लग्न बंधन भाग# ३
💝भाग#3💝
नीता निघून गेली….
माया राघवकडे पाहत होती…
“बाबा आता पुढे काय” माया..
“आता ,आपण नाही काही करायचं… नीताला याची जाणीव झाली हेच खूप झालं… आणि दादाचे प्रेम तिला कधीच चुकीचं पाऊल नाही उचलून देणार…. त्यासाठी संस्कार खूप महत्वाचे असतात… ” राघव..
“आणि बाबा प्रेम???? ” माया…
राघव तिच्याकडे पाहत असतो….त्याच्या नजरेच्या रोखण्यावरून तिने शब्दांची सारवासारव केली खर….
“म्हणजे बाबा म्हणतेय मी.. मी कधीच असं प्रेम केलं नाही म्हणून ना!!”माया बोलत असते…
तेवढ्यात दीपक बाहेर आला…
“दादा,नीताला समजावलं आहे मी,आणि तशी समज पण आली आहे… फक्त तिला थोडा वेळ दे… सगळ्या गोष्टी होतील सुरळीत….” राघव..
“हम्मम, तुझ्या पाहण्यात चांगला मुलगा असेल तर बघ.. उरकून टाकू हिचे …. “दीपक…
माया अगदी शॉक नजरेने काकांकडे पाहते….
“बर, मग निघतो आम्ही.. थोड्या वेळात.. कधी ही काही ही वाटलं तरी लगेच फोन कर…. येऊ आम्ही लगेच”राघव… दीपक ला मिठी मारत म्हणाला…
सगळे जण जाण्यासाठी आवरायला लागतात… निघण्याची वेळ झालेली असते….
“काकू,नीता दि ला मैत्रिणी सारखं समजून घ्याल ना…. तू माझी सगळ्यात भारी काकू आहेस म्हणून सहज म्हणलं” माया काकू म्हणजे लता ला मिठी मारतच म्हणाली..
“माझी अपेक्षा भंग केली आहे तिने… अजून मी तिच्याशी… “आणि रडायला लागली…
मोनिकाने डोळ्यानेच मायाला खुणावले… आणि शांत बसायला सांगितलं..
“सगळं मान्य आहे.. आई च पहिली मैत्रीण असते ना ग, मुलीची म्हणून…. आवरते मी… निघतोय आम्ही” माया…
माया निघून जाते… नीता कडे…
“वहिनी… काही झालं तरी तुम्ही तरी शांतपणे घ्या… भाऊजी आहेतच रागात पण .. तुम्ही… मला पण एक मुलगी आहे… मी समजते तुमची भावना… आणि नीता माझ्या मुलींसारखीच आहे ना… ” मोनिका…
“हम्म.. तुमचं पटतंय मला….जन्म दिलाय मी तिला…नाराज आहे मी तिच्यावर… तेवढा अधिकार आहे ना माझा… पण ती जे वागली आहे ते,मान्य च होत नाही मला…तरी घेईल मी समजून तिला.. ” लता डोळे पुसतच म्हणाली…
नीताच्या रूम मध्ये..
नीता उशित डोकं घालून रडत असते….सकाळ पासून काही खाल्लं नसते… काहीच कळत नव्हतं तिला… फक्त रडत होती… कोणाशी बोलत नव्हती… तिची अवस्था पाहून कोणाच्या ही पोटात गोळा येईल….
“नीता दि.. ऊठ ना…. अस रडून काय होणार आहे…. तू बोल ना… माझ्याशी… मी जाणार आहे आता.. आणि तुला असं रडत असताना माझा पाय पण नाही निघणार ग…. ” माया…
“मग काय करू.. प्रेम केलं नाही ना तू कधी कोणावर…म्हणून तुला नाही समजणार कधी… ” नीता..
“हो,मान्य आहे मला.. पण माझं माझ्या कुटुंबावर पण तेवढाच प्रेम आहे ग… ” माया…
” मी नाही राहू शकत ग,त्याच्याशिवाय…. म्हणजे विचारच करू नाही वाटत… ” नीता…
“मग पुढे काय ठरवलं आहे तू”माया..
“काय ठरवू, ऐकीकडे पापा आहे ,त्याची इज्जत आहे तर दुसरीकडे प्रेम आहे… ” नीता…
” अग, हो पण… जर मुलगा वेल सेटल असता तर मग नाही नसते म्हणलं ना ग कोणी तुला” माया…
“म्हणून म्हणलं तू प्रेम केलं नाही ना…. अग प्रेमात हे सगळं नाही पाहिलं जातं… फक्त प्रेम केलं जातं… साथ दिली जाते… एकमेकांनाचा आधार असते प्रेम…. ” नीता बोलत होती..
“पण तुम्हाला ते घरच्यांना पटवून दिले पाहिजे ना…. सिद्ध करता आले पाहिजे ना…. रडत बसण्यापेक्षा कर काहीतरी.. म्हणजे पळून वगैरे जाऊ नको… पण सगळ्यांच्या सोबतीने सिद्ध कर… त्याला सांग काही तरी कर….. “माया एवढं समजुतीच्या भावनेने सांगत होती…
“काय करू मी ?? आणि कसं करू… “म्हणतच नीता अजून जोरजोरात रडू लागली….
“माया झालं का?? चला…नीता बाळा काय झालं…
रडू नको ग…नक्की मार्ग निघेल…फक्त एवढंच सांगेल की काही च चुकीचं पाऊल उचलू नको.. काही ही करताना दादा आणि वाहिनीचा विचार कर… आणि तुझ्या सगळ्याच लहान भावंडांचा… कधी ही काही ही वाटलं तरी फोन कर मला… ” राघव तिला जवळ घेत म्हणाला…
जड पावलांनी आणि भरल्या डोळ्यांनीच माया, मोनिका आणि राघव निघून गेले…
सगळे त्यांच्या त्यांच्या रूम मध्ये निघून जातात आणि एक शांतता असते..
शांतता जशी घरात असते,तशीच शांतता गाडीत पण असते…
“प्रेम करणं चुकीचं आहे का?? मान सन्मानासाठी प्रेम चुकीचं आहे का??? प्रेमाला एवढा विरोध का करतात घरात सगळेच… नीता दि चे पाहून तर माझी इच्छाच नाहीये प्रेमात पडण्याची… तीच रडणं दिसत का नाही कोणाला… मला तर काहीच कळत नाही.. आज आहे तो वेटर.. आणि उद्या होईल ना तो हॉटेल चा मालक… मोठ्यांच्या वागण्यातील काहीच समजत नाही… ” मायाच्या डोक्यात विचारांचे चक्र चालू होती…
“दादा, कधीच या लग्नाला तयार नाही होणार… आणि मला पण नाही काही खरं वाटत … कोण देईल असल्या ठिकाणी आपली मुलगी…. उभं राहू वाटत नव्हतं… ” राघव चे हे बोलणं ऐकुन माया थोडी चिंतेतच गेली..
“मगाशी बाबा…नीताला ला समजावत होता… तिला पाठींबा देत होता आणि आता असं अचानक… ” माया च्या डोक्यात विचार आला…
“हो,ते पण आहे… मगाशी तुम्ही पण तर तिला साथ देतच होता ना??? ” मोनिका…
“हो,मला वाटलं तुम्ही तर त्याच लग्न पण लावून देताल” माया…
“कधीच नाही….तिला फक्त वाटावं की तिच्यासोबत आहोत म्हणून आधार देत होतो… पण लग्न त्याच्याशी नाही… बाप दारुडा… घर नाही नीट… हॉटेल मध्ये वेटर…आणि काय ती वस्ती…. शी… करून करून कोणावर केलं प्रेम… ” राघव…
“म्हणजे तुम्ही हे लग्न होवून च नाही देणार का?? “मोनिका..
“तीच नाही करणार बघ..…कळेल तुम्हाला लवकरच” राघव..
“म्हणजे बाबा चा पण तर लग्नाला विरोध आहे.. फक्त दाखवत होता… ” माया च्या डोक्यात विचार चालू होता…
” बाप काय असतो हे कोणाला समजण्या एवढं सोपं नात नाही ते…बाप नावाचा शब्द जेवढा भक्कम आहे ना तेवढाच त्याचा विचार पण पक्का असतो…”
तेवढयात मोबाईल वाजतो… मायाचा…. मॅसेज…
“ओह,गॉड.. बाबा उद्या फॉर्म सुटणार आहे आणि लगेच ऍडमिशन पण घेणार आहेत,बर झालं आपण आलो ते” माया राघव ला म्हणाली..
“बर.. घेऊयात.. किती फी आहे.. विचारून बघ .. डॉक्यूमेन्ट काय काय लागणार आहेत ते ,पहा….” राघव…
“किती वाजता जायचं आहे तुला उद्या” मोनिका..
“आई ,दहा वाजता जाईल… कॉलेज पाहून येते… आणि प्रोसेस पण… निशा ला घेऊन जाईल सोबत…”
“बर बर”
“दोन वर्षांचा कोर्स आहे ना???” राघव..
“हो,बाबा”
“परत”
“लगेच जॉब”
“हम्म”
नवीन कॉलेज… नवीन कोर्स… नवीन फ्रेंड… आणि अजून कोणाची तरी नवीन एन्ट्री……
नीताच्या विषयाला…. तिच्या प्रेमाला.. तिच्या लग्नाला… मात्र पूर्ण विराम भेटला… आता विषय दुसरीकडे वळला होता… अर्थात आता विषय माया चा आहे… नीता काय करेल किंवा काही नाही करेल… याचा गंभीर परिणाम पण मायाच्या आयुष्यावर होणार होता…
“माया.. मी पण येतो उद्या वाटलं तर तुझ्यासोबत” राघव…
“हो,चल ना..तू पण पाहून घे ना माझं कॉलेज ” माया….
“पहिलं कोणी आहे का ?? जुन्या कोणी मैत्रिणी ” राघव..
“नाही ना,कोणीच आले नाही बघ, एम.बी.ए. ला…. सगळे बाहेरचे असतील ना” माया…
“नवीन मित्र-मैत्रिणी करताना थोडं सांभाळून.. आपण कॉलेज शिकायला आलोय… मग फक्त शिकायचं.. अभ्यास करायचा आणि खुश राहायचं… बाकी कोणत्याच गोष्टी मला चालणार नाही… हा.. फक्त माझा मित्र आहे… किंवा…आमची फक्त ओळख आहे .. असलं काही नको आहे.. पाहिलं कॉलेजची गोष्ट वेगळी होती… तिथे तुम्ही पहिल्यापासून एकत्र होता… आता हे सगळं नवीन आहे… कितीही काहीही झालं तरी पाय घसरता कामा नये…तुझं सिम्बॉयसिस कॉलेज समोरूनच मी जातो नेहमी.. खूप मॉडर्न आहे.. कपड्यांच्या बाबतीत….विचारत मात्र शून्य आहे… तस काही नको.. मला” राघव… गंभीर सुरात मायाला सांगत होता…
“हो, बाबा.. नाही असं काही होणार.. मी काळजी घेईल” माया..
“बाबा… सगळं नीता मुळे म्हणले का मला??मी कशाला अस करू .. कधी नाही असं मी काही करणार ज्याने तुला त्रास होईल” माया मनातल्या मनात म्हणाली..
नवीन कॉलेजच्या दुनियेत हरवून गेली….