अबोल हे प्रेम माझं भाग# 3
💞भाग#3💞
आवडलेली प्रत्येक गोष्ट आपल्याजवळ असावी ,अस काही नाही.. या मताची गाथा होती…
आणि कोणी आवडलं तरी ती अगदी मनमोकळे प्रमाणे कौतुक करायची…
आणि तिथेच विषय सोडून देत असायची…
पण या वेळी थोडं वेगळं झालं होतं…
गाथा च्या मनातून त्यादिवशी हॉस्पिटलमध्ये फक्त दिसलेला मुलगा अगदीच भुरळ घालून गेला होता….
“काय झालंय मला,म्हणजे या आधी तर मला कधीच अस झालं नाही मग आताच का??? म्हणजे ठीक आहे तो खूप खूप हँडसम आहे,पण मी का विचार करतेय त्याचा एवढा…
मला यातून बाहेर पडल पाहिजे आणि आता अभ्यास करून इंटरर्शीप चा विचार केला पाहिजे” गाथा स्वतःशिस बडबड करत होती..
“काय ,दि कशात गुंग आहेस” अवि..
“काही नाही रे,बोल ना”
“सहज, तुझा अभ्यास इथे होत नसेल तर तू जा पुण्याला हॉस्टेल ला..आईची घेईल मी काळजी”
“अरे,अवि … अस काही नाही…. पण ना आईला अस ठेवून मन पण नाही लागणार माझं बघ तिथे”
“हो,कळतंय मला पण तुझ्या स्टडी पण तर म्हणत्वचा आहे ना मग”
“बर, मग अस करते एकदा एम.आर.आय आणि सि. टी. स्कॅन झाला ना की जाईल मी ”
“बर,जस तुला ठीक वाटलं तसं”
गाथा ने शेवटी तिथेच थांबायचं निर्णय घेतला..
अवि थोडा पुढे जाऊन परत गाथा कडे माघारी येतो…
“का रे,काय विसरलास का???”
“अग, पण ह्या सगळ्या टेस्ट कधी करायच्या आहेत म्हणजे मी पण आलो असतो तुमच्यासोबत”
“तस विचारलं नाही रे मी,डॉक्टर ला.. ते म्हणालेत मेडिसिन संपल्या की या”
“ठीक आहे”
“हो, आणि अस पण मेडिसिन फक्त तीन च दिवसाच्या आहेत…”
“मग आपण जाऊयात परवा मी पण वेळ काढतो”
“येस माय ब्रो”
अवि खाली निघून जातो….
गाथा पुस्तक उघडते आणि वाचायला घेते पण काही केल्या तीच लक्ष काही लागत नाही..
सहज बुक बाजूला ठेवते आणि गूगल वर क्रेटा चे फोटो पाहत बसते..
काय तर क्रेटा….
सगळे कलर पाहत बसते.. जणू आता गाथा ला क्रेटा घ्यायची का???
“झाला का अभ्यास”
“अग, आई तू?? वर कशाला यायचं मी आले असते ना खाली…काय त्रास होतोय का तुला” गाथा आईला खुर्ची बसायला देतच विचारते…
“त्रास कसला ग त्यात मला, तू काय पाहत होती मोबाईल मध्ये” आई..
“काही नाही,क्रेटा चे फोटो पाहत होते” गाथा..
“का ग,आवडली का गाडी तुला?? ” आई…
“नाही ग,जस्ट पाहत होते” गाथा…
“हो,पण तू डॉक्टर झाली ना की मी च तुला गिफ्ट देईल की गाडी ,मग तर झालं” आई..
“अग, आई तू पण ना!!! ” गाथा आईच्या गळ्यात जाऊन पडते..
“काय झालं गाथा.. म्हणजे डिस्ट्रब आहेस का??? कशाचे टेन्शन आलाय का?? माझं ऐकशील… भरकटलेले मन जागेवर घेऊन ये आणि अभ्यासावर फोकस कर… नशिबात असलेली गोष्ट मिळून जातेच ग,पण ती नशिबात असायला हवी ना” आई सांगत असते…
गाथाच्या डोळ्यावर त्या हँडसम ची पट्टी होती ,ती खाडकन पडते…तिला कळते… कोण तो आणि कोणासाठी आपण आजचा अर्धा दिवस वाया घालवला… गाथा तिच्याच विचारात होती…
“काय झालं गाथा.. मी काय बोलले ते समजलं ना!!!आधी डॉक्टरी आणि नंतर क्रेटा…. ” आई म्हणते….
“अग, आई खरंच सॉरी…पण खरच थँक्स… म्हणजे ना….”गाथा आईला सगळं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करते.. पण ..
“अग वेडा बाई…मी तुझी आधी मैत्रीण आहे ना मग.. तू न बोलता ही सगळी समजून जाते मला…. नको विचार करू जास्त” आई….
“हो आई…पण ना आई तस काही नाही पण” गाथा…
“मी पण तुझ्या वयातून गेले आहे बाळा… माझ्यापेक्षा जास्त कोणाला समजणार ना???”आई गाथाला जवळ घेतच म्हणाली…
“बर चल मी खाली जाते… तू पण चल … आणि मला तुझी भन्नाट कॉफी करून दे”आई गाथाला म्हणाली..
“हो,आई हो पुढे तू.. मी बुक्स आवरून आले”
आई खाली निघून जाते.. आणि गाथा बुक्स आवरून घेते…
“माझं खरंच चुकतंय…आज अर्धा दिवस वाया घालवला.. तो माझ्यासाठी एवढा म्हणत्वचा का झाला?? मी सारखा विचार नव्हता करायला पाहिजे… अस पण नशिबात असेल तर नक्की तो भेटेल मला.. आता त्याचा चापटर माझ्यासाठी बंद… आता फक्त अभ्यास आणि अभ्यासच”…
स्वतःला मनाला सावरत आणि आवरत गाथा खाली निघून येते….
गाथा ने तिचा फोकस आता फक्त अभ्यासावर केला होता..
गाथा सगळ्यासाठी कॉफी घेऊन येते…
मस्त सगळेजण गप्पा मारत कॉफी घेत असतात…
गाथा त्याच्या घरात पहिल्यांदा डॉक्टर होणार होती…आणि.. त्याच्या घरातील गाथा ही एकच मुलगी होती….त्यामुळे तिचे लाड आणि हौसमौज पण खूप होत असते…
“डॉक्टरिनबाई….डॉक्टर झाला ना आता?? ? मग लग्नाचा बार उडवून टाकूयात” आजोबा म्हणाले..
“अहो ,आजोबा अजून इंटरशीप राहिली आहे ,मग आपली दि झाली डॉ. गाथा देसाई.” अवि अगदी अभिमानाने सांगत होता…
“हो मग ,मुलगी कोणाची आहे.. आणि गाथा.. मी माझं वचन पाळलं आहे आणि आता तुला पण तुझा शब्द लक्षात आहे ना????” गाथाचे बाबा म्हणतात..
“हो ,बाबा..आहे माझ्या लक्षात”गाथा….
गाथा पुढे काही न बोलताच निघून जाते… आणि बाबांचे वचन असताना पण मी क्रेटा चा एवढा का विचार करतेय… काय वागतेय मी…
“म्हणजे मला बाबा पुण्याला पाठवत नव्हता कॉलेजला पण मी बाबांना खूप विश्वासात घेऊन आणि माझं म्हणणं पटवून देऊन कसंबसं मी पुण्याला गेले..एवढ्या वर्ष पुण्यात राहून पण मला कधी कोणाची भुरळ नाही पडली मग ही क्रेटा का??? आई सांगत होते ते बरोबर आहे.. काही ही झालं तरी पहिले डॉक्टर..मध्येच काय झालं तर बाबा… मला इंटरर्शीप पण करून देणार नाही… नाही असं काही होणार नाही… तसं गाथाच्या अंगावर काटा येतो.. आणि तिला नकळत जाणीव होती… हॉस्पिटलमधून आल्यापासून आपण फक्त आणि फक्त क्रेटा च्याच मागे आहोत… आता मनाला सांभाळत कसंबसं ती अभ्यासाला लागते आणि मन बळजबरीने लावून अभ्यास करते”
गाथाच्या डोक्यात तोच विचार होता… थोडं मेडिटेशन करून तीने खर केला अभ्यास…..
पण तो जर खरच नशिबात असले तर मग???
गाथा ने डोळे झाकले आणि पुन्हा त्याचा चेहरा समोर आला…
“काय झालंय मला हे,मला खरंच समजत नाही.. उद्या हॉस्पिटलला भेटला तर मग परत??? पुन्हा माझ्या डोक्यात तेच विषय चालू होतील ??? पण कशावरून तो मला पुन्हा भेटेल… आणि काय त्याला फक्त पाहत बसणार आहे का?? म्हणजे मला तो फक्त तो आवडतोय जस मला टायगर आवडतो तसाच मग एवढा काय विचार त्याचा…त्याच दिसन एवढं गोड आहे त्याची स्टाईल आणि तो.. आणि क्रेटा… गाथाच्या चेहऱ्यावर नकळत स्मित हास्य आलं आणि त्याच स्वप्नांत ही हरवून गेली आणि नकळत बाबांना दिलेले वचन पण विसर पडला….
“गाथा झोपली की नाही अजून पाहून येते” आई बाबांना म्हणते..
“वाचत असेल अजून?? ” बाबा म्हणतात…
“आणि काय हो,असं काय वचन मागितली आहे तुम्ही तिच्याकडून ते,वचन चे नाव ऐकून ती लगेच गेली” आई विचारत असते…
“काही नाही असं काही खास..तिच्यासाठी तिची डॉक्टरी म्हणतवाची आहे तर माझ्यासाठी तीच संपूर्ण आयुष्य.. मला नेहमी वाटत असते जो आपण स्ट्रगल केलाय तस आयुष्य नसावं तीच…. तिने अगदी राणी सारख जगावं… तुला सांगू का?? मला तर वाटतच नव्हतं ग की तिने डॉक्टर बनाव म्हणून ,दुसर काहीही केलं असते तरी चाललं असते ग… आता डॉक्टर झाली की तिला पुन्हा हॉस्पिटल ला रोज तिला प्रॅक्टिस ला जावं लागणार… घर आणि हॉस्पिटल यात तिची खूप फरपट होईल ना ग?? नाजूक फुलासारखे वाढवलंय”
“गाथाचे बाबा… आवरा स्वतःला काय विचार करून बसलाय… आपण आपल्याला मुलीला फुलासारखे नक्की वाढवलंय …पण तिला आपण अगदी लहानपणापासून स्वावलंबी बनवलंय.. तिला लढयाला शिकवलंय आणि काय माहिती… आपण तिच्या आयुष्याला तर पुरणार नाही ना ,मग असा कसा विचार करता तुम्ही,उलट ती तिच्या स्वतःच्या पायावर उभी राहील…स्वावलंबी राहील.. स्वतःचे आयुष्य स्वतः जगेल… उद्या जरी तिच्या आयुष्यात कितीही मोठं संकट आले तरी ती तेवढ्याच हिमतीने त्याला उत्तर देईल… यावेळी मात्र तुम्ही चुकीचा विचार करताय गाथाचे बाबा,याच कारण कळेल का मला” गाथाची आई विचारते…
“हो,तुझं खर आहे,बाहेर पाहिलं ना की बातम्या… लोकांची वाईट वृत्ती मग नको होयला होते बघ….मनाची जळफळाट होते… आपली गाथा नेहमी आपल्याजवळ असावी… बाकी काही नाही…. माझं मन च भरकटल ग!!!… तू म्हणतेस तसंच बरोबर आहे…. गाथाला अजून हिमतीने वाढवलं पाहिजे… चुकलंच माझं… चला झोपा आता उद्या हॉस्पिटलमध्ये जायचं आहे ना.. आणि राहू द्या आता गाथा झोपल्या असतील केव्हाच!!”
“हो,हो… नाही जात आता… झोपुयात”…..