मराठी कथा-कादंबरी-लेख Blogs- Entertainment- Travel- Food

"वाचत राहा,जगण्याला प्रेरणा मिळण्यासाठी📖 Stories| Reviews| Entertainment | Greetings | Travel | Food

कथा-कादंबरीकथामालिका

लग्न बंधन भाग#2

💝भाग# 2💝
“बरं.. बघू आता उद्या… जा झोप आता तू… एवढी माहिती पुरेशी आहे”राघव म्हणाला..
“ठीक आहे ,बाबा..परत काही असले काम नको देऊ बाबा” माया त्याला कुशीत घेऊन म्हणाली..

“मायाला काय माहिती जर नेहमी डोळ्यांना दिसते ,ते खरच असते म्हणून.. प्रेम खर असले तरी जबाबदारी चे भान पण असायला हवं च ना!!”राघव मनातल्या मनात बोलत होता…

माया नीताच्या रूम मध्ये जाते,तो पर्यत नीता झोपली असते.. फोन तसाच कानाला होता..
माया ने फोन बाजूला केला आणि तिला नीट झोपवलं..
“काय पण प्रेम असते ना??? मला तर पडायचं च नाही” माया स्वतःशीष म्हणते आणि झोपी जाते…

राघव इकडे बोलू लागतो..
“दादा,मुलगा चांगला दिसतोय…” राघव
“दिसून पोट भरणार आहे का??” लता..
“नाही,पण.. लग्नाला विरोध करून त्यांनी चुकीचं पाऊल उचलायला नको” मोनिका..
“हो, ते पण आहेच”दीपक…
“प्रश्न असा सोडवूयात की त्या दोघांना समजलं पाहिजे” राघव…
” त्यांच्या नात्याची पारख करायला पाहिजे” राघव..
“असं, करूयात उद्या भेटुयात आपण…. ” दीपक
“त्यापेक्षा ,आपण आधी त्याची पारख करूयात आणि मग ठरवुयात” मोनिका..
“हे पण चांगलं पाहिजे…. पण या सगळ्यात नीता आणि तो ,तुषार बोलता कामा नये…” राघव…

“पण मला मुलगा पसंद च नाहीये, तर हा सगळा व्याप कशाला???” दीपक चिडून…
“मग तुझं काय म्हणणं आहे???” राघव..
“सरळ त्याला दम द्यायचा आणि पोलिसांचा धाक दाखवायचा..मग नादीच नाही लागायचा ना,तो” दीपक म्हणला…
“ते पण आहेच रे, पण पुढे नीता कशावरून लग्नाला तयार होईल.. आणि जरी आपल्या मर्जीने ती तयार झाली आणि पुढे काय बर वाईट झालं तर” राघव…
“पुढचे पुढे बघू,पण आता जावई म्हणून मला मुलगा पसंद नाही”लता…
“पण मी काय म्हणतोय मुलाला पाहायला ,त्याला भेटायला काय अडचण आहे… नका करू लग्न… ” राघव…
“हम्म,दाखवतो त्याला उद्या… नादाला लावलं काय माझ्या मुलीला”दीपक….

सगळे झोपायला निघून जातात…
“काय होईल,तुम्हाला काय वाटते????” मोनिका…
” फक्त तो वेटर आहे म्हणून त्याला नाकारता नाही येणार.. जर त्याच खरच प्रेम असेल तर तो नक्की यशस्वी होईल ना??? अस ही आपल्यातील च आहे… बघू उद्या त्याच्या घरी पण जाऊन पाहतो… ” राघव…
“पण तिने हे नव्हतं करायला पाहिजे”मोनिका…
“गोष्ट होऊन गेली आहे,त्याचा आता विचार करण्यात काहीच अर्थ नाही.. विचार तेव्हाच केला पाहिजे… त्यासाठी ना संवाद हा असला पाहिजे.. बोलणं झालं पाहिजे अगदी तिच्याशी सगळ्यांचं बाबतीत…अगदी मोकळ्या मनाने…” राघव बोलत होता…
“हो ना,आज नीताला आई वडिलांपेक्षा पण प्रेम म्हणत्वचा वाटतय.. उद्या ती घर सोडून द्यायला पण तयार होईल”मोनिका चिंतेत बोलत होती..
“हम्म,झोप आता.. जेवढा विचार करशील तेवढं त्यात अडकशील” राघव
“हम्म, झोपा” मोनिका…

दिवसासोबत समस्या सुटत नाही…. थोडा वेळ भेटतो..जे झालय त्याच्यावर बोलण्यात काहीच पॉईंट नसतो पण उगीच ते चघळत बसण्याची हल्ली संस्कृती झाली आहे… तसच काहीसं आहे..प्रेम विवाह कधीच यशस्वी होत नाहीत म्हणून ते केलेच नाही पाहिजे.. असा समज पण असणारा काळ होता… तेव्हा प्रेम विवाह होणं शक्यच नव्हतं.. आता परिस्थिती जरी सुधारली असली तरी…प्रेमाला सिद्ध करावं लागतंय..

