सवयी- Habits!!
सवयी..
सवय म्हणजे नेमकं काय??
एखादी गोष्ट रोज करत राहणं अगदी न विसरता,न चुकता… वारंवार करत राहणं..
त्यालाच थोड्या दिवसात नाव मिळत ते म्हणजे “सवय”
सवयीची गोष्टच पण न्यारी असते.. एकदा लागली की लवकर सुटता सुटत नाही.. एका सवयीचे परिणाम पण तेवढेच असतात..
सवय चांगली;परिणाम चांगला..
सवय वाईट अर्थात;परिणाम वाईट..
“अंगार,रोज न चुकता अगदी न चुकता सकाळी उठल्या उठल्या व्यायाम करतो..
मग ते जिम असो किंवा फक्त चालणं.. त्याची सकाळ व्यायामाने होते..
जस तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही अगदी तसच.. एखादी गोष्ट एकदा केली की त्याचा परिणाम पण लगेच मिळत नाही ना!!
अंगार कडे पाहून त्याची शरीरयष्टी पाहून, किती तरी जण लगेच इम्रेस होऊन व्यायामाचे फॅड डोक्यात घेतात.. एक-दिवस दोन दिवस करतात आणि काहिच होत नाही म्हणून परत.. सोडून देतात..
अस नाही ना ,होत म्हणून उगाच म्हणत नाहीत की सवय पाहिजे एखाद्या गोष्टीची म्हणजे त्याचा रिझल्ट मिळतो..नाहीतर त्याचा काहीच उपयोग होत नाही….”
हे झालं अंगारच आणि चांगल्या सवयींचे पण वाईट सवयीचे काय…
“एक पाऊल जरी वाईट सवयी कडे पडलं तर त्याचे गुलाम झाल्याशिवाय राहत नाही.. काय पण विशेष असते ना,वाईट सवयच खूप छान वाटतात.. म्हणजे मेंदूच्या ग्रंथीला पण भारी वाटते आणि त्या करायला पण त्याचे परिणाम मात्र वाईटच होतात..एखादी सवय लागते तेव्हा त्याचा विचार कोणीच करत नाही..त्याची एवढी रोजच सवय होते आणि सवयीचे रूपांतर व्यसनामध्ये कधी होते हे समजतच नाही..
“सुशांत नाही..तसा सामान्य कुटुंबामधील पण झाली त्याची ओळख एका ग्रुपशी,तिथे रोजच मजा आहे आयुष्यात म्हणून मस्त मध्ये राहतो.. पण हे मजाचे आयुष्य किती क्षणभंगुर आहे याची जाणीवच त्याला झाली नाही..रोज मजेतच दिवस घालवायचे…मस्त गप्पा मारायच्या..आयुष्यत थ्रिल पाहिजे म्हणून कधी कधी मस्त मध्ये सिगारेट ओढायची तर कधी दारूची बाटली.. तर कधी अजून काही…
पण त्याचा अतिरेक एवढा झाला की त्याचे परिणाम एका वाईटच मार्गाने चालू राहिले.. आयुष्यची माती होयला वेळ लागला नाही….”
म्हणून तर सवयीचे हे असते…
अजून पुढे जाऊन सांगायचे म्हणलं तर, चांगल्या सवयी लावायच्या म्हणलं की थोड्या त्रासदायकच वाटतात…जस रोज सकाळी उठून व्यायाम करण आणि रोज मजेत बेडवर झोपून राहणं यातील सगळ्यात आवडीची गोष्ट म्हणाल तर सगळ्यांच्या नाही पण बहुतेक जणांची बेडवर पडून राहनच पसंद करतील…
चांगल्या सवयींना कष्ट लागते तर वाईट सवयी आपोआप लागतात… परिणाम मात्र उलटे येतात…
कुठलीही गोष्ट असो,त्याच्या अधीन जाण्यात मजा नाही… चांगल्या सवयी लावत्या आल्या तरी त्या टिकवून पण ठेवता आल्या पाहिजेत आणि वाईट सवयी वेळेच्यावेळी सोडता पण आल्या पाहिजेत..
चला तर मग तुमची एक चांगली सवय सांगा आणि एक बदलावीशी वाटणारी गोष्ट कंमेट करून नक्की सांगा….