अबोल हे प्रेम माझं भाग# 6
💞भाग # ६💞
आज गुरुवार आहे आणि आज कदाचित शेवटचा दिवस आहे अर्जुनला पाहण्याचा…
परत कधी पाहता पण येणार नाही….
माझं प्रेम आहे असं नाही म्हणत पण ओढ आहे मला त्याची…
“आज तुला काहीतरी देऊन जायचं पण काय द्यावं ना ,हे कळत माही.. एखादं गिफ्ट… का.. कॅडबरी… का?? फ्लॉवरस… का अजून काही… नाही दिल तरी चालेल अस कोण आहे तो तेव्हा त्याला मी माझी आठवण देऊ…नको काही द्यायला… असो… रेडी होते… लेट नको होयला… अवि पण नेमका नाही आज.. नाहीतर आजच गेले असते मी पुण्याला…. ” गाथा स्वतःशीस विचार करत होती…
आज गाथा मनापासून तयार होत होती… आज तिला छान दिसावं अस वाटत होते.. त्यामुळे तिने मस्त तयार झाली….
“आई ,चला..तुमच्या महाभारतातल्या अर्जुनला भेटायचं आहे ना… रिपोर्ट घेतले आहेत.. अजून काही राहील आहे का?? ” गाथा म्हणाली….
“ओह…. कोई तो रोकलो…..”आई म्हणाली….
“काहीही काय आई…आता मी पण डॉक्टर होणार आहे ना… स्टेटस मेंटेन नाही केला तर लोक हसतात… त्यांना अस वाटत की … जाऊ दे आई… तू चल” गाथा मान हलवत म्हणाली…
“काही तरी झालंय, पण जो पर्यन्त ती सांगत नाही तोपर्यन्त मी पण विचारणार नाही… ” आई स्वतःशीस पुटपुटली….
पण काही म्हणा…. गाथा खूप सुंदर दिसत होती आज!!!
गाडी चालवतच.. दोघींच्या गप्पा चालल्या होत्या….
“आई,मी उद्या गेले तरी तू तुझी काळजी घे…. काही वाटलं तरी लगेच मला फोन कर… माझं सगळं लक्ष तुझ्याकडे च असणार आहे ग….. मन तर लागत नाही बघ… पण जावं लागेल… एकदा इंटरशीप चालू झाली की म्हणावं तेवढा वेळ मला नाही देता येणार तुला.. पण तू वाईट नको वाटून घेऊ… एवढंच…. ”
“काय झालं बाळा… उदास नको होऊ.. मला बर वाटलं की मीच येईन… तुझ्याजवळ थोड्या दिवस..”
“हो ना..ते तर आहेच… पण ना आई आज सगळं ठीक आहे…असंच डॉक्टर ने सांगावं…. ”
“तुला नेमकं काय झालंय… “
“तुझी काळजी आई” गाथा थोडं हसतच म्हणाली…
त्यांच्या बोलण्यात कधी हॉस्पिटल आलं.. ते समजलं पण नाही…
“आई पार्क करून आले.. तू इथेच थांब” गाथा म्हणाली….
गाथा गाडीतून खाली उतरली… तस समोर बसलेलं मुलाचं टोळकं तिला न्याहाळत होते… कारण तेवढेच ती छान दिसत होती….
आणि हो… अर्जुन पण वरून पाहत होता..
एवढा वेळ दंगा करणारी मुलं अचानक का शांत झाली… आणि कशा कडे पाहत आहेत.. म्हणून हलकेच त्याने खिडकीतून अजून थोडं बाहेर झुकतच पाहिलं तर त्याला गाथा दिसली.. हलकेच केसांना नीट करत हॉस्पिटलमध्ये येत होती.. तीच लक्ष पण नव्हतं समोर मुलं तिच्याकडे आघश्या सारखी पाहत आहेत म्हणून…
“सिस्टर… प्युन…” अर्जुन जोरात ओरडला…
“काय झालं..सर.. ” प्युन म्हणाला…
“खाली कुठले टवाळ लोक आले आहेत… त्याचा त्रास होतंय मला केबिन मध्ये.. त्यांना बाहेर काढा..आणि एकालाच त्यांच्या पेशंट जवळ थांबायला सांगा..”
“सर….पण ते मोठ्या पार्टीचे आहेत…. राजकीय आहेत… ऐकणार नाहीत….”
“पोलिसांना बोलावा मग… “
“सर पण”
तेवढ्यात गाथा समोर…. नॉक करते…
नजरेनेच अर्जुन ने प्युन ला जायला सांगितले….
“येस” अर्जुन…
“सर रिपोर्ट… ” गाथा रिपार्ट समोर ठेवातच म्हणाली…
“हो,बसा”
गाथा आणि आई बसतात… गाथा आज त्याच्याकडे न पाहता…त्याची केबिन पाहत होती…
तिथे तिला कॉफी मेकर दिसतो….
“म्हणजे महाशयांना,कॉफी आवडते तर… ” गाथा हलकच गालात हसली….
आणि तेवढ्यात गाथाचा फोन वाजला… फोन वर नाव म्हणत हार्ट होते.. तिने कट केला.. आणि पुन्हा फोन कडे पाहत.. गोड हसली….
तिचं हसणं अर्जुनच्या.. नजरेतून सुटलं नाही… म्हणून त्याने पण फोन कडे पाहिलं..हार्ट पाहून त्याच्या चेहऱ्यावर पण थोडं प्रश्न चिन्ह दिसली….
खरंतर फोन नेत्राचा होता… पण समोर अर्जुन होता त्यामुळे ती उचलत नव्हती… आणि नेत्रा काही केल्या.. फोन कट करत नव्हती…फोन वर फोन येतच होते….
“खूपच महत्वाचा असेल तर…. उचलू शकता मिस???”
अर्जुन तिच्याकडे पाहत म्हणाला…
“हो, खूप इंपोर्टटँट आहे माझ्यासाठी… पण करेल मी नंतर” गाथा हळूच म्हणाली…
त्याने मिस म्हणलं होते म्हणूनच गाथाने मुद्दाम च नाव नाही सांगितलं….
“डॉ. अर्जुन… नाही तुम्हाला मी माझं नाव सांगणार नाही आणि नाही माझा पेशा…. पुन्हा हसण्याचा चान्स मी नाही देणार तुला” गाथा स्वतःशीस बोलत होती…
“रिपोर्ट सगळे ठीक आहेत.. सर्जरीची काही गरज नाही… मेडिसिन वर काम होऊन जाईल…. पण तुम्हाला दर गुरुवारी मला भेटायला यावं लागेल ” अर्जुन म्हणाला…
“पण दर गुरुवारी…???? म्हणजे माझी मुलगी आणि मुलगा बाहेर असतात… ” आई सांगणार तेवढ्यात..
“अग, आई इथून पुढे बाबाला घेऊन ये ना!! आम्ही नसलो तरी काय झालं” गाथा ने कस तरी आईला सांगण्यापासून अडवलं….
“म्हणजे…. ” अर्जुन..
“सर निघू आम्ही… थँक्स अ लॉट सर” गाथा हातात हात घेत म्हणाली….
जेव्हा गाथा ने शेक हॅन्ड केलं तेव्हा नकळत त्यांना वेगळाच फील झालं…. जणू खरंच पूर्वीच काही तरी आहे….
तस दोघांनी एकदम हात सोडले आणि एकमेकांच्या डोळयांत पाहिलं….
तेवढ्यात फोन पुन्हा गाथा चा वाजला… आणि पुन्हा हार्ट…
“प्लिज टेक युअर कॉल ..यु मे…..” अर्जुन…. पुढे काही म्हणार तेवढ्यात….
“आय नो सर… सॉरी सर” गाथा आईला घेऊन बाहेर आली…
“प्युन…. प्युन… कॉफी पाठवून दे” अर्जुन खूप जोरात ओरडला…
गाथा त्याच्या आवाजाने एकदम दचकली… तिच्या अंगावर काटा आला…
“मध्येच काय झालं याला… त्यादिवशी मला हसत होता… आज माझ्यावर अचानक चिडतोय…..”तिच्या मनात विचार चालू होता….
“आई… तू पुढे हो… मी आलेच… दहा मिनिटांमध्ये” गाथा आईला सांगते..
“हो,मी खाली जाते… त्या माझ्या ओळखीच्या नाही हा.. सिस्टर त्यांना भेटते.. ” आई म्हणाली….
“बर…जा तू सावकाश….माझं थोडं काम आहे ते करून आलेच मी”गाथा आईला म्हणते…
आणि परत अर्जुन च्या केबिन कडे जायला निघते..
अर्जुन येरझाऱ्या घालत असतो..
प्युन कॉफी बनवत असतो….
गाथा डायरेक्ट आत येते…. आणि प्युन ला नजरेनेच बाहेर जायला सांगते..
अर्जुन तिच्याकडे पाहतो आणि काय म्हणार तेवढ्यात पुन्हा तिचा फोन वाजतो…
“पुन्हा हार्ट” अर्जुन पुटपुटला….
हातानेच त्याने फोन उचल असं म्हणाला…
ती अगदी त्याच्याजवळ जाते…अगदी त्याच्या समोर.. आणि फोन उचलते आणि लाऊडस्पीकर वर ठेवते…..
“हनी,यार कुठेस तू??? किती वेळ फोन करतेय…. चिडू नको.. पण ना तू एका रिंग मध्ये फोन नाही उचला ना की परत परत अजूनच करू वाटतो….”तिकडून नेत्रा बोलत होती….
गाथा अर्जुन ला न्याहाळत होती…म्हणजे तिला पहायचं होते की त्याच्या चिडण्यामागचे कारण नेमकं हेच असेल ना????
तसा अर्जुन हसला… आणि मान हलवली….
“अग, ये गधडे… कुठे हरवली” नेत्रा….
“बोल ना…. काय म्हणतेस” गाथा…
“जायचंय आपल्याला उद्या… मला ना जाऊच वाटेना बघ… अजून थोडे दिवस थांबायचं का?? ” नेत्रा…
गाथा … अर्जुन साठी कॉफी बनवत असते..आणि नेत्रा सोबत बोलत पण असते….
अर्जुन तिचे बोलणं अगदी मन लावून ऐकत असतो….
“नको… उद्या जाऊयात… तस पण इथे राहून काय उपयोग आहे… “तिने हलकच अर्जुन कडे पाहत म्हणाली..
“हो ना.. ते पण आहेच.. बर… जाऊयात मग उद्या.. संध्याकाळी पुन्हा बोलूयात.. म्हणजे काही राहायला नको.. लवकर माघारी येणार नाही ना म्हणून म्हणल” नेत्रा म्हणाली…
“हो” गाथा ..
गाथा कॉफीचा मग घेऊन अर्जुनला देते.. कॉफी वर छान स्माईली फेस काढलेले असते…
गाथा अर्जुनला मग देते… आणि डोळ्यानेच शांत राहायला सांगते..
फोन चालूच असतो…
“अग ये… काळे… बोल ना…. तुला काय बोलू वाटत नाही का??? ” नेत्रा ओरडली….
“हो हो… झालाय माझं काम हॉस्पिटल मधील.. निघतेय मी घरी यायला…वाटेत बोलूयात… ” गाथा म्हणते…
अर्जुन कॉफीचा एक सिप घेतो.. आणि तिच्याकडे पाहतो..
तेवढ्यात गाथा त्याला नजरेनेच बाय म्हणते आणि जाते म्हणते….
मागे ओळून न पाहता… गाथा लाऊडस्पीकर बंद करते आणि फोन वर बोलत निघून पण जाते…
अर्जुन तिच्या पाठमोरी आकृतीकडे पाहतच राहतो… त्याला तिच्याशी बोलायचं होते… पण तीला कदाचित काही ऐकायचं नव्हतं….
“कशी ना… माझ्या मनातील भाव ओळखले…. म्हणजे.. नाव तरी सांगायचं होते ना…बाकी काही नसते सांगितले तरी जमल असतं…. डेरिंग खूप आहे राव हिच्यात…. पर्सनॅलिटी एकदम कडक….पोलीस असेल का???? ड्युटी वर जाणार असले कदाचित म्हणून…. काय माहिती…पण कॉफी भारी बनवते….. मिस.कॅफेबिन….” अर्जुन कॉफी संपवत खिडकीतून पहात होता… दिसतेय की नाही ते…..
शेवटी दिसली.. पण अजून फोन वरच बोलत होती….
आणि तसेच निघून पण गेली….
अर्जुन च्या जिभेवर कॉफीची चव बराच वेळ होती आणि मनात फक्त मिस. कॅफेबिन होती….
गेल्यावेळी गाथाचे मन चलबिचल होते तर यावेळी अर्जुनचे मन घायाळ होते.. त्याला ओढ लागली होती… तिच्याबद्दल जाणून घेण्याची….
म्हणजे त्याला हेच कळत नव्हतं अस कोणी कोणासाठी डायरेक्ट कॉफी का बनवून देईल आणि ते पण मी एवढं रागात असताना….
तिच्या बद्दलचे विचार काही केल्या जात नव्हते आणि नवीन केस स्टडी करायची आहे हे पण विसरता येत नव्हतं….
इकडे गाथाची तयारी झालीच होती… उद्या गाथा पुण्याला निघणार होती…. एक नवीन सुरवात….
आता मात्र कठीण आहे….. गाथा आणि अर्जुनची भेट होणं….. आणि त्याच अबोल प्रेम वाढण्याचे पण….
कसं आहे… इंटरनेट ने च्या जगात पण हे दोघे एवढे अजनबी अनजान बनून कसे राहू शकतील…
सोशल मीडिया च्या जगात… एकही फोटो नाही… किंवा एकही माहिती नाही…. विशेष वाट्ते ना….
डॉ. अर्जुन चे काही आर्टिकल्स आणि काही पेपर वर्क होते… गूगल वर.. पण स्वतःच असं खास असं प्रोफाइल काही नव्हतं…म्हणजे इंस्टा.. फेसबुक किंवा यु ट्यूब… कशावरच काही नव्हतं….
गाथा चे असच काहीसं होते….
हे ही खरच आहे म्हणा… आपली लाईफ जेव्हा आपण सोशल करतो तेव्हाच ती सोशल होते आणि नकळत आपण त्याच गुलाम होतो… किती लाइक्स आणि किती कंमेंट वाचण्यात… त्याच आभासी दुनियेत खुश होऊन जातो.. समजत ही नाही की रिऍलिटी काही वेगळीच आहे… कोणाला समजतच नाही.. स्वतःची ओळख आपण इतकी विसरून जातो की त्या आभासी दुनियेतच स्वतःला शोधू पाहतो… जी आभासी दुनिया आहे मुळीच ती तुम्हाला तुमचा स्वतःचा साथीदार काय बनवून देईल…स्वतःला स्वतःशी ओळख… मैत्री करायची असेल तर तेवढा वेळ स्वतःला दिला पाहिजे….स्वतःच्या आयुष्यात स्वतःला समजावून घेतल पाहिजे.. जो माणूस स्वतःला ओळखतो ना ,तो कधीच स्वतः फसत नाही… तो स्वतःचाच खरा मित्र असतो…
गाथा आणि अर्जुन मात्र सख्खे सोबती होते… स्वतःचे… स्वतःच्या दुनियेत एकदम रंगून गेलेले.. त्यांना कधी कोणाच्या साथीची गरज ही वाटली नव्हती… पण म्हणतात ना.. आयुष्य योग्य वेळेला योग्य देत असते म्हणूनच…. गाथाला अर्जुनची ओढ लागली होती अर्जुनला तिची…
आणि तरी दोघे म्हणतात,आम्हाला प्रेमाच्या भानगडीत पडायचं नाही म्हणून… मग काय फक्त न बोलता राहणार का??? बोलणं होईल की नाही माहीत नाही जिथे प्रश्न पुढच्या भेटीचा आहे…. जिथे भेटीची शक्यताच कमी आहे तिथे अजून काय करणार!!!!