटुंब म्हणलं तरी मुलांच्या गरजांना प्राधान्य दिलं जाते,अपेक्षा पण अजून तशीच असते की त्यांनी चांगला अभ्यास करावा….
पण…
“म्हणजे तिला ह्याची जाणीव आहे,ह्यातच सगळं आलं…तिला दिलेल्या सगळ्या सुख सोयीच्या मानाने आपण कुठेतरी कमी पडतोय,याची जाणीव तिला झाली होती,मग डीआयडी पाहताना का होईना,” रितिका मनातल्या मनातच खुश होती…
“उद्याचा दिवस नक्की वेगळा असेल,” रितिका स्वतःलाच म्हणाली..
वेदा ला नकळत समजत होते….
“मम्मा आणि डॅड साठी मी खूप बहुमूल्य आहे आणि मला काही कमी पडू नाही म्हणून मी जे मागेल ते मला लगेच आणून देतात पण कधी कधी त्या सगळ्याची गरज पण मला नसते,जर खरच शिकण्याची खूप इच्छा असेल तर काहीच गरज नाही ,क्लास ची पण… सुरवातीचा काळ,स्वतःला सिद्ध करूच शकतो ना.. आणि आता इंटरनेटच्या काळात तर काहीच अशक्य नाही…एवढं नक्की..” वेदाच्या डोक्याची चक्र चालू झाली होती आणि त्या विचारातच ती झोपी गेली…
आणि रितिका म्हणल्याप्रमाणे…खरोखर दिवस वेगळा होता…
“काय वेदा,आज सकाळी एवढ्या लवकर” रितिका…
“हो ना,आई ..तू ते मला योगा करण्यासाठी योगा मॅट आणली होती आणि खूप काही शिकवलं पण होते ना…मग म्हणले आहे आपल्याजवळ तर करावा वापर” वेदा म्हणाली..
“अरे वा!!! तुला योगा यावावं म्हणून मी तुला चार वर्षांची झाली ना तेव्हा पासून शिकवत होते पण नंतर तुला जस कळायला लागलं तस तू करण बंद केलं आणि मग मी पण.. काही गोष्टींना वेळ हा दिलाच पाहिजे…मी सांगून नव्हते ना पटत तुला…”रितिका..
“हो ना,एवढ्या सगळ्या सुखसोयी आहेत की काही करायची इच्छाच वाटत नव्हती मला,पण माझं चुकीचे होते” वेदा म्हणाली…
“तुला हे समजलं हेच खूप आहे माझ्यासाठी” रितिका..
“हो ,आजच पाहिले कपाट आवरते आणि मला जे फक्त हौस म्हणून मी घेतलं आहे ना ते बाहेर काढते…माझ्या जेवढ्या खरोखर गरजा आहेत ना,तेवढंच ठेवते…आणि हो ,आजपासून माझी सगळी काम मीच करेल…मला पण तर कळू दे ना…” वेदा म्हणते…
“अग, मी आहे ना.. अकरा वर्षाची तू एवढी समज आहे अजून काय हवं मला”रितिका म्हणते…
नकळत का होईना जाणीव झाली होती,दोघीना पण ..गरज नसताना बऱ्याच गोष्टी ठेवल्या होत्या..हौस म्हणून खूप काही केलं होतं…हे जवळ असावं म्हणून फक्त…या सगळ्यात कोणतेच गोल फिक्स झालं नव्हतं आणि कोणतेच कृती नव्हती… आयुष्य स्वप्नाशिवाय अर्धवट आहे ,ह्याची जाणीव त्यांना झाली होती… बेडवर पडून आणि निवांत बसून सगळ्या सुखसोयी तर मिळू शकतात पण साध्य मात्र काहीच होऊ शकणार नाही…उद्या जाऊन सगळ्या गोष्टी नव्याने करण्यापेक्षा आणि रडत बसण्यापेक्षा…कष्टाची सवय लहानपणापासूनच झालेली कधी पण चांगली…
याची जाणीव आपल्या मुलांना असंन म्हणजे प्रत्येक पालकांचं सुख असते…
आणि रितिका पण म्हणते,सुख म्हणजे हेच का????
***समाप्त***
Visit & Subscribe to My Blog..
मराठी कथा-कादंबरी-लेख – “वाचत राहा,जगण्याला प्रेरणा मिळण्यासाठी
Visit & Subscribe to YouTube Channel..