सकाळी….
“राघव आणि दीपक जायला निघतात…. “
“आधी आपण घरी जाऊ डायरेक्ट” राघव..
“हो,चल” दीपक…

“हॅलो,ते तुला भेटायला येतायेत तू हॉटेल मध्येच आहेस ना???” नीता फोन वर बोलत असते..
“हो ,आहे” तुषार..

“नीता… नीता…. ” माया आवाज देत येते…

“बोल ना काय झालं, ” नीता..
“मला सारख मनात येतंय म्हणून विचारतेय,लग्न झाल्यावर कस भागावनार ग.. तुला तर इथे एवढं सगळं आरामात राहण्याची सवय आहे मग तिकडे… ” माया न राहून बोललीच..
“काही नसते ग ,तस… तो सोबत असला की सोपं होऊन जाईल” नीता…
“तू त्याच्या घरी गेली आहेस का???” माया..
“नाही ग,पण का ग” नीता..
“मग लग्न झाल्यावर तुला तिथेच राहावं लागणार आहे ना??” माया…
“हम्म,तू नको लोड घेऊ”नीता..

राघव आणि दीपक त्याच्या घरी जातात…

“तुषारचे घर हेच का??? ” राघव..
“हो,तुम्ही कोण” देवकी.. तुषारची आई..
“आम्ही हॉटेल मधून आलोय” राघव…
“या… हे तुमचं घर का?? ” दीपक..
“हो,आमचं गरिबाच किती मोठ असणारा आहे” देवकी..
“तुषार चे वडील” दीपक..
“ते कोणाला माहिती…. पडले असतील दारू ढोसून” देवकी…
“घरी अजून कोण असते??” राघव..
“दोन मुली आहेत, एक गेली आहे पळून आणि दुसरी शिकतेय काम करत करत” देवकी..
“तुषार चे शिक्षण पण चांगलं झालाय” राघव..
“कुठं शिकलाय तेव्हा.. हॉटेल करता करता.. रात्रीचे शिकतो..” देवकी..
“चहा घ्या”देवकी..
“नाही नको,दीपक ने नाकाला रुमाल लावला”

“निघतो आम्ही”राघव..
घराचे पाच – सहा फोटो काढले… आणि हॉटेल मध्ये जायला निघाले..

हॉटेल मध्ये गेले की त्यांनी चहा मागवला..
चहा तुषारलाच मागवला…
“आपण बोलूयात शांततेत” राघव…
पण दिपकाचा पारा भलताच चढला होता…
तुषार समोर येताच त्याने त्याची कॉलर पकडली … आणि एक सणसणीत कानाखाली लावली..
त्याच्या ह्या भयानक वागणं पाहून हॉटेल मधील सगळे जण पाहायला लागले..
“आपण बाहेर जाऊयात” राघव..
त्याच्या कॉलर ला ओढतच तुषारला बाहेर घेऊन येतात..
“दादा,आपण शांततेत बोलूयात” राघव…
“तुला अजून पण अस वाटतय का???की ह्याच्या शी आपण बोलायला पाहिजे म्हणून” दीपक राघवला रागातच म्हणला…
“काय झाला, काका… माझं खर प्रेम आहे तिच्यावर” तुषार..
“आहे ना खर प्रेम मग सोड तिला आणि सिद्ध कर प्रेम”दीपक बोलून गेला..
राघव त्याच्या तोंडाकडे पाहतच राहिला…
“सोडणं प्रेम असते तर कधीच सोडलं असते मी… मला जगायचं तिच्या सोबत” तुषार..
“कुठे ठेवणार तिला लग्न झाल्यावर.. त्या गलिच्छ वस्तीत… जिथे नीट उभं पण राहू वाटत नाही… नीट बसायची सोय नाही तिथे….तुझा बाप कुठे लोळत पडतो ते ही तुला माहीत नसते… आणि तू….” दीपक बोलत असतो…
“हो,आहे.. माझं घर गलिच्छ… आणि माझा बाप कुठे पण लोळत असला ना तरी.. शेवटी जग त्याने दाखवलं आहे…. आणि प्रश्न राहिला तिला ठेवण्याचा ती तर माझ्या हृदयात आहे… अगदी खोल…. “तुषार बोलत होता…
” ए…. मजनू ची औलाद…. मापात राहा…. “दीपक…
“प्रेमात पडायच्या आधी ,सगळ्याचा विचार करायचा होता… काय आहे रे तुझ्यात.. नाही शिक्षण आहे.. आणि नाही चांगली नोकरी…. नाही राहायला घर… आणि राहिला विषय वडिलांच्या वर हातचा.. तर तो पण नाही तुझ्याकडे… प्रेमाने पोट भरत नाही… ” दीपक…
“पण मन भरत… समाधान भेटते.. आपलं पण मिळते” तुषार…

तस अजून दीपक ने कानाखाली वाजवली…
“मला तू जावाई म्हणून पसंद नाही…” दीपक जोरात ओरडून म्हणला..
“पुन्हा तिच्या आयुष्यात डोकवायच पण नाही”…

राघव शांत होऊन पाहत होता… त्याच्या डोळ्यात तेज होते…
पण जास्त काय म्हणार…
राघव शांत होता..
शेवटी मोठ्या भावाच्या रागापुढे तो काय म्हणार…..

दोघे घरी जातात…
नीता आतुरतेने वाट पाहत असते..
“नीता,तुझा फोन दे”दीपक..
“काय झालं बाबा… “नीता अगदी प्रांजळपणे फोन देते…
दीपक फोन घेऊन रागात रूम मध्ये निघून जातो….

“काका, काय झालं .. भेटला का तुषार??” नीता…
राघव तुषारच्या घराचे फोटो दाखवत म्हणाला…
“हे बघ फोटो आणि मला सांग कसे आहेत ते”राघव म्हणाला…
“हे कसले फोटो??? वस्तीतील दिसत आहेत… “नीता…
“हम्म,तुषारच्या घराचे आहेत,आम्ही घरी गेलो होतो” राघव…
नीता शांत बसते…
“आज नाही तर उद्या घर होईल ना रे!! काका.. ” नीता…
“हो,पण नाहीच झालं तर” राघव…

” अजून एक नीता… फक्त विचार कर की तुझी मुलगी हा हट्ट करतेय.. दारुड्या बापाच्या… चाळीत राहणाऱ्या.. गलिच्छ वस्तीतील मुला सोबत लग्न करण्याचा तर तू काय करशील” राघव म्हणाला…
“काका…. “नीता…
“तुम्ही जेव्हा येता ना, आयुष्यात… म्हणजे फक्त चाहूल लागते ना.. अगदी तेव्हा पासून… परी असता ग तुम्ही मुली… अशी परी.. जीचे डोळे जरी पाणावले ना तरी काळजावर आघात होतो ग… तुमचे लाड पुरवण्यासाठी ना.. कधी उपाशी पण झोपतो.. प्रत्येक बापासाठी मुलीच्या लग्नासारख दुसर कुठलंच स्वप्न नसते.. ते ह्यासाठी नाही की, ती बापाला ओझं असते म्हणून… त्याला फक्त तुम्हा मुलींना.. एक खरा जोडीदार द्यायचा असतो… जो तुमची काळजी घेईल.. आली कधी वाईट वेळ ,बाप जरी मदतीला नसला ना,तरी साथीदार चांगला हवा असतो… म्हणून बघता ना च ,बघून देतो.. चांगलं घर.. गाडी .. सगळ्या सुखसुविधा… पापा की परीला काही त्रास नको होयला म्हणून… सगळयांच्या विचार विनिमय करूनच ठरवल जाते… एखादं प्रतिष्ठित घराणं.. संस्कारित माणसं…
घराचा मान सन्मान… इज्जत.. प्रतिष्ठा.. अभिमान.. सगळं म्हणजे तुम्ही मुलीच रे… निस्वार्थी प्रेमाचं नाव आहे ग.. बाप-लेकीचं प्रेम.. ” राघव बोलत होता… बोलताना त्याच्या डोळ्याच्या कडा पण ओल्या झाल्या होत्या..
“पण काका,प्रेम कुठे असते,त्या मध्ये… तुम्ही ठरवून दिलेला मुलगा जर चुकीचा ठरला तर” नीता…

“पण पाहून देता ना तर चांगलाच देणार ना… ” माया न राहून बोलली..

“आणि बाळा,लग्नाच्या गाठी शेवटी देवानेच बांधलेल्या असतात… “मोनिका…

नीता रडतच रागात निघून गेली…

“थांब,माया…तिला एकटीला राहू दे” राघव…
“पण बाबा” माया….
“तिला समजून घ्यायला पाहिजे,बापाचे काळीज… महिना -दोन महिन्यांच्या प्रेमासाठी बावीस वर्षाचे संस्कार कधीच कमी पडता कामे नये.. आणि अस झालं तर नक्कीच तिथे संस्कार हरलेले नसतात तर संस्कार घेणारे कमी पडले असतात.. म्हणून तर एकाच आईची दोन्ही मूलं वेगळी असतात..असो… आता सगळं तिच्या समोर आहे… निर्णय तिला घ्यायचा आहे…. ” राघव बोलत होता…
“बरोबर आहे तुझं ,” माया म्हणाली…
“बर,बाळा आवर… संध्याकाळी निघायचं आहे आपल्याला” राघव..
“अहो,पण अजून इथले सॉर्ट झालं नाही” मोनिका..
“दादा ने ठरवलंय.. लग्न मंजूर नाही… आता नीता ची वेळ आहे” राघव…

Share to ....
0 0 votes
Article Rating

Leave a Reply

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x
%d bloggers like this: