अबोल हे प्रेम माझं भाग# १
💞भाग# 1💞
“आई ,तुला नक्की बर वाटत आहे ना?”
“हो ग, नको काळजी करू”
“डॉक्टर, कधी येतात आता त्यांची वाट पाहता पाहता नको झालाय”
“माझ्यामुळे तुला पण इथे थांबावं लागतंय तुझा अभ्यास आणि प्रॅक्टिस पण बुडतेय ना”
“आई, अगं तुझ्यासाठी काही नाही ग,आणि माझ्यावेळेवर तुझा पहिला अधिकार…. आणि अस परत म्हणू नको…”
“हो ग,माझी राणी”
“तुला काय खाऊ वाटतंय का??”
“नाही नको”
गाथा तिच्या आईसोबत गिरीधर हॉस्पिटल मध्ये आली होती…तिच्या आईला बर वाटत नव्हतं आणि नेमकं काय झालंय,हेच समजत नव्हतं.. त्यामुळे सगळ्यांच्या सल्ल्याने तिला हे हॉस्पिटल सुचविले होते.. ती प्रतीक्षा कक्षामध्ये वाट पाहत असते..
गाथा,दिसायला सुंदर,चाफेकळी सारखे नाक,गुलाबी नाजूक ओठ आणि ओठावर नाकाच्या बाजूला गालावर तीळ,लांबसडक केस आणि बांधा अगदी नाजूक पण व्यायामाने कमावलेली फिगर..बोलके डोळे..स्टायलिश लुक.. आणि गावाकडे आली तरी तिथेच मिसळून जाणारी.. तिचा गोरा रंग बिलकूल सावळा झाला होता. आणि हो आपली गाथा लवकरच डॉक्टर बनणार होती.. आणि तिची इंटरशीप पण चालू होणार होती पण आई च्या तब्येतीमुळे तिने थोडं थांबनच पसंद केलं होते..
बसून बसून पाय मोकळे करावेत म्हणून गाथा उभी राहते..
“आई,अजून वेळ आहे मी बाहेर चक्कर मारून येते”
“हो ये,लांब जाऊ नको पण ”
“अग, इथेच पोर्च मध्ये आहे, तू आवाज दिला तरी मी लगेच येईल”
“हा,मग ठीक आहे”
गाथा तशी उठून बाहेर येते..सहजच आता गाथा डॉक्टर होणार म्हणल्यावर सहजच परिसर न्याहाळत होती.. पण तिने नक्की ठरवलं होतं की इंटरशिप ही पुण्यालाच करायची म्हणून..पण असतेच ना,पाहायला काय जातंय म्हणून सहज बाहेर ती सगळं अगदी शांतपणे न्याहाळत होती.. तशी तिची नजर समोर गेली..
“एक पांढऱ्या रंगाचे क्रेटा येऊन उभी राहिली….जेवढ्या वेगाने ती आली होती तेवढ्या वेगाने ती थांबली…पण त्यातून कोणी बाहेर आले नाही.. तशी तिची उतुस्कता अजूनच वाढली.. क्रेटा गाथा च्या आवडीची कार होती त्यामुळे तर अजूनच ती पाहत होती नेमकं गाडी मधून कोण उतरतेय ते….
पाच मिनिटं होऊन गेले पण कोणी उतरलं नाही..
पण गाडी आली म्हणल की दोन -तीन नर्स मात्र आल्या होत्या…हातात फाईल होत्या… आणि थोड्या टेन्शन मध्येच दिसत होत्या..
“म्हणजे डॉक्टर असतील,” गाथा म्हणाली…
आणि तेवढ्यात स्टेचर पण घेऊन आला,वार्ड बॉय आला…
मग डॉक्टर नसेल मोठे कोणी व्हिआयपी पेशंट असेल… अस तिला वाटलं…
अजून बाहेर येईना,झाल्यावर ….तिने पण जाऊदे म्हणून नजर फिरवली…
आणि दरवाज्याचा आवाज आला..आणि आपोआप तिची नजर पुन्हा क्रेटाकडे गेली…
तिला पाहिले पाय दिसले..मुलगा होता… वर पाहिलं तर अगदीच चिकाना होता..रंग अगदी गोरा..नाकाची चाचेचाच.. उंची सहा फूट.. शरीरयष्टी अगदी हिरोला पुरून उरेल अशीच…. चेहऱ्यावर तणाव पण अगदी शांतता…
कितीही पाहिलं तरी नजर काही हटत नव्हती..
गाथा ला आजूबाजूचा जणू सगळा विसरच पडला…
त्याच्या बद्दल जाणून घेण्याची अतोनात इच्छा झाली होती…गाथा त्याला पाहताच क्षणी जणू त्याची झाली होती… कोणताच विचार तिच्या डोक्यात येत नव्हता..फक्त तो आणि तो… कोण असेल तो?? पेशंट का डॉक्टर?? का,ट्रस्टी…त्याच नाव समजेल का??? त्याच्याशी कधी बोलणं होईल..हेच सगळं डोक्यात होते.. त्याला पाहून ती अजूनच खुश झाली.. बस्स, त्याच्याशी बोलायचंय ,त्याला जाणून घेयचय…
“गाथा ,गाथा…”
“आई ,अग तू बाहेर का आली???”
“तुला किती वेळ आवाज देतेय,कुठे पाहत होती”
गाथा ने समोर पाहिलं तर,क्रेटा पण नव्हती आणि तो हँडसम चार्म पण नव्हता…
“काय झालं गाथा”
“काहीच नाही,चल..आले ना डॉक्टर…”
“हो आलेत,चल”
गाथा स्वतः शिस मान हलवत निघून गेली…
“वेडी आहेस का, तू गाथा..काय पण त्याच्या नादी लागतेय..साधं पाहिलं पण नाही त्याने….आवडला पण आपल्याला…..” गाथा विचारात हरवून गेली…