लग्नबंधन भाग#1

ही कथा मालिका..हिंदू संस्कृती मधील परंपरेने चालत आलेली विधी म्हणजे लग्न याविषयी आहे.. जिथे इच्छा असो अथवा नसो एकदा लग्न केले की ते शेवट पर्यन्त घेऊन गेलंच पाहिजे.. या मताच्या समाजासाठी एक खरी करकरीत डोळे उघडणारी कथा-मालिका…. अर्थात ही कथामालिका मोठी आहे त्यामुळे subscribe नक्की करा आणि वाचत राहा..

💝लग्नबंधन💝”

©inspireinmarathi.com

💝 भाग#1💝

“काय,मामा तुम्ही पण नसेल करायचं हिला लग्न तर कशाला मागे लागलाय,पहिला असेल तिने कोणी” प्राजक्ता म्हणाली…

तसे राघव म्हणजे मामा ने तिच्याकडे पाहिलं आणि गाडीचा दरवाजा जोरातच आपटतच म्हणाले,

“चला सगळे”….

प्राजक्ताच्या बोलण्याने गाडीमध्ये सगळी शांतता होती.. आता कधीही… काहीही होऊ शकत होते… 

तशी ती पण शांत बसून परिस्थितीचा अंदाज घेत होती… 

“आता बाबा काय म्हणला तर काय सांगू??? माझ्याकडे काही कारण ही नाही… प्राजक्ता ताई ने तरी कशाला अस काही म्हणायचं… माझं लग्न आहे करेल ना मी… सांभाळून घे गणू मामा…( गणपती बाप्पा).. सगळं तुझ्याच हातात… “माया स्वतःशीस बोलत होती..  तिच्या बाबांकडे पाहत होती.. 

त्यांच्या चेहऱ्यावरचा अंदाज घेत होती… 

पण राघव अगदी शांत होता… लग्नामुळे तिच्यावर अजिबात चिडला नव्हता.. 

गाडी मध्ये कोणीच काही बोलत नव्हते… एकदम शांतता… 

“सगळीकडे जावं तिथे लग्नच… वंसनी तरी समजून घेतल ते तरी बर झालं… पण प्राजक्ता ला काय बोलायची गरज होती… ” मोनाली मनातल्या मनात बोलत होती..  

मोनाली म्हणजे राघवची बायको आणि या दोघांची मुलगी म्हणजे माया…. 

माया दिसायला फार काही आखीवरेखीव नव्हती पण.. दिसायला मात्र आकर्षक होती… अभ्यासात जेमतेम.. पण स्वतःला सिद्ध करण्याची उमेद मात्र होती.. आणि लग्नाला नाही म्हणायचं कारण तेवढंच होते.. तिला करिअर करायचं होते.. पण विचार पक्के नसले ना की.. के करायचं तेच समजत नाही… तसाच काहीसं… फक्त करिअर बनवायचं आहे पण कशात तेच कळत नव्हतं… 

आणि बाकी कडे सगळ्यांना मात्र हेच वाटत होते की लग्न करायचं नाही म्हणल्यावर नक्कीच काहीतरी भानगड असेल हिची शेवटी मुलगी पुण्यातील ना!! 

म्हणजे याचा अर्थ असा मुळीच होत नाही की,सगळ्या पुण्यातील मुलीच्या भानगडीच असतात म्हणून…

फक्त निखळ शांतता होती,आणि प्रत्येक जण स्वतःच्या विचारात गढून गेलं होतं… 

अस नव्हतं की मायाच्या लग्नाला नाही म्हणायचं कारण सगळ्यांना माहीत नव्हतं म्हणून… 

सगळयांना माहीत होते की तिच्यासाठी तीच स्वावलंबी बनायचं होते… स्वतःची ओळख निर्माण करायची होती… तिला स्वतःला माया या नावाच्या पुढे फक्त नवऱ्याचे नाव लावायचं नव्हतं तर एक तिच्या कामाचा.. तिच्या कॉलिफिकेशन चा टॅग पण तिला होता… तीच तिची ओळख होती…जी तिला बनवायची होती… आणि हे फक्त त्यालाच समजू शकते,ज्याच्यात स्वतःला सिद्ध करण्याची धमक आहे…

विचारांच्या तंद्रीतून अचानक फोन ची रिंग  वाचली… 

“बोल ना,दादा… काय म्हणतोस??” राघव

“कुठे आहेस??? मला बोलायचं होते ” दीपक… राघवचा मोठा भाऊ.. आणि मायचे मोठे चुलते.. 

“आताच ताईच्या घरून निघालो आहे,पुण्याला जायला निघतोय” राघव…

“बर,अस कर तू या मार्गी येऊन जा,थोडं काम आहे” दीपक
“काही सिरीयस नाही ना रे” राघव..

“तू आल्यावर बोलू, फोन वर नाही सांगता येणार” दीपक 

“बर ,आलो ” राघव..

“बर,झालं काकांचा फोन आला.. आता बाबा माझ्यावर ताव नाही निघणार”माया मनातल्या मनात म्हणतच खुश झाली..

“काय झाल ,काय म्हणत होते भाऊजी ?? गावी जायचं आहे का?? ” मोनिका म्हणाली..

“हम्म” राघव..

अजून पोहचायला वेळ होता… म्हणून मायाने झोपणं पसंद केलं…

“चला,रे.. माया..ए पिल्लू चला उठ” राघव हलकच माया ला उठवत म्हणाला…

“हम्म,चला… आलो का आपण” माया..

“चल” मोनिका….

सगळे घरात जातात तर वातावरण अजूनच शांत होते… सगळ्यांचे चेहरे गंभीर होते… नेमकं काय झालंय याचा काहीच अंदाज बांधता येत नव्हता…

“काय झालं वहिनी” मोनिका…

“चहा घे .. मग बोलू निवांत”लता म्हणाली.. 

म्हणजे मायाची काकी आणि दीपक ची बायको… 

सगळे निवांत बसतात…. माया पण बसते… कारण नीता पण तिथेच असते ना…. 

“हिला समजावून सांगा जरा… माझं तर काहीच ऐकत नाही” दीपक म्हणाला…

“काय म्हणून केलं नाही हिच्यासाठी आणि ही” तशा लता काकी रडायला लागलाय…

“अहो,काय झालं वहिनी” राघव..

“मुलींना शिकवल पाहिजे,हा अट्टहास माझाच होता… मला नाही शिकायला मिळालं म्हणून म्हणले ,हिला आणि माया ला शिकवायचं… ” तशा लता अजूनच रडायला लागल्या..

“आता माझं काय मधेच… शट यार.. “माया डोळे फिरवत मनातल्या मनात म्हणाली…

“मग,” राघव…

“अरे,हिला एक पोरगा आवडतो आणि करतो काय तर हॉटेल मध्ये एक मामुली वेटर आहे.. आणि तिला हिच्याशी लग्न करायचं आहे म्हणे” दीपक आवाज चढवतच म्हणाला..

राघव गंभीर होत पाहता होता..त्याची पहिली नजर नीता वर न पडता माया वर पडली..तस मायाने मानेनेच नाही म्हणून मान हलवली… 

जणू राघव मायालाच विचारात होता… तुझं काही नाही ना असं म्हणून… 

कस आहे ना,शेवटी गव्हासोबत खडे पण रगडले जातातच की…

“नीता,काय हे… म्हणजे ही अपेक्षा मी कधीच ठेवली नाही माझ्या मुलीकडून मी… कुठे कमी पडलो का आम्ही” राघव… 

“माझं प्रेम आहे त्याच्यावर” नीता रडत म्हणाली… 

“बर आणि त्याच” राघव… 

“हो,त्याच पण आहे…” नीता

 “बोलावं त्याला भेटायला.. उद्या भेटू आपण सकाळी… “राघव..

“अरे ,तू हे काय बोलतोस… ” दीपक म्हणाला..

“तुमच्या मुलीने अस केलं असते तर तुम्ही पण लगेच जावई बनवून घेतल असते का??? लता रागातच म्हणाली… 

“तुम्ही चुकीचं समजताय त्यांना” मोनिका म्हणाली..

“नका काळजी करू,या जागी माया असते ना तरी मी हेच केलं असते… आणि नीता आणि माया माझ्यासाठी तेवढ्याच महत्वाच्या आहेत… ” राघव..

” मला माहित होते,काका च मला समजून घेईल म्हणून मी बोलवायला लावलं..  नाहीतर आम्ही कधीच पळून गेलो असतो” नीता खूप रागात आणि तोऱ्यात आई- वडिलांकडे पाहत म्हणाली..

तस दीपक हात उगारतच तिच्याकडे निघाला.. 

“दादा,थांब.. मी आलोय ना…. ” राघव…

“नीता आणि माया .. तुम्ही जाऊन झोपा… ” राघव ने मायाला डोळ्यांनी खुणावले.. 

“बहुतेक बाबाला काहीतरी सांगायचं आहे मला” माया स्वतःशीच पुटपुटली… 

“बाबा,चला ना बाहेर.. माझी बॅग… ” माया..

“चल…. हे बघ तिच्याशी बोल… म्हणजे काय प्लॅन आहे ते समजून घे.. तो मुलगा खरच प्रेम करतोय का ?? की अजून यांच्यात काय झालंय का?? मला सकाळपर्यंत सगळी माहिती हवी आहे… आणि निताची काळजी घे.. फक्त तिला तिच्या प्रेमाच्या विरोधात किंवा तिच्या विरोधात काही म्हणू नको.. तिला समजून घे… मी पुढचं पाहतो… तिने काही चुकीचं पाऊल नको उचलायला” राघव मायाला समजावून सांगत होता…

“हो ,बाबा… आणि तू खरंच भारी आहेस”मायाने जवळ घेतलं…

“काळजी घे” राघव म्हणला…

माया नीताच्या रूम मध्ये जाते… 

तर नीता फोन वर बोलत होती…

“मी सांगितलंय घरी सगळं…. उद्या भेटतील सगळे तुला.. काका आला आहे म्हणल्यावर तो नक्की आपलं लग्न लावून देईल.. “नीता बोलत होती.. 

तस माया आत आली.. आणि बेडवर जाऊन पडली.. 

“बाबा ने किती अवघड काम दिलय राव मला” माया डोळे झाकून विचार करत होती.. 

“बर झालं तुम्ही आलात” नीता मायाला म्हणाली..

” हो,ना.. बर नाव तरी सांग की आमच्या जिंजूंचे ” माया थोडं लाडात म्हणाली.. 

“तुषार” 

“छान आहे नाव.. काय मला ना आज तुमची सगळी लव्हस्टोरी सांगायची आहे आणि हो तुमचे फोटो पण.. तुमच्या सगळ्या गोड आठवणी आणि मस्ती पण.. आणि अजून पण काही असेल तर…अं…. अं….” माया थोडं कोड्यात आणि डायरेक्ट विषयाला हात घालत म्हणाली…

“हो का… तुझं पण आहे का कोणी”नीता म्हणाली… 

“हे काय नवीन… ही माझ्यावर काय घसरते..”माया स्वतःशीस म्हणाली..

” अग, तू सांग..माझ्याकडे कोणी पाहत तरी असेल का… तुला माहीत आहे ना… तू एव्हढी सुंदर दिसतेस.. आम्ही काय??? ते सोड… चल ना सांग लवकर.. अंडी आधी फोटो दाखव…”माया म्हणाली…

“हे ,बघ… फोटो… ” नीता…

“ओह.. मस्त ना राव” माया…

“नीता ,मला पाणी घेऊन येते का?? म्हणजे निवांत बसूयात” माया म्हणाली..

“हो आणते”नीता…

मायाने त्याचा फोटो फोन मध्ये काढला आणि मॅसेज पाहायला लागली.. मॅसेज एवढे होते की.. शक्यच नव्हतं सगळं वाचन… फोटो मिळतायेत का ते अजून पाहत होती… बेबी आणि शोना.. माय लव.. शिवाय दुसर काहीच दिसत नव्हतं…काही काही मॅसेज तर वाचले पण जात नव्हते.. दोघांचे बरेच फोटो एकत्र होते…ते सगळे राघवला पाठवणं शक्य नव्हतं.. 

“अजून फोटोच पाहतेय का???” नीता आली तशी माया अजूनच दचकली.. 

“हो ना,जीजू आहेतच एवढे भारी”माया कपाळावरील घाम पुसत म्हणाली..

“हे घे पाणी” माया पाणी पीत खिडकीसमोर गेली आणि राघवला,तिच्या बाबांना फोटो पाठवले… 

“तुला सांगू,तुषार ने मला माझ्या पडत्या काळात खूप सांभाळून घेतलं ग…मला प्रेमात नव्हतं पडायचं ग… पण ना मला जेव्हा जेव्हा एकट वाटलं ना… तेव्हा मी त्या हॉटेल मध्ये जायचे कॉफी घायला… आणि त्याची स्माईल आणि त्याची विचारपूस धीर देऊन जायची… कधी कधी असं होते ना ग,की आपल्याला खूप एकट वाटत.. आपले आई -बाबा पण आपल्याला सांभाळून घेत नाही.. मैत्रिणी पण हश्या करतात…आणि मन एकट पडत… माझं पण तसाच झालं होतं… माझं मन तुटलं होते.. मला खरच बोलायचं होते.. मोकळं होयच होते… आई ला बोलण्याचा प्रयत्न केला.. पण तिने समजावून च नाही घेतलं..आणि बाबा एवढा रागीट आहे त्याला काय सांगणार… मी एकटिच असायचे… मग रोज कॉफी घेताना… त्याची स्माईल… त्याचे विचारपूस… तो रोज एक छान मॅसेज मला टिश्यू वर लिहून देत असायचा.. पॉसिटीव्ह वेव्ह…मग मला तो आवडायला लागला… आणि आमच्यात प्रेम झालं.. मैत्री झाली… कधी कधी खूप भांडण पण झालं… आणि आता ना मी खरच कोणाचा विचार नाही करू शकत त्याच्याशिवाय” नीता बोलत होती… 

तेवढ्यात मॅसेज आला… नीताने फोन हातात घेतला..

“हे बघ त्याचाच मॅसेज आहे” नीता…

“हम्म,तू बोल मी बाहेरून चक्कर मारून आले” माया जड डोक्याने उठली…

“बाबा,तू बाहेर ये” माया ने राघवला मॅसेज केला…

माया आधीच बाहेर येऊन थांबली होती…

“बाबा,तीच खर प्रेम आहे…म्हणजे त्याने तिला समजलं आहे असं तिला वाटतय.. पण तो???? त्यांच्याविषयी काहीच सांगता येत नाही.. पण त्याला हीच सगळं माहीत आहे…. पण हिला फक्त तोच माहीत आहे… खूप ना विचित्र असते राव प्रेम… तीच पक्के झालाय.. लग्न ती त्याच्याशीच करणार आहे…” माया अगदी जड डोक्याने सांगत होती…

क्रमशः

Share to ....
0 0 votes
Article Rating

Leave a Reply

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x
%d bloggers like this: