अबोल हे प्रेम माझं भाग# 5
💞भाग #5💞
सकाळ म्हणजे नवीन सुरवात… नवीन दिवस.. सकाळचं वातावरणच मनाला प्रभावित करून जाते..
नवीन विचार मनात घेऊन येते…
“तो माझ्यावर का हसला हे,मला नाही माहिती.. माझं वागणं पण तस अतीच झालं होतं… मी पण जरा जास्तीच भरावरून गेले होते… असो… पण छान आहे तो..
आणि त्याच्या हसण्यामागे काय कारण असाव…हे तर मी नक्की विचारणार आहे…. कदाचित त्याला त्याच्या दिसण्याचा घमंड असेल… आणि त्यांच्या घरात मुलीचा आदर करायला शिकवलं नसेल… उगीच म्हणत नाहीत…जस दिसत तस नसत ,त्यानेच जग फसत..
असो… मला त्याला पाहिलं की खूप छान वाटते आणि नकळत ओढ लागते… पण अशी ओढ काय कामाची… जिथे भावनाच माती मोल आहेत….असो.. हे तर समजलं .. जेवढं बाहेरून छान असते तेवढं आतून पण छान असायलाच हवं म्हणून….. चला… योगा करा आणि अजून मन स्थिर आणि खंबीर करायला पाहिजे…स्टॅमिना वाढवायला पाहिजे… ” गाथा स्ट्रेचिंग करत विचार करत होती…
पण काही केलं तीच मन योगा कडे जात नव्हत… शेवटी स्कीपिंग रोप घेतला आणि अगदी भेमान होत स्कीपिंग करत होती… डोळयांसमोर होते ते फक्त अर्जुनचे हसणं….
“अग, बास.. स्कीपिंग करतेस का?? नक्की राग काढतेस कशाचा??” अवि हसत म्हणाला…
“हम्म..” गाथाला बोलता पण येत नव्हतं नीट… दम पुरता भरला होता…
“आवरून खाली ये,एकत्र बसून नाश्ता करूयात” अवि सांगतच खाली गेला…
गाथा तयार होऊन ,खाली गेली…सगळे डायनींग टेबल वर बसलेच होते…
“या…. आज शांत आहात.. काय म्हणले काल डॉक्टर” गाथाचे बाबा म्हणाले…
“सांगितले असेल ना,आई ने… सगळ्या टेस्ट करून गुरुवारी रिपोर्ट दाखवायचे आहेत”
“बर बर,मग उद्या जाऊन टेस्ट करा ,तुम्ही… म्हणजे सगळे रिपोर्ट पण मिळून जातील लवकर” बाबा म्हणाले…
“हो,हो मला आहे वेळ मी जाईल उद्या.. तस पण दि ला जावं लागेल आता.. यावेळी खूप दिवस राहिली… इंटरशिप साठी तिला इंटरव्ह्यू पण द्यावा लागेल” अवि बोलत होता…
“हो ना…अजून हॉस्पिटल ठरवले नाही… खूप काम राहिलेत…. रूम पण पहावी लागेल परत…”गाथा काळजीतच म्हणत होती..
“माझ्यामुळे….” आई म्हणार तेवढ्यात गाथा ने तिचा हात धरला..
“आई,हे सगळं म्हणून नको…. मी फक्त तुला माझी परिस्तिथी सांगितली आणि यात तुझ्यामुळे काय ग.. माझ्यासाठी आज पण तू तेवढीच म्हणतवाची आहेस… आणि अस पण तुझे सगळे रिपोर्ट चे कनक्लूजण निघाल्याशिवाय मी जाणार नाही….” गाथा आईला म्हणाली…
“अरे वा…सगळं प्रेम आईसाठीच.. आमच्यासाठी काहीच नाही..”बाबा म्हणाले…
“अस काय बाबा… सगळी डॉक्टरी तुझ्यासाठीच आहे माझी…” गाथा म्हणाली…
“मग एक- एक कॉफी होऊन जाऊ दे की.. गाथा स्पेशल…” बाबा म्हणला….
“हो,हो… नक्की”अवि…
गाथा किचन मध्ये निघून गेली… पण तिला त्यांचं सगळं बोलणं ऐकू येत होते..
“तसा डॉक्टर माणूस म्हणून चांगला वाटत होता…. अगदी आदराने बोलत होता माझ्याशी…” गाथाची आई म्हणाली..
“हो,बाबा… आणि ना सगळं व्यवस्थित सांगितले त्याने आम्हणाला… चांगला आहे डॉक्टर…”अवि..
“माणूस म्हणून चांगला आहे म्हणल्यावर डॉक्टर म्हणून पण असेलच चांगला.. काळजी मिटली….
पण मी काय म्हणतोय गाथा त्याच्या हाताखाली इंटरशीप करेल ना????”बाबा म्हणाला…
“नेव्हर…नो… तो वेगळा डॉक्टर .. मी वेगळी…. आणि अशी ते फक्त गुरुवारीच असतात…आणि आई…आदराने बोलणं हे संस्कार आईचे असतात… पण कशावरून डॉक्टर चांगला माणूस असेल…. ” गाथा म्हणाली…
” हो पण अस एवढं आपुलकीने बोलला तो…. आणि भाताची परीक्षा शितावरूनच होत असते…” आई…
“मला नाही वाटत… काही लोक सरड्यासारखे पण असतात.. रंग बदलू… मग त्यांना पण ही म्हण लागू पडते का???” गाथा…
“अरे… हो….कुठे त्याला आपल्याला घरी घेऊन यायचं आहे..बास करा…. ” अवि मध्येच म्हणाला…
“हो ना… तेच तर….” गाथा अस म्हणून कॉफी चा मग घेऊन गेली…
गाथा जवळ आता फक्त एकच आठवडा होता… आता काही झालं तरी सगळी तयारी करावी लागणार होती… पुण्याला जाणार होती ना, गाथा….
“आधी टॉप हॉस्पिटल शोधते… आणि मग शेजारीच हॉस्टेल मिळते ते पहाते… मैत्रिणीशी म्हणजे नेत्राशी पण बोलून घेते” गाथा स्वतःशीस बोलत…तिने तयारीला लागली..
टॉप हॉस्पिटल लिस्ट काढली… आणि त्यातील फक्त…दोनच काढले… पाहिले सह्याद्री.. आणि दुसरं… मंगेशकर हॉस्पिटल…अप्लिकेशन पण दिले तिने… त्यांच्या मेल ची फक्त आता वाट पहावी लागणार होती..
फोन कानाला लावतच….
“हाय,नेत्रा.. कुठेस”
“काही नाही… घरीच…”
“इटरशीप साठी फॉर्म भरला आहे मी आता,आपण ठरवलेल्या हॉस्पिटल ला.. तुझा पण भरलाय..होप्स आता दोघींचे एकाच हॉस्पिटलला होऊ दे”
“होईल ग… नको काळजी करू.. शाळा,कॉलेज…डॉक्टरी.. आणि आता इंटरशीप सगळं एकत्रच करणार ना आपण…आफ्टर ऑल… आपली मैत्रीची वीण च घट्ट आहे बघ…. ”
“हो ना… हॉस्पिटलमधून मेल आला की,रूम पाहुयात”
“हो ग,गाथा… आणि आई कशी आहे??”
“ठीक आहे,गुरुवार पर्यन्त सगळं होईल तिचे पण,मग जाऊयात आपण… शुक्रवारी लगेच”
“हो ,मी पण माझी बाकी तयारी करून ठेवते”
“हो हो.. बोलू नंतर”
फोन ठेवून,
गाथा पुस्तक वाचत बसते…
इकडे अर्जुन चे हॉस्पिटल मधील काम चालू होती…
“काय ,मग झाली का ओपीडी??” राकेश….अर्जुनचा जिवाभावाचा मित्र….
“हो,आताच”
“बस.. ना..”
“काल काय झालं… कोण भेटल होते.. फर्स्ट साईट लव अस काही नाही ना???” राकेश म्हणाला…
“म्हणजे रावी ने ग्रुप वर टाकलेले दिसतेय…
” नाही मला सांगितलं फक्त”
“तस काही नाही… छान आहे ती… पण खूप बालिश आहे रे… अगदी इनोसंट…प्रेम वैगरे नाही… पण बस तिचा चेहरा समोर आला ही वेगळं समाधान मिळते….. असेल जून जन्माचे नात काहीतरी….”अर्जुन तिचा चेहरा डोळयांसमोर आणत म्हणाला…
“मग बोल ना तिच्याशी….” राकेश…
“नाही.. नको…. तिची बोलकी नजर वाचायची आहे मला फक्त…. सध्या माझ्याकडे वेळ पण नाही..नवीन सर्जरीसाठी स्टडी चालू आहे” अर्जुन…
“किती बोरिंग आहेस रे… काय तर म्हणे.. तिची नजर वाचायची आहे.. जशी काय तुला ती रोज भेटणार आहे का???”
“रोज नाही पण दर गुरुवारी… दर्शन होणार आहे देवीचं” अर्जुन अस म्हणून परत हसला…
तेवढ्यात डोअर नॉक झालं….
“तू काय म्हणण्या आधी मी सांगतो,आमच्या अर्जुनला त्याची सुभ्रदा भेटली आहे… तू गेली तरी चालेल”राकेश समोर पाहतच म्हणाला….
तस दरवाज्याचा जोरात ढकललेला आवाज आला.. आणि परत माघारी जाताना सॅंडल चा आवाज आला….
“खूपच गरम झालेली दिसते…. रागातच गेली आहे… आता स्टाफ च काही खरं नाही” अर्जुन हसतच म्हणाला….
“हो,मग त्याशिवाय कळणार नाही तिला” राकेश..
” पण आपली सुभ्रदा…कुठेय.. कोण भेटली मला…..
एक मिनिटं… तू काल च्या.. तिला म्हणाला का????” अर्जुन म्हणाला..
“हो बघ तू…नशिबात असेल ती तुझ्या…तुला वठणीवर आणायला” राकेश म्हणाला…
“बास….. आता…. जावा.. आणि थँक्स… हिला माघारी पाठवलं ते… आता आठ दिवस तरी ती येत नसते बघ… माझ्या केबिन मध्ये..” अर्जुन म्हणला….
“हम्म…चल निघतो मी पण…” राकेश…
” ठीक आहे”
गाथाची बेस्ट फ्रेंड नेत्रा… अगदी लहानपानापासून…. आणि अर्जुनचा बेस्ट फ्रेंड म्हणजे राकेश…एकमेकांचे जिवाभावाचे सख्खे असे हे मित्रपरिवार….
दिवसा मागून दिवस जात होते…. गाथा पुढच्या तयारीत मध्ये व्यस्त होती तर अर्जुन एका सर्जरी मध्ये… दिवसातून एकदा तरी दोघांना एकमेकांचा चेहरा डोळ्यासमोर येत होता.. आणि एक समाधान पण…
म्हणजे काही वेळेस कस होते ना..अगदीच बिनओळखीची माणसं पण खूप जिवाभावाची होऊन जातात आणि एक घट्ट नात होऊन जाते… मैत्रीचं नात त्यातच उत्तम उदाहरण आहे… आणि मैत्रीच्या नात्यात ते दोन्ही बाजूने जपलं जाते पण प्रेमाच्या नात तसं नसते….
आणि दोघांच्या आयुष्यात… अस काही त्यांनी पाहिलेलं असत त्यामुळे त्यांना प्रेम या शब्दापासूनच लांब राहायचं असते… फक्त एक निस्वार्थी ओढ ठेवायची होती…
गाथाला तो आवडला होता…. पण फक्त ओढ… काही नाती आपण पण जपतोच की आयुष्यात फक्त देण्यासाठी… त्यांना खूप सारा आदर,खूप प्रेम,आपुलकी…आपला वेळ.. आपलं सर्वस्व आणि बरंच काही.. पण त्याकडून आपण कसलीच अपेक्षा मात्र ठेवत नाही कशाचीच…. तसंच नात गाथाला जपायचं होते.. अर्जुन सोबत….ते फक्त तिला जपायचं होते..अर्जुनचे इच्छा असो किंवा नसो…तिला समाधान मिळत होते म्हणून…
गाथाला ही माहीत नव्हतं.. तिच्या ओढीमागेच कारण काय आहे ते..पण ओढ होती… निखळ मनाची…
विचार चालूच राहतात…. रोजच आयुष्य पण…..
तसंच काहीसं…
“ओह,माय गॉड,नेत्रा… मेल चेक केला का????” गाथा फोन वर बोलत होती…
“एकच मिनिटं.. लगेच पहाते”
“सह्याद्री”
“हो,सह्याद्री”
“सोमवार”
“सोमवार”
“हो..मग आपण कधी जायच.. नेत्रा… आईच गुरुवार च झालं की जाऊयात का लगेच… म्हणजे तीन दिवस तिथलं पाहता येईल आणि सोमवारी जॉईन होता येईल”
“हो ,गाथा चालेल तरी मी घरी बोलून पहाते…म्हणजे प्लॅन सांगावं लागेल ना… आणि पुन्हा आपण दोघी एकत्र आलो ते पण”
“हो ,मग ऐक ना तुला वेळ असेल तर तू आज येणार घरी तुझ्या फॅमिलीला घेऊन,मग मिळून सरप्राईज देऊयात…” गाथा म्हणते…
“बर… बर.. अस पण आईला भेटायचं आहे ,मम्मा म्हणत होती माझी… मी कळवते थोड्या वेळात”
“हो,नक्की तो पर्यंत कोणाला काही सांगू नको”
“तू पण”
“ओके”
“बाय”
गाथा खुश होती आणि एक बेचैनी पण.. सगळयांना सोडून पुण्याला जावं लागेल…आणि आईला परत एकटीलाच दवाखान्यात जावं लागेल म्हणून….
“आयुष्य आहे चालत तर राहावच लागेल ना!!! चला आता आवरायला लागेल” गाथा मनोमन म्हणाली…
दुपार होत आली,तरी नेत्राचा फोन नाही… गाथाला थोडं टेन्शन च आलं होतं… तेवढ्यात फोन वाजला..
“काय झालं,एवढा का वेळ लावला” गाथा..
“अग, आवरत होते.. येतोय आम्ही थोड्यावेळात सगळेच”
“सांगितलं नाही ना तू कोणाला”
“नाही ग,गाथे.. गप आता”
“बर… बर ये”
गाथा पळत खाली जाते…
“आई … आई….. “
“आजोबा,आईला पाहिलं का???”
“अवि,आई कुठे आहे”
“काय,झालं.. एवढा का गोंधळ करतेय” अवि म्हणाला…
“नेत्रा येणार असेल ,दुसर काय तेव्हा” आई घरात येतच म्हणाली…
“आई,तुला कस समजलं लगेच… म्हणजे नेत्राचा फोन आला होता का???”गाथा आईच्या गळ्यात पडतच म्हणाली…
“नाही ग, तुझ्या आनंदावरून समजलं मला…एकतर बाबा घरी येताना आणि दुसरं नेत्रा येणार असेल तर तुझा दंगा असतो म्हणून म्हणलं”
“आई ,तू पण ना!!! पण आई यावेळी तुझी पण मैत्रीण येणार आहे… त्यामुळे तू पण खुश व्हो आता” गाथा आईला म्हणते..
“मग छानच की झालं”
“म्हणजे सगळेच येणार आहेत…येतील.. तासाभरात….”
गाथा आईला म्हणते आणि फ्रीज उघडत म्हणते…
“आई,मी विचार करतेय केक बनवण्याचा… खूप दिवस झाले ना… आणि नेत्रा प। येतेय तर”
“हो,हो बनवा!!! सगळ्यांसाठीच” आई आणि अवि सोबतच म्हणतात…
गाथा विचार करत असते… कसा बनवायचा.. आणि समजा केक सह्याद्री हॉस्पिटल आणि इंटरशीप चा अस काही बनवलं तर… सगळ्यांना सरप्राईज पण देता येईल ना…
गाथा स्वतःच्या आयडीया ने छान केक बनवते…
स्वतःच आवरून घेते…तेवढ्यात नेत्रा येते…
“ये ये” गाथा पळतच तिला मिठी मारते…
आणि घरात एकाच गोंधळ उडतो…
आता फक्त बाबा येण्याची वेळ असते…
एकदा बाबा आले की आपण सगळयांना सांगूयात.. गाथाच्या मनात चालू असते….
तेवढ्यात बाबांची गाडी येते…
“आई आई…बाबा पण आला” गाथा ओरडातच बाहेर आली…
“आई आज दि जरा जास्त खुश दिसत नाही का ग???? म्हणजे आज वेगळंच वागणं आहे” अवि आईला म्हणत असतो तेव्हा नेत्रा एकते..
“मी आलेय ना,म्हणून” नेत्रा विषय टाळते….
नेत्रा लाईट ऑफ कर… आणि सगळयांना हॉल मध्ये घेऊन ये,मी आलेच…
सगळे हॉल मध्ये जमतात… सगळ्याची कुजबुज चालू असते आणि गाथाचे नेहमीच मोठे सरप्राईज देण्याची पद्ध्त सगळ्यांना माहीत असते…
म्हणून सगळे वाट पाहत असतात….
“प्लिज अटटेन्श, लाईट ऑन… गेस ?????” गाथा केक कडे पाहतच म्हणाली….
“सगळे थोडे बावरले… केक वरील मजकूर वाचू लागले…
नेत्रा ने घट्ट मिठी मारली गाथा ला आणि तिचे डोळेच भरून आले….
“ओह नो…. “अवि जोरात नाचत ओरडला….
“ओह,येस…..” दोघी पण अविला मिठी मारतच म्हणलया..
“अरे,काय तुमचं हे आम्हाला पण सांगताल का?? तिची कोड ची भाषा नाही कळत आम्हाला…. “
“अग, आई- काकू..बाबा- काका.. आजोबा.. नेत्रा दि आणि दि पुन्हा एकाच ठिकाणी इंटरशीप करणार आहेत… सह्याद्री हॉस्पिटलमध्ये … हो ना दि” अवि जोरात ओरडत सांगत होता….
“हो”दोघेही ओरडल्या….
तसे सगळे अगदी हसत… आनंदात नाचू लागले…
सगळे जाम खुश होते..नेत्रा आणि गाथाच्या मैत्रीवर….
केक पण कट केला आणि सगळ्यांनी मस्त एन्जॉय पण केला..
“पण आता हा,जेवण माझ्याकडून,चला बाहेर जाऊयात आपण”राजू काका म्हणाले.. म्हणजे नेत्राचे वडील…
“हो,मग… अर्थात चला….”
सगळे मस्त खुश होते… सगळं मजेत जेवण झाल्यावर नेत्रा तिच्या घरी गेली…
आता पुण्याला जाण्याची तयारी जोरात चालू होती..
आणि गाथाच्या डोक्यात अजून अर्जुनचे हसणं दिसत होते….
“त्याला आता शेवटचं पाहणार उद्या मी… ” गाथा त्याच्याच विचार हरवून गेली… आणि चांदणं पाहता पाहता…. झोपेत चंद्रावर गेली…