मराठी कथा-कादंबरी-लेख Blogs- Entertainment- Travel- Food

"वाचत राहा,जगण्याला प्रेरणा मिळण्यासाठी📖 Stories| Reviews| Entertainment | Greetings | Travel | Food

Uncategorized

ग्लोबल वार्मिंग- ग्लोबल बदल हवाचं

“काय गर्मी आहे “

“केवढ हे ऊन आहे”

“नकोच होतंय,उन्हात जायला,गाडीत आहे तोपर्यंत एसी चालू असतो पण खाली उतरल्यावर नको होतंय” 

“चक्कर येतेय,उन्हाकडे पाहिलं तरी”

“घरात पण नको होतंय,लाईट गेल्यावर तर” 

आता कुठे मे महिन्याला सुरवात झाली,आणि आपल्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार अधिक कडाक्याचे ऊन म्हणजे  मे महिना.. 

पण यावर्षी सगळे रेकॉर्ड अगदी एप्रिल मध्येच मोडले… सूर्याने अगदी भरभरून आग ओतली आहे आणि ह्या आगीत मात्र कोणीच वाचू शकले नाही..

शेवटी निर्सगापुढे कोण मोठं आणि कोण छोटं.. कोण श्रीमंत आणि कोण गरीब… गाव काय आणि शहर काय…. 

सगळे अगदीच समान!! 

ऊन वाढलंय नेहमीपेक्षा जास्तच,हे सगळ्यांनी अनुभवलं.. त्यातून हे दिवस पण जातील, काहींनी असा पण विचार केला असेल की एवढा महिना काढायचा,परत एकदा पाऊस चालू झाला की मग काय तेव्हा…

“ये रे माझ्या मागल्या आणि ताक कण्याच चांगल्या” असच होत आलेय आणि कदाचित असच होत राहील तर!!!

आणि समजा पावसाने ठरवलं की यावर्षी सुट्टी घेऊयता मग??? 

सगळ्यात आधी काय कराल तुम्ही?????

“इन्व्हेटर घेताल की एसी बसवताल??? कूलर असतीलच????”

इथपर्यंत प्रत्यकाचे डोकं चालत… आणि यांच्या पुढे जे जातात ते खरे निसर्गप्रेमी असतात… 

म्हणजे त्याच्या भाषेत मला समजून सांगायचं म्हणलं तर खरं!!

जागतिक विषयावर प्रश्न निर्माण होतो…

प्रत्येकाची भौतिक परिस्थिती वेगळी आहे,जो उन्हाचा पारा विदर्भात आहे तोच पश्चिम महाराष्ट्रात असेल असं नाही ना!! 

याच तर सगळ्यांना ज्ञान आहे च… 

मागच्या काही वर्षात म्हणजे जवळ जर आपण मागे दहा वर्षे गेलो तर,जागतिक तापमान वाढ… ग्लोबल वार्मिंग नुकत्याच नव्याने येत होते..त्यावेळी त्याच्यावर खूप साऱ्या संशोधकांनी पेपर लिहिले,काहींनी संशोधन पण केले.. त्यांच्यावरील उपायांवर चर्चा पण झाल्या…काही ठिकाणी अगदी त्याच्यावर काम पण झाले.. 

अगदी सगळयांना समजावं म्हणून शालेय अभ्यासक्रमात पण त्याची दखल घेतली गेली…

साधं आता जरी तुम्ही गूगल ला सर्च केले ना की काय आहे हे ग्लोबल वार्मिंग तर,अमाफ़ माहिती तुम्हाला मिळून जाईल…

आणि तेवढ्याच तप्तरतेने तुम्ही ती वाचल आणि समजून पण घ्याल….

“मी यासाठी काही करू शकणार नाही??? म्हणजे माझ्या एकट्याने काय होणार आहे???” हा विचार नक्की डोक्यात आल्या शिवाय राहाणार नाही…

अस प्रत्येक सामान्य माणसाने म्हणून म्हणून…दहा वर्षे निघून गेली… प्रत्येक उन्हाळा येतो…. कडक आग ओकत असतो…पाऊस कधी वेळेवर येत नाही…पडली म्हणजे थंडी एवढी पडते की अक्षरशः काहींना जीव गमवावा लागतो..

ग्लोबल वार्मिंग हा फक्त उन्हासाठीचा प्रश्न मुळीच नाही,हे आधी लक्षात घेतलं पाहिजे… 

वर्षाचे बारा महिने आणि त्या बारा महिन्यांत अगदी एकमेकांशी सलग्नरीत्या झालेले आहेत ते म्हणजे ऋतू,एक ऋतू दुसऱ्या ऋतुवर अवलंबून आहे.. हे समजण्याइतपत तर सगळे सूज्ञान आहेत… 

गेल्यावर्षी कोरोनाचा काळ होता..नाही म्हणले तरी सगळं बंद होते..पाहिले काही महिने सगळंच बंद होते…त्यामुळे निसर्गाने मोकळा श्वास पण घेतला होता…

विविध  माध्यमाद्वारे निसर्गाचं रूप तर पशूपक्ष्याचे तसेच वन्यजीवांचे बदल दाखवून देत होते…

कोरोना काळात निसर्ग खुश होता पण मानव जात मात्र दुःखातच होती…

म्हणून की काय लॉकडाऊन मधून जग अन लॉक झालं आणि एखाद्या पिंजऱ्यातून जंगली जनावर बाहेर येऊन जेवढा हौदोस घालावा तस च काहीच मानव जातीचे झाले..

जमेल तिथे निसर्गाच्या कुशीत सगळे फिरायला जाऊ लागले.. वाटेल ते करू लागले…

“कसलं भारी वाटत आहे ना??? कसली भारी सावली आहे?? थंड  हवा आहे… तेवढीच स्वच्छ पण.. मनाला अगदी शांतता मिळाली….”

हे सगळ्यांच्या तोंडातून निघाले नसेल तर नवलच!!! 

निसर्गाचं कौतुक करता करता,त्याला पण तुमचं गालबोट लावलाच की… खूप वेळा ऐकलं आहे अगदी सगळ्यांनी ऐकले आहे…मी आज लिहितेय.. उद्या अजून कोणी लिहीन.. मी आज सांगतेय, ते तुम्ही याआधी पण कोणी सांगितलं असणारच आणि इथून पुढे पण सांगणार…

पण ..

तुम्ही..

आधी ऐकलं असेल तर आता पर्यंत तुम्हला सवय झाली असते ना!!! आणि अजून नाही ऐकलं तर निसर्गाचा घाला तुम्हाला सोसणार नाही ना,त्यावेळी…..

प्लॅस्टिक टाकू नका,कचरा बाहेर टाकू नका… हे सगळं आता सांगायचं म्हणजे मलाच लाज वाटतेय… म्हणजे परत तुम्हीच म्हणार,

“आम्हाला कळतं हे सगळं”

“हो मला पण माहितेय तुम्हाला फक्त कळतंय वळत मात्र कुठेच नाही…फक्त कळून उपयोग नाही ना,कृतीच शून्य असेल तर…..”

जास्त काही नाही अजून!!!! 

निसर्गाची काळजी घेणं हा प्रत्येकाचा व्यक्तीगत अधिकार आहे,एक माणूस पण खूप काही करू शकतो..याची जाणीव प्रत्येकाला आहे…

बाहेर जाताना सोबत घेऊन गेलेला प्लॅस्टिकचे कागद ,बाटल्या किंवा खाण्यापिण्याच्या पॅकेटआणि बरच काही…जंगलात इतर कुठेही टाकून न देता…एखाद्या कचराकुंडीत टाकलेला कधी पण चांगलंच आहे ना!! प्लॅस्टिकचा कचरा जाळंण म्हणजे त्याची विल्हेवाट लावली असं होतं नाही,त्याच्या ज्वलन केल्यानंतर त्यांच्यातील विषारी घटक हवेमध्ये मिसळून हवा दूषित केली जाते….

म्हणून कचराकुंडीत कचरा टाकावा,सगळ्यात म्हतवाचा म्हणजे अविघटनशील तरी.. त्याच्यावर योग्य प्रक्रिया केली जाते…जास्तीत जास्त तुम्ही घरी घेऊन जरी आला आणि  घरातील कचऱ्यात जरी तो टाकला तरी महानगरपालिका त्याची योग्य ते विल्हेवाट लावते आणि हवेत होणाऱ्या प्रदूषणाची काळजी घेतली जाते…

हा खूप पुढचा विषय आहे, सध्या एवढंच की कचरा हा काहीही झालं तरी कचराकुंडीत च गेला पाहिजे!!!

Vani Murthy

एकटी व्यक्ती काय करू शकते याचा उत्तम उदाहरण आहे त्या म्हणजे वाणी मुर्थी… त्यांना तुम्ही पहिलच असेल… कचऱ्यापासून कंपोस्ट बनवण्यापर्यंत चा त्यांचा प्रवास..त्या करू शकता पण आपण का नाही????

आणि सगळ्यात आणि सगळयांना माहीत असलेले म्हणजे वृक्षारोपण!!! 

जूण झालाय हो हे सगळं आता,झाड फोटो पुरती लावली जातात,काही वेळा तर अस पण होते एकच खड्डा आणि दरवर्षी वेगळं झाड!!!

अगदी थोडक्यात सांगायच झालं तर,हवे मध्ये जास्तीत जास्त कार्बनडायऑक्साईड चे प्रमाण वाढलं तर नक्कीच त्याच्यासोबत इतर ही विषारी घटकांचे प्रमाण वाढले जाते आणि तापमान वाढत जाते…आणि या सगळ्यावर एकाच रामबाण उपाय आहे तो म्हणजे वृक्ष लागवड.. आणि त्याचे संगोपन… 

जास्त काही नाही पण एक भाग किंवा जिथे मोकळी जागा आहे आणि तिथे शक्यता आहे की इथे जर आपण वृक्ष लावले तर नक्की येतील… असं अगदी कुठेही… 

झाड लावण जेवढं छोट काम आहे तेवढंच त्याची काळजी घेणं आणि त्याला वाढवण आहे…

वृक्षप्रेमी अगदी त्याच्या घरात …जास्तीच जास्त गॅलरी किंवा काही जण बाहेर खाली पण झाड लावतात.. 

पण शक्यतो देशी झाडांची लागवड करणं तेवढंच गरजेचे आहे… 

“असं मनात पण आले असेल की, माझ्या एका झाडाने थोडी ना जंगल ऊभ राहणार आहे…पण जर एक पेक्षा जास्त झाड लावली तर अर्थातच जंगल होईल… आणि जंगल बनवण्याचे काम तर पशुपक्ष्यांचे आहे ना!! त्यांनी खाल्लेल्या फळांपासून त्यांच्या विष्टेमधून लागवड होते अगदी नैसर्गिकरित्या… सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानव जातीपेक्षा पशुपक्षी जास्त निसर्गाचं संवर्धन करतात आणि त्याची काळजी पण घेतात.. 

त्यावर आपण जगतो ,हे विसरता कामा नाही…

जर ठरवलं की जंगल बनवूयात तर… 

तर हो,असच ठरवलं… 

Aadity Singh

आदित्य आणि पूनम सिंग यांनी अगदी राजस्थानमधील रणथंबोर नॅशनल पार्क जवळील,म्हणजे त्याच्या जवळचा परिसर आज जंगल बनवून टाकलाय… अर्थातच या सगळ्या साठी त्यांना जवळ जवळ दहा वर्षाची मेहनत आहे… ठरवलं तर खरंच काय करू शकतो याच उत्तम उदाहरण आहेत,बंजर जमिनीला त्यांनी एक जंगलाचे रूप दिले,हे तेवढंच खरं आहे…

थोडक्यात काय तर….

आता वेळ आली आहे..स्वतः पाऊल उचलण्याची…. अगदी नैतिक जबाबदारी झाली आहे निसर्गाचा कहर थांबण्याची…निसर्गाचा ऱ्हास असाच वाढत राहिला तर भरून न निघणारे नुकसान होईल आणि त्याची भरपाई मात्र कशानेच होणार नाही…

संयम ही तेवढाच गरजेचा आहे,मी झाड लावेल तर मला याचा काय उपयोग होणार म्हनून विचार करत बसण्यापेक्षा… हे झाड मी लावलाय याच समाधान कधी पण जास्तच आहे…

देताना सगळ्यांना सारखाच देतो निसर्ग मग तुम्ही पण त्याला वाढवण्याचा आणि जोपासण्याचा प्रयन्त करायला काहीच हरकत नाही ना…

कारण…

“आजची एक छोटीशी सुरवात उद्याचा मोठा इतिहास असतो”

म्हणून…

“एक पाऊल उचलाच…वाढत्या उन्हापासून… अवेळी पडणाऱ्या पावसापासून…आणि कडकडित थँडी पासून वाचण्यासाठी…विविध होणाऱ्या बदलांसाठी”

“हा सगळा घाट म्हणजे ऊन खरंच सहन होईना झालाय!!”

Share to ....
0 0 votes
Article Rating

Leave a Reply

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x
%d bloggers like this: