शाळेची नवलाई!!!
“माझं मन च नाही लागत…. राहील की नाही ती… एक मिनिटं पण कधी माझ्या पासून लांब राहिली नाही… आम्ही दोघी म्हणजे आमचं विश्व… तिथे गेल्यावर.. सगळे नवीन.. मी जशी काळजी घेते घरी तशी घेतील ना तिथे??? जेवण तरी नीट करेल ना?? म्हणजे मला नकोच झालाय,विचार करण्याचा…. नवीन शहर आहे.. नवीन सगळं..नवीन माणसं.. तस जवळच पण इथे कोणी नाही… मी पाहू का?? मला जॉब भेटतोय का तिथेच??” कामना…
” माझं एकतेस… झोप आता… नाहीतर पहिल्याच दिवशी तिला उशीर होईल” तेजस…
“हम्म… विशेष आहे काहीच वाटत नाही तुम्हला… एकदा आई होऊन पहा…. “कामना रागातच तोंड फिरवून झोपली…
जणू नित्या तिची एकटीची जबाबदारी आहे ,असच तिला नेहमी वाटत होते… आणि पहिले बाळ.. त्यामुळे तर तिला अजूनच… जास्त गोंधळल्या सारख वाटत होते…
” काही केल्या झोप येत नाही,उद्याचा दिवस…”कामना च्या डोक्यात विचार चालू होते.. म्हणून की काय तिला झोपच येत नव्हती..
दुसऱ्या दिवशी सकाळी….
“अग, आई… उठ ना!!! ” नित्या..
“हो, तू एवढ्या लवकर” कामना..
“आज स्कूल आहे ना” नित्या..
तस कामना ने नित्याला जवळ घेतलं आणि तिचा पापा घेतला…
दोघीही उठतात… घाई चालू असते…
“मी सांगितलेले देते ना.. टिफिन ला.. ” नित्या..
“हो,देते.. पण टीचर ओरडातील ना!!! म्हणजे पौष्टीक द्यायला सांगितलं आहे ना… “कामना…
“हम्म… मग ग आई… ” नित्या..
“तस काही नाही होणार,आज अस पण तुझा पहिला दिवस आहे ना” कामना..
कामना तिला चॉकलेट सँडविच देते.. पाण्याची बॉटल.. बुक्स.. बॅग सगळं अगदी व्यवस्थित भरून देते…
“तेजस,तुझा पण नाष्टा बनवून ठेवला आहे.. नाही राहिली तर मला यायला उशीर होईल ना.. मग वाट नको पाहू.. मी तिला घेऊनच येईल.. ” कामना तेजस ला ओरडू ओरडून सांगत होती…
“हो… बाई..”तेजस…
स्कूलजवळच होते,घरापासून..म्हणून तिने चालत जाणं च पसंद केलं…
नित्या ने हाताला धरलं होते ,कामानाच्या…
नवीन युनिफॉर्म मध्ये नित्या खूपच मस्त दिसत होती.. छान त्याच रंगाचा हेअर बेल्ट… मस्त सॉक्स आणि शूज… मस्त टापटीप दिसत होती..
” कोणासोबत जायचं नाही… कोणी चल म्हणलं तरी जायचं नाही… कोणी खायला दिल तरी खायचं नाही… काही वाटलं तर लगेच टीचरला सांगायचं.. “कामना नित्याला सांगत होती…
“आई,हो नको ना काळजी करू… ” नित्या.. खूप आनंदित होती… तिच्यासाठी आजचा दिवस खूपच मस्त होता….
दोघींच्या गप्पामध्ये स्कूल जवळ येते….
शाळेच्या आवारात खूप सगळे रडत होते… शाळेत जायला नको म्हणून.. आईच्या हाताला धरून ओरडत होती..कोणी अंग टाकून लोळत होते.. तर कोणी अगदी शांत खेळत पण होती…
हे सगळं पाहून नित्याच्या चेहरयावर चे रंग मात्र उडाले होते…
नित्याला खरी खूप हौस होती,शाळेत जाण्याची आणि शिकण्याची… पण तिथलं वातावरण पाहून थोडे तिथं जाऊन पाय थबकले होते.. डोळयांच्या कडा ओल्या झाल्या होत्या… आईचा हात अजून घट्ट धरला होता… आणि नजर अजून भिरभिरत होती… शोधत होती… हरवली होती….
“बाळा, चला स्कूल आलं… हसत हसत जावा आता क्लास मध्ये.. मी आहे इथेच” कामना..
“पण आई हे का रडत आहेत सगळे”नित्या…
“त्यांना आवडत नाही ना,स्कूल मध्ये म्हणून… पण आमच्या नित्याला तर स्कूल खूप आवडते ना…. मग आमची नित्या हसत जाणार ,हो ना बाळा”कामना तिला समजावत च असते…
“हो,आई… ”
तस नित्याने तिचा हात सोडला आणि लुटूलुटू पायऱ्या उतरत खाली जाते…
कामानाला वाटत असते की तिने एकदा तरी मागे पाहावं…. बाय करावं…
“प्लिज पिल्लू माग बघ.. ” कामना मनातल्या मनात म्हणत असते…..
“अरे,बाळा चल इकडे ये….तुझं नाव काय” स्कूल च्या चेअरमन सरांनी नित्याला बोलावल….
आणि नित्या पळतच गेली… अगदी मागे न पाहता…
“नाव काय तुझं” सर
“नित्या”
“कस वाटतय स्कूल” सर…
“खूप छान,पण मला फक्त खेळायचं आहे”
“हो,नक्कीच”
सरांनी नित्याला उचलून घेतल… तिचा गालावर पापा घेतला…
“ते बघ, तुझी आई अजून आहे,बाय केलं का तू??? “चेअरमन सर..
“अग, आई तू जा ना घरी.. इथे का थांबली आहेस…. तू अजून का गेली नाहीस??”नित्या जोरजोरात ओरडत म्हणत होती….
कामनाचे डोळे पाणावले होते..
“नक्की जाऊ ना मी”कामना..
“अहो मॅम.. ती स्वतः म्हणतेय.. एवढ्या सगळ्या वर्षांमध्ये ही पहिलीच विद्यार्थी मी पाहिले आहे…. तिचा पहिला दिवस आहे ना.. तरी देखील बघा किती बोल्ड आहे.. तुम्ही नका तिची काळजी करू… अगदी निवांत रहा… आणि घ्यायला या” सर…
“हो ना,मला पण वाटलं नव्हतं… पण असो… लक्ष राहू द्या… बाय नित्या…” कामना..
“बाय बाय आई” नित्या…
कामना घरी आली…तेव्हा तेजस उठला होता…
” अरे,तू आलीस…. स्कूल मध्ये नाही थांबली का??” थोडं चिडवतच म्हणाला…
“हम्मम… तुमची मुलगी मोठी ब्रेव निघाली ना… उलट मलाच जा म्हणते माघारी” कामना..
“आई,एवढी ब्रेव आहे म्हणल्यावर मुलगी का नसणार आहे.. मी कधी बोलून दाखवत नाही पण तू खरच खुप ब्रेव आहे… म्हणून मुलांचा सगळा भार तुझ्यावर टाकून निवांत मी ऑफिस सांभाळतो…. ” तेजस…
तसे कामना ने तेजस ला मिठी मारली…
शाळा हे प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे… पाहिलं शाळेत म्हणजे अगदी सहा वर्ष पूर्ण झाल्यावर… जायचं पण आता तस काही नाही..आता अगदी अडीच वर्षे झाली की जातात… शाळा काय असते.. कितीही मोठं झालं तरी पहिल्या शाळेची घंटा ही नेहमी लक्षात राहते… जीवनाला खर वळण भेटते ते शाळेमुळेच… वाचायला… लिहायला.. शब्दांची ओळख करायला..मित्र-मैत्रिणी जोडायला..एक चांगला माणूस होण्यासाठी शाळेचा खूप मोठा हात असतो.. जीवनात आपण काय झालो हे शाळाच्या संस्कारावरूनच ठरते…. शाळेचे पाहिले दिवस खूप मजेशीर आणि संस्कारित असतात…“