मराठी कथा-कादंबरी-लेख Blogs- Entertainment- Travel- Food

"वाचत राहा,जगण्याला प्रेरणा मिळण्यासाठी📖 Stories| Reviews| Entertainment | Greetings | Travel | Food

कथामालिकाप्रेमकथा

अबोल हे प्रेम माझं भाग# ७((अंतिम भाग))

💞भाग# ७💞

गाथा ची इंटरशीप चालू झाली होती.. स्वतःच्या कामाविषयी तिला खूप आस्था होती.. त्यामुळे ती त्यामध्ये रंगून गेली…अर्जुन ची आठवण मात्र येत असायची पण परत कधी भेट होणार पण नाही म्हणून विचार तिथेच थांबत होते.. डोक्यात फक्त डॉक्टरी च येत होती…

उलट झालं होते ते अर्जुन च… कामाच्या वेळेमध्ये ही.. जेव्हा जेव्हा कॉफी तो प्यायला जात असायचा तेव्हा तेव्हा त्याला गाथा वेड लावून जायची….

गाथा शिवाय अर्जुनला आता कॉफी पण नको झाली होती… गाथा ची ती अबोल शब्द त्याला आवडत होते… 

दिवसामागून दिवस जात होते आणि शेवटी गुरुवार फक्त एका दिवसांवर येऊन ठेपला होता….

अर्जुन त्याच्या केबिन मध्ये होता.. हातात कॉफी आणि समोर गाथाची आठवण…

“कुठे हरवला डॉक्टरसाहेब” राकेश..

“काही नाही,रे कॉफी पितोय”

” वाटतं नाही रे”

“तू बोल,कस आलास… कुठं पर्यन्त आली तुझी लव्हस्टोरी ते पाहायला आलोय”राकेश..

“प्रेम बिन काही नाही… बस समोर असावी आणि फक्त तिला पाहावं” अर्जुन..

“नाव काय आहे आणि काय करते”राकेश

“काहीच माहीत नाही,फक्त छान कॉफी बनवते.. मिस.कँफेबीन…..  ” अर्जुन..

“ओह,तिच्या हाताची कॉफी पण पिला आणि मला म्हणतोय का नाव नाही माहिती”राकेश

“तू माझं ऐकशील का??? त्यादिवशी घडलेला सगळं सांगतो” अर्जुन

“हीच ती जी तुझ्या साठी देवाने पाठवली आहे….”राकेश

“गप, काही पण काही… बघू आता उद्या भेट होईल ना… मग नाव विचारतो”अर्जुन..

” हो,हो… नावाची घाई झालेली दिसतेय”

“तस काही नाही पण छान आहे” अर्जुन

“पण उद्या आलीच नाही तर” राकेश..

“असं होणार नाही,तिला तर मी जास्त आवडतो”अर्जुन..

“हो का मग पाहू उद्या” 

राकेश आणि अर्जुन चे बोलन झाल्यावर… अर्जुन घरी जातो आणि उद्याची तयारी करतो…

“वाव!! आपण पुण्यात आहोत… स्टेटस अपडेट करते” नेत्रा…

“हम्मम… करा….” गाथा..

“हम्म काय हम्म” 

“गप,गेलो की पहिली रूम आवरूयात,आणि मग बाकी” गाथा गंभीर विचारात म्हणाली…

“ओके मॅडम”

गाथा आणि नेत्रा रूम वर येतात.. अवि ने अगदी छान रूम पाहून दिली होती त्यामुळे काही वाटत नव्हते… 

“भाऊ ,असावा तर असा” गाथा म्हणाली…

“हो ना,यार किती छान रूम आहे,अवि भाईला मानलं यार”नेत्रा…

सगळं समान ठेवून गरजेच्या वस्तू घेऊन आल्या… आणि रूम मध्येच थोड्या वेळ घालवला… 

असही प्रवासाने खूप कंटाळा आल्यामुळे दोघींनी पण आराम करणंच पसंद केलं.. 

“घरची आठवण येतेय ना ग,गाथा” नेत्रा…

“हो ना,किती एकट वाटतंय ना,गं… या गर्दीमध्ये…” गाथा…

“हम्म” 

दोघी गप्पा मारत झोपी पण गेल्या.. 

रोज दिवस नव्याने उगवत होता आणि तेवढ्याच घाईत मावळत पण होता…. 

“आज गुरुवार आहे,येईल ना ती नक्की,बस..फक्त पहायचं आहे… मला तिची ओढ आहे.. तिला डोळे भरून पहायचं आहे आणि बस तिच्या नजरेत हरवून जायचं आहे” स्वतःच आवरतच अर्जुन एकटाच बोलत होता….

“आज मी तुला भेटणार नाही… मला तुझी जेवढी ओढ आहे तेवढी तुला पण आहे का रे??? तू शोधत शोधत येशील का रे… इथे… मला मनापासून तू आवडतोस… मी स्वतःला कधीच नाही थांबवणार तुझ्यासाठी काही करण्यापासून… आज जर माझी ड्युटी सगळ्यात मोठ्या सर्जन सोबत नसते ,ना तर मी आले असते रे… मी मनापासून मिस करतेय बघ… तुझ्याजवळ यावस वाटतंय”गाथा स्वतःच्या विचारत आवरत होती…. आज गाथा ची नाईट होती… त्यामुळे सगळं निवांतच होते…

बैचेन मन होते… ओढ दोघांना होती.. पण आज गाथा अर्जुनला भेटणार नव्हती…याची भनक पण त्याला नव्हती… 

अर्जुन केबिन मध्ये येरझाऱ्या घालत होता.. अचानक नॉक झालं… तस त्याच्या चेहरयावरचा रंगच उतरला…

“हो ,या ना ,बसा!!” अर्जुन

“कशी,आहे तब्येत” अर्जुन..

“काही त्रास नाही बघा ,या मेडिसिन मुळे” गाथा ची आई…

“ह्या चालूच राहू द्या”

“बर,परत कधी यावं लागेल,म्हणजे मला सुट्टी काढावी लागेल ना?? म्हणजे मुलगी पण इथे नाही आणि मुलगा पण म्हणून म्हणलं” गाथाचे वडील म्हणाले..

“काय विचार यांना…. अर्जुन मनातच म्हणाला…

“नाही आता पुन्हा येण्याची काही गरज नाही… काही त्रास झाला तर हा माझा मोबाईल नंबर…तुमच्या कडे असू द्या.. आणि मुलांना पण द्या.. काही वेळी अवेळी गरज पडली तर.. “अर्जुन खूप धीर धरून म्हणाला…

“ठीक आहे.. निघतो आम्ही” दोघेही निघून गेले…

अर्जुन ची चलबिचल खूप वाढली… 

“राक्या,ती नाही आली आज… मला ना आज जोरजोरात रडावस वाटतय… मला कळत नाही आज अस का होतंय… पण ना आज जे होतंय ते मी कधीच अनुभवलं नाही.. मला पाहिजे राव ती…. माझ्या आयुष्यात.. बाकी काही माहीत  नाही मला…. जस्ट आय वॉण्ट….” अर्जुन राकेश सोबत अगदी मनापासून बोलत होता…

“अरे,हो… मी पण तुला अस पहिल्यांदाच पाहतोय…मिळवू आपण कुठून पण…पण तू धीर सोडू नको….. “

“हम्म ,”म्हणला आणि फोन ठेवून दिला….

गाथाला माहीत होते…. अर्जुन कुठे असतो ते… त्यामुळे त्याच्या एवढी तिची चलबिचल नव्हती खर… पण तिला हे पण माहित होते की अर्जुनवर प्रेम करण्यासाठी तिला त्याच्याशी बोलण्याची गरज नाही… तो जसा आहे तसा तिला तो कबुल होता… पण आयुष्य काढण्यासाठी एवढ्या गोष्टी कुठे पुरेशा असतात… असो…

दिवसा मागून दिवस जात होते…. 

ह्याच्या मनातील ओढ तिच्या मनाला साद घालत होती खरं… 

तेवढा आवाज पण तर ऐकला पाहिजे ना मनाचा…. 

“मनापासून मागितलेली आणि संयम ठेवून ध्यास घेतलेली गोष्ट ही एक ना एक दिवस नक्की मिळतेच ना….”

आणि दिवस होता…. तो आजचाच!!!!

“मिस.गाथा.. आज ह्या पेशंटच्या बाळासोबत आपल्याला पेशंटला पण वाचवायचे आहे आणि त्यासाठी आज आपल्याच हॉस्पिटलचे टॉप डॉक्टर अर्जुन येणार आहेत…..तुमच्या टीम ची ही लिस्ट… वीस मिनिटात डॉ. अर्जुन येतील.. तुम्ही तयारीला लागा….”हेड  डॉक्टर सांगून गेले…

“डॉक्टर अर्जुन…. माझा अर्जुन येणार आहे आणि आज मी त्याच्या देखरेखीखाली काम करणार आहे… आणि आज आम्ही जवळ जवळ दोन-तीन तास एकत्र असू…. ” गाथा स्वतःशीस बोलली… 

आज ती खूप खुश होती… आनंद मावत नव्हता… 

“तेवढ्याच लक्ष देऊन तिने ऑपरेशन ची सगळी तयारी केली…. आणि स्वतः तयार पण झाली…मास्क होता… केसांना पण कॅंप लावली होती आणि हॉस्पिटलमधील ढगळे निळ्या रंगाचे कपडे…फक्त डोळ्यात काजळ होते… ओळखण्याची फक्त एकच खून होती ,ते म्हणजे नजर…. 

“समोरून अर्जुन आला…. तशी गाथाची अजूनच धढ धढ वाढू लागली…. “

“ऑपरेशन ला सुरवात झाली….आणि गाथा त्याच्या कामात हरवून गेली…त्याने अजून तिच्याकडे पाहिले नव्हतं…कोणाकडेच तो पाहत नव्हता… फक्त पेशंट आणि त्याच काम…. अचानक त्याचा धक्का गाथाला लागला आणि त्या दिवशी सारखा करंट दोघांच्या अंगातून डायरेक्ट मनावर घाव घालून गेला… तसं अर्जुन ने तिच्याकडे पाहिलं आणि नजरानजर झाली.. 

आपसुकच तिने खाली पाहिलं….

“ही च ती….”अर्जुन पुटपुटला… 

“मला हिला भेटायचं आहे… थोड्या वेळात ऑपरेशन संपेल.. पेशंट शुद्धि वर येईपर्यंत मला बराच वेळ मिळेल…. तेव्हा बोलेन मी हिला…पण कशावरून हीच असेल….. अजून हिचा चेहरा पण पहिला नाही मी…. अर्जुन तिच्याच विचारात होता… तिला पाहत होता.. तिची नजर वाचत होता… ही तीच आहे… यावर त्याचा पक्का विश्वास बसला….

ऑपरेशन पण संपलं तस.. त्याने स्टाफ ला ओके म्हणाला… आणि तिला पाहू लागला…. पण त्याला ती दिसेनाशी झाली…

“एक्सकुज मी, सगळ्यांनी दहा मिनिटांमध्ये डॉ. शहा च्या केबिन मध्ये भेटा.. पण सगळे…. ” अर्जुन निघून गेला… 

त्याने खूप लवकर आवरून पण घेतलं…

तयार झाला… आणि डॉ. शहा च्या केबिन मध्ये जाऊन बसला… 

डेस्कवर पाहिलं तर… 

कॉफी होती…. त्यावर तेच स्माईली होती…मग उचलून पहिला घोट घेतला आणि त्याला आत्ता नक्की खात्री झाली…. 

ती इथेच आहे…

सगळा स्टाफ पण तिथे आला…. सगळ्यांनी मास्क काढले होते..पण युनिफॉर्म असल्यामुळे ड्रेस तोच होता…. 

गाथा अर्जुनला चोरून पाहत होती.. 

सगळ्यात शेवटी ती उभी होती..

अर्जुनच्या नजरेतील गोंधळ तिला आवडत होता…त्याची चलबिचल तिला जणू प्रेम सांगत होती….

“हो,तुम्हीच…. ” अर्जुन तिच्या समोर उभा राहत म्हणाला… 

“तुम्ही थांबा,बाकी सगळे जावा”

गाथा थोडी कावरीबावरी झाली…

अर्जुन अजून तिच्या जवळ आला…. 

आता दोघांच्या मध्ये फक्त कॉफी चा मग होता… 

श्वास वाढले होते… नजर स्थिर झाली होती… आवंढा गिळत होता….

“किती सतवल यार… भेटली नाही ते वेडा झालो असतो ना मी” अर्जुन..

“हो का” 

“खरंच ग….. साथ राहशील माझ्यासोबत आयुष्यभर”

“म्हणजे…. मी….”गाथा गोंधळून गेली…. 

“मला तुझं अबोल प्रेम मंजूर आहे ग,मिस…. “अर्जुन म्हणला.. 

“गाथा” 

“नाव छान आहे… मी वाट पाहिलं…नंबर…..” 

“नको…. आपण पुढच्या आठडवढ्यात भेटुयात…. नवीन फिलिग्स घेऊन” 

गाथा निघून गेली…. हलकेच गालावर ओठ टेकवत..छानशी स्माईल देत….

थोडक्यात अर्जुनला तिचा होकार सांगून…..

अबोल प्रेमाची ही बोलकी निर्मळ कथा.!!!!

आज सोशल मीडियाच्या दुनियेत…. एका मिनिटात प्रेम होते आणि दुसऱ्या मिनिटाला ब्रेकअप होऊन जातो…संपर्क करण्याचं साधन आहे म्हणून लगेच जे मनात येईल ते बोलून रिकाम होयच आणि ते किती खर आहे आणि किती खोट याचा विचारच केला जात नाही…

मनाला ओळखता येणं गरजेचं आहे… समजून घेता आला पाहिजे…आभासी दुनियेतून बाहेर आल पाहिजे.. म्हणजे नात्याची किंमत पण राहते आणि प्रेमा सारख्या पवित्र बंधनाला फसवणूकीचा डाग लागला जाणार नाही… 

(रेटिंग करायला विसरू नका आणि असच भरभरून प्रेम माझ्या नवीन कथेला पण दया..))

Visit to my blog…

Inspireinmarathi.com

Share to ....
0 0 votes
Article Rating

Leave a Reply

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x
%d bloggers like this: