मराठी कथा-कादंबरी-लेख Blogs- Entertainment- Travel- Food

"वाचत राहा,जगण्याला प्रेरणा मिळण्यासाठी📖 Stories| Reviews| Entertainment | Greetings | Travel | Food

कथामालिकाप्रेमकथा

अबोल हे प्रेम माझं भाग# 4

💞भाग# ४💞

“झालं का अवि???? ” गाथा विचारते…

“हो,फक्त पाच मिनिटं.. आई आणि तू बाहेर ये तो पर्यन्त” अवि म्हणतो…

“आई ,सगळ्या फाईल.. रिपोर्ट्स… अजून तुला थोडं खायला घेतलं आहे… अजून काय हवं आहे का तुला” गाथा सगळं पुन्हा चेक करतच विचारते…

“नको बाळा,चल” आई…

“गाथा… काहीही झालं तरी लगेच मला कळव.. माझं काम झालं की मी पण  लगेच तुला येऊन भेटतो….”गाथाचे बाबा म्हणाले….

“हो बाबा,चल आई…येतो आम्ही” गाथा आई ला घेऊन बाहेर आली…

गाथाच्या डोक्यात पुन्हा विचार आला… जर आज पण क्रेटा दिसली तर… आणि तो डॉक्टर नसून पेशंट असला तर….इथे नसेलच तर… आज जर तो भेटला तर मग समजायचं का तो माझ्या नशिबात आहे म्हणून… मला मनापासून त्याची ओढ लागली आहे… काही नाही माझ्या मनात फक्त त्याला पहायची इच्छा आहे… मन भरून ते पण… ” गाथा तिच्याच विचारत असते आणि बघता बघता हॉस्पिटल आले…

गाडीतून उतरल्या उतरल्या गाथा पाहिले क्रेटा आहे का पहाते… पण तिथे क्रेटा पण नसते आणि तिचा हँडसम चार्म पण….

“दि,तू आईला घेऊन जा,मी पार्क करून येतो” अवि…

“हो” 

“मॅडम,डॉ.देशपांडे यांना भेटायचं आहे,आम्ही अपॉइंमेट घेतली आहे” गाथा रिसेप्शनिस्टला म्हणते….

“ओके मॅम, दोन मिनिटं बसा आणि मग जावा” 

“हम्म” गाथा..

गाथाच्या मन बैचेन झालं होते… नाही म्हणले तरी त्याला पहायचं होतेच.. पण कशावरून तो आज भेटलेच म्हणून…नाव माहीत नाही… गाव माहीत नाही… काहीच माहीत नाही… फक्त गाडी च नाव माहीत आहे पण नंबर पण साधा पहिला नाही… आणि कशावरून त्याचीच गाडी असेल… गाथाचे विचार संपत नव्हते… तेवढ्यात त्यांचा कॉल आला…

गाथा..आई आणि अवि डॉक्टरला भेटतात आणि त्याच्या सल्ल्यानुसार… आईला पुढे एका मोठ्या स्पेशलिस्ट ला म्हणजे डॉ.अर्जुन यांनादाखवायला सुचवतात..

पुढच्या सगळ्या टेस्ट त्यांच्या सांगण्यावरूनच होणार होत्या..

गाथा नवीन डॉक्टर ला भेटण्यासाठी जाते…

” आई,तू बस…. मी पाहून येते.. डॉक्टर आहेत की नाही ते…. वेळ असेल तर आपण इथेच बसूयात” गाथा..

“हो,चालेल ना… मला पण थकवा आलाय बघ. ” आई..

“मी आहे आई जवळ ,तू जा”अवि….

गाथा विचारत डॉक्टरच्या केबीन पर्यत जाते… 

आत मध्ये डोकावते.. तर बरोबर डॉक्टरांच्या विरुद्ध बाजूला एक सुंदर मुलगी…मोकळे केस.. एका बाजूने छान लटकते कानातील आणि हातात आयफोन होता… 

“एक्सक्यूज मी” 

“येस”

“कॅन आय मीट डॉक्टर अर्जुन??”

“येस, बट वेट सम टाइम” असं म्हणतच ती गाथा कडे ओळून पाहते.. आणि छानशी स्माईल देते..

“किती अप्रतिम आहे ही… भारी आहे…सरांची मुलगी असेल…आईला चेक करणार म्हणल्यावर वयस्करच असतील ना?? मी पण अशीच छान राहणार डॉक्टर झाल्यावर… गाथा मनोमन स्वतःकडे पाहतच म्हणाली”

“ओके मॅम, आय विल” गाथा थोडी भानावर येतच म्हणाली..

गाथा तिथेच बाहेर डॉक्टरांची वाट पाहत बसते..

तेवढ्यात समोर केबिन मध्ये तिला कोणीतरी दिसते…

मगाशी पाहिलेल्या मॅम ला मिठीत घेतले होते… अगदी लगेच सोडलं पण..

उंचापुरा मुलगा… पर्सनालिटी एकदम उत्तम.. गाथा त्याला पाठमोरी पाहत होती… 

“हा क्रेटा वाला तर नसेल ना????,गाथाच्या मनात विचार येतोय ना येतोय तेवढ्यात त्याने मागे पाहिलं… 

आणि गाथा त्याच्याकडे तोंड आवासून पाहतच राहिली… 

तिला काय बोलावे आणि काही नाही…. हेच समजेना झालं होतं..

“एक्सक्यूज मी,तुम्हला देशपांडे सरांनी पाठवलं आहे ना??”

“येस सर” 

“या आतमध्ये”

“हो” गाथा आत मध्ये जाते…

काही केल्या गाथाची नजर काही हटत नव्हती… तिला समजायलाच तयार नव्हती… आज तो तिच्यासमोर उभा आहे..

“पेशंट कुठेय”

“आई ,बाहेर आहे….”

“मग तुम्ही इथे…”

“मी तुम्ही आहे की नाही ते पाहायला आले होते.. आलेच मी”… गाथा पळतच गेली….

“काय मूर्ख आहे मी…काय विचार करत असेल तो माझ्याबद्दल..वेंधळी समजत असेल का मला.. मी पण काय त्याच्यात हरवून गेले…. खरंच असेल का तो माझ्या नशिबात… समजेना झालाय… “

“अग, आई चल आहेत डॉक्टर”

“चल बाई ,बर झालं आजच भेटले ते”

गाथा आणि आई… अविसोबत डॉक्टर कडे आले खरं…

पण आतमध्ये अर्जुन आणि ती मुलगी काही तरी बोलत होते.. अगदी जवळ बसून मोबाईल मध्ये पहात…

“ही कोण असेल आता?? गाथाच्या मनात विचार चालू होता… तेवढ्यात अर्जुनचे लक्ष समोर गेले”

“या ना,या आत मध्ये” डॉ. अर्जुन

“हो” गाथा..

“हे सगळे रिपोर्ट आणि आता पुढे काय करायचं ” अवि म्हणाला..

“हम्म,तुम्हाला खूप त्रास होतोय का??? आणि कधीपासून”डॉ. अर्जुन आईशी बोलत होता…

आणि गाथा फक्त आणि फक्त अर्जुन ला मन भरून पाहत होती….

डॉक्टर च्या बोलण्याकडे तिचे मुळातच लक्ष नव्हते….

“मग,या सगळ्या टेस्ट केल्या की भेटू आपण” 

“कधी” गाथा नकळत म्हणून गेली..

“अग, टेस्ट चे रिपोर्ट घेऊन… उद्या चालेल का सर??”अवि विचारतो…

“नाही….म्हणजे मी फक्त इथे आठवड्यातून एकदाच येतो,पुढच्या आठवड्यात भेटू… आणि खूप जास्त त्रास झाला तर माझ्या असिस्टंट चा नंबर दिला आहे.. त्याला फोन करू शकता” डॉ. अर्जुन म्हणाला..

“मग ह्या आहेत का तुमच्या असिस्टंट” गाथा म्हणाली….

आज गाथा ने ठरवलेच होते… कोण आहे ती…. जाणून घेयचाय होते तिला…

“नाही…. मी त्याची खास मैत्रीण… रावी….” 

ती सुंदर मुलगी म्हणजे रावी म्हणाली…

“ओके” गाथा थोडं नजर चोरतच म्हणाली…

“आय नोटीस यु” रावी पुन्हा हसून गाथा ला म्हणाली…

“ओके बाय” गाथा गोंधळतच बाहेर निघाली….

थोडं बाहेर आल्यावर ती परत माघारी आली.. आणि दरवाज्यातूनच अर्जुन कडे पाहिलं…

तिने तसं पाहताच अर्जुनने पण तिच्या डोळ्यात  पाहिलं..

लांबूनच नजरा नजर झाली खरी….

गाथा खूप आनंदात होती….

रावी बद्दल थोडी पण शंका तिच्या मनात नव्हती…

आज त्यादिवशी पाहिलेला क्रेटा.. हँडसम चार्म म्हणजे डॉक्टर अर्जुन आहेत तर….नाव तर मिळालं होतं आणि ठिकाण पण… दर गुरुवारी याच हॉस्पिटल मध्ये…

गाथाचा अचानक बदलला मूड.. अवि आणि  आईच्या नजरेतून काही लपत नव्हता…

गाथा स्वतःला सावरत होती.. मनातला आनंद चेहऱ्यावर मात्र दिसत होता… 

“अशी अचानक काय झालं”आई…

“चांगले डॉक्टर भेटले ना म्हणून म्हणलं”गाथा…

“हो ,ना.. किती आदराने बोलत होता…” आई..

“हो,आणि अगदी साध्या भाषेत समजावून सांगितले ना त्याने” अवि…..

“हो ना,आवडला मला” गाथा म्हणाली..

“काय???” आई डोळे मोठे करून म्हणाली…

“डॉक्टरची ट्रीटमेंट ग… चल आपण कँटीन मध्ये जाऊयात का?? कॉफी घेऊयात” गाथा… आई आणि अविला म्हणते..

“बर,चल… जाऊ” अवि…

गाथा तिच्याच नादात कँटीन मध्ये जाते… 

अगदी तिच्या समोरच्या टेबल वर…

अर्जुन आणि रावी बसलेले असतात.. ते पण कॉफी च घेत असावेत..मगावरून गाथा अंदाज लावत होती…

गाथाची नजर काही केल्या त्याच्यावरून हटत नव्हती..

तो ही तिला नकळत हलकेच अधून मधून पाहत असायचा…

तो जेव्हा जेव्हा पाहिलं तेव्हा तेव्हा गाथा त्याला स्माईल देत असायची…आणि हलकच खाली पहात असायची…

गाथाचे अस वागणं आईच्या नजरेतून काही केल्या सुटत नव्हतं…आणि याची भनक ही गाथाला नव्हती…

“अर्जुन, ती मगाशी आलेली पेशंट.. खूपच तारत होती रे तुला” रावी म्हणाली…

“हो ना… आणि आता पण ” अर्जुन म्हणाला..

” काय?? आता ??? कुठेय” रावी…

“मागे बघ’ अर्जुन…

रावी मागे पाहते तर गाथा त्याच्याकडेच पाहत असते…

रावी ने पाहिल्यावर मात्र तीने तिची नजर दुसरीकडे केली आणि… लक्ष नसल्यासारख दाखवलं…

रावी आणि अर्जुन दोघे ही हसले..

“हे मला पाहून हसता येत का??? मी वेडी वाटत असेल त्यांना”गाथा मनाशीस म्हणाली..

“निघायचं का मॅडम” अवि म्हणाला…

“हो,निघुयात” 

गाथा जायला निघाली तरी,अर्जुन आणि रावी तिथेच बसलेले होते…

अवि ने गाडीया आणली.. 

गाडीत बसता बसता सहजच गाथाने त्याच्याकडे पाहिलं… तर तो तिच्याकडेच पाहत होता…

हलकेच नजरेने तिने त्याला बाय म्हणल….

आणि अर्जुनने पण मान हलवली… 

तस रावी आणि अर्जुन परत हसायला लागले…

त्याच अस हसणं पाहून गाथाला मात्र राग आला होता… 

तिने रागाने अर्जुन कडे एक कटाक्ष टाकला… 

तश्या अर्जुन ने पण पण भुवया उंचावल्या… आणि पुढे गाथाचे एक्सप्रेशन पाहण्यासाठी मात्र गाथा नव्हती..

तिची कार पुढे गेली होतो.

“तू पण काय.. तिच्या नजरेला नजर देत होतास,तुला पण आवडली की काय????” रावी अर्जुन ला विचारते…

“हे… तुला तर माहीत आहे…मी…. ” अर्जुन…

“अरे, हो पण…असं का लुक देत होतास तिला” रावी…

“ती ला मी खूप आवडलो हे खरं आहे…तिची नजर हटत नव्हती.. आणि तिच्या नजरेत… फक्त आवडल्याची भावना होती.. असा काही आसक्ती नव्हती… थिल्लर पणा नव्हता…. नजर स्थिर होती आणि शांत.. आणि प्रेमाची पण….” अर्जुन गाथाचा चेहरा समोर ठेवून आठवत होता…

” एवढं सगळं समजलं का तुला..एवढ्या भेटीत… हो…मला नजर वाचता येते.. हे तुला वेगळं सांगायची गरज नाही” अर्जुन म्हणाला..

“मग तुमच्याकडून पण हो समजायचं का???” रावी….

“अजिबात नाही.. प्रेमाच्या नजरेतून मी पाहिलं नाही… आणि लग्नाच्या बेडीत आणि त्या सात वचनात मला अडकायचे नाही…मी आता जसा आहे अगदी तसच हवंय मला… आणि मुलीची कमी नाही मला.. हे माहीत आहे तुला….” अर्जुन…

“कुठे तरी हे थांबायला हवं ना अर्जुन”रावी….

“आज नको रावी… तू सांग…एवढ्या दिवसातून भेटली आहेस.. काय म्हणतोय तुझा संसार….” अर्जुन…

“काय तू… म्हणे संसार…” रावी… 

“हो,मग… ” अर्जुन…

“मस्त आहे बघ…. अगदी मजेत…बस.. आले होते इकडे म्हणून म्हणले भेटून जावं तुला….”रावी ..

रावी आणि अर्जुन गप्पा मारत निवांत वेळ घालवतात…

गाथा सगळ्या रोड ने मात्र शांत बसली होती..

अर्जुन आणि रावी हसल्यामुळे… तिचा मूड पण खराब झाला होता…

“ते का हसले असतील,याचा विचार करत होती . म्हणजे माझी चेष्टा केली का त्यांनी???मी गावठी दिसत होते का???की त्यांना हे माहीत नव्हतं की मी पण लवकरच डॉक्टर बनणार आहे म्हणून…”गाथा च्या डोक्यात विचार चालू होता…

“तो माझी चेष्टाचं करत होता… हे नक्की… मी पण काय गरज होती त्याला नजरेने बाय करण्याची… आणि अगदी आघश्या सारखे पाहण्याची…. आणि आता काय पाहून  पोट भरलं का ??? पोटच भरून शांत बसावं लागेल…. नाहीतरी रावी आहे त्याच्या आयुष्यात…मीच मूर्खां सारखी वागले… रावी पण पाहत होती माझ्याकडे म्हणजे नक्कीच ते दोघे आनंद घेत होते माझ्या भावनांचा…. असो… ज्या पण काय भावना होत्या त्या मनातून होत्या…आणि असंही आईचा दवाखाना संपला की काय संबंध येणार आहे तेव्हा.. जास्तीत जास्त पुढच्या गुरुवारची भेट..त्यापेक्षा अजून काही नाही…डॉक्टर अर्जुन माझं पाहिलं क्रश असेल..आणि नशिबात असेल तर पाहिलं  आणि शेवटच प्रेम….

गाथा आणि अर्जुनच्या प्रेमाची भनक त्या दोघांना पण नव्हती.. गाथा साठी अर्जुन क्रश होता तर अर्जुन साठी गाथा फक्त नजरेचा खेळ…पण तिचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोरून मात्र जात नव्हता.. 

आज कालच्या मुली  आणि गाथा यांच्यात खूप तपावथ होती… म्हणून की काय गाथा चा चेहरा जात नव्हता…..

गाथाच्या नजरेतुन त्याच चेष्टेचे हसणं…. 

Share to ....
0 0 votes
Article Rating

Leave a Reply

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x
%d bloggers like this: