अबोल हे प्रेम माझं भाग# 2
💞भाग#2💞
“आई डॉक्टर ने ह्या गोळ्या दिल्यात,त्याच म्हण आहे की आपण आधी सगळे उपाय करून पाहू आणि मग ऑपरेशन करूयात…त्यामुळे वेळेवर सगळं करूयात,तुझी सगळे उपचार झाल्याशिवाय मी जात नाही”
“अग, तू जा…. अवि आहे ना,येईल मी त्याच्यासोबत”
“नको आई,”
गाथा स्वतःशीस हसत म्हणाली..
वेध जे लागले होते ना ,त्या हँडसम चार्म चे..कोण आहे हे समजल्याशिवाय तिला चैन पडणार नव्हती..
गाथा ला जणू त्याने झपाटले होते…बस त्याची जाताना एक झलक मिळावी एवढीच इच्छा होती…
“आई,मी आले मेडिकल मधून,तू इथेच थांब”
“बर, जा लवकर”
“हो ग”
मेडिकल मधील काम संपवून तीने पुन्हा बाहेरचा परिसर न्याहाळत बसली..नजरेखालून सगळं तिने घालवले पण काही दिसलं नाही…..
“पार्किंग मध्ये पाहून येऊ का??म्हणजे क्रेटा असेल तर तो असेल ना इथेच?? ” त्याच विचारात गाथा पार्किंग मध्ये पळत गेली..
पण तिथे गेली तर…
“यार,ह्या मध्ये आता ती क्रेटा कोणती त्यामधून माझ्या हिरोची एन्ट्री झाली होती…. काय करू,समजत नाही मला…इथे तर पाच क्रेटा आहे…त्यात नंबर पण माहीत नाही क्रेटा चा…. काय तू पण .. डॉक्टर मॅडम अस नाही चालणार..” गाथा स्वतःशीस बोलत होती…
तेवढ्यात फोन वाजला आणि फोन वर…
“आई”
“ओह,नो”
अस म्हणून गाथा पळतच माघारी गेली…
“अग, कुठे राहिले होतीस, चल पटकन घरी मला चक्कर आल्यासारखं होतंय”
“हो,आई चल मी गाडी काढते”
गाथा ने तिची इंडिका काढली आणि आईला घेऊन घरी जायला निघाली..
गाथा शांत विचारात होती… त्याच्या बद्दलची खूप उत्सुकता मनाला बैचेन करत होती… ती शांत बसून होती..
“गाथा,काय झालं ,कसला विचार करतेय”
“काही नाही,अग आई”
“मला न बोलता पण कळत माझ्या मुलीची गाथा”
“काय आई ,तू पण”
“मग सांग ना बाळा,काय झालं”
“आई ..म्हणजे मला माहित आहे.. आपण चांगल्या मैत्रिणी आहोत म्हणून.. तरी पण.. “
“बोलशील का”
“आई,मला मघाशी एक मुलगा दिसला म्हणजे मी पहिल्यांदा त्याच्याकडे पाहिलं आणि मला वेगळंच वाटलं आणि पाहतच राहावं वाटलं… बस एवढंच फक्त”
“अरे वा.. म्हणजे जावई भेटले तर”
“अग, आई ..तस काहीच नाही..जस्ट पाहताच क्षणी आवडले..जस ताजमहल आवडतो अगदी तसंच…नाव ही माहीत नाही.. आणि काय जावई म्हणे”
गाथा थोडं लाजत आणि मान हलवत म्हणाली..
“बर, बाई जस तू म्हणशील तस…होत असे कधी कधी..काही व्यक्ती असतात अशा ज्या पहिल्या भेटीत छाप पाडून जातात आणि थोड्या वेळे साठी का होईना..पण मनाला वेड लावून जातात”
“हो ना,तसच काहीसं..”
“आणि काय ग गाथा,पुन्हा भेटला ना तर नाव आणि गाव विचार..आई म्हणून बोलणी करेल..जर मला आणि तुझ्या बाबाला आवडलं तर”
“काही ही काय आई”
“हो का”
गाथा आणि तिची आई पहिल्यापासून अगदी.. ज्यावेळी ती आई झाली तेव्हा पासून..त्यांनी गाथाची मैत्रीण जास्त झाली होती…
आपल्या मुलीने आपल्या पासून काहीच लपवल नाही पाहिजे म्हणून तिने घट्ट अशी मैत्रीची वीण केली होती… एकवेळ आई मागे पडेल पण मैत्रीण कधीच नाही..असच नात आईने गाथाशी जोडलं होते..
आणि गाथा पण पहिल्यापासून जे असेल ते बोलून रिकामी होत होती,तिने कधीच.. काहीच लपवल नव्हतं काहीच..जे असेल ते पहिले आई आणि बाबा..
असंही, पालक आणि पाल्य यांच्यामधील उत्तम उदाहरण म्हणजे गाथा आणि तिचे पालक!!!
आई ने ही ,जास्त विषय काढला नाही.. गाथाने सांगितलं आहे तर मग नसेल काही… जस्ट आवडले असेल तिला.. आणि तसाही तिला टायगर श्रॉफ पण आवडतोच की मग काय ती काय त्याच्याशी थोडी ना लग्न करणार आहे लगेच..
आईच्या मनात विचार चालू होते..आईच्यातील मैत्रीण आईपणाला समजावत होती…
“आलो,चला उतरा.. आईसाहेब हळूच”
“हो डॉक्टरिनबाई”
गाथा गाडी लावते आणि घरात जाते..
सगळ्याच्यात तिला आता विसर पडून जातो..
रात्रीचे जेवण झाल्यानंतर..गाथा निवांत टेरेस वर झोपते..
“कोण असेल तो… मोठ्या घरचा दिसतोय.. पाहून वेड लावून गेला.. पण का आवडला मला.. पण आता मला क्रेटा पण आवडायला लागली आहे… राव… वेड करून सोडलय ह्याने… बस…एकदा भेट होऊ दे… खरचं.. फक्त एकदा…
गाथा,आवर स्वतःला…आवडलेली प्रत्येक गोष्ट..मिळतेच अस नाही.. सो सोडा विचार आणि मिळतोय तेवढा वेळ अभ्यास करा”
गाथा स्वतःशिस बोलत होती..
गाथाच्या विचार जात नव्हता डोक्यातून..काही केलं तरी तिला तो फक्त हँडसम चार्म दिसत होता….
आज पाहिल्यानंदा गाथाला एवढं वेड लागले होते….
आणि आज तो तिच्या मनावर आणि डोक्यावर वरचढ ठरत होता…
त्याच विचारात ती झोपी गेली..
भेटेल का तिला तिचा राजकुमार…का फक्त स्वप्नातच..