लग्न बंधन भाग#४
💝 भाग# ४💝
नवीन कॉलेज…. नवीन कॅम्पस.. आणि नवीन फ्रेंड्स पण…
“बाबा ,तू पण येतोयस ना माझ्यासोबत.. माझं झाले आहे…. मग आपण निघुयात का??? “माया..
“अस,कर आज जा तू…मला ऑफिस ला जायचंय… झालं माझं काम लवकर तर मी घ्यायला येतो तुला” राघव..
“बर … सोडशील का मला.?? म्हणजे तू येणार आहेस म्हणून मी… थोडं उशिरा निघाले होते…. गाडीवर जायचं आहे म्हणून”माया…
“बर… रोड ला सोडतो.. चल लगेच” राघव..
“अग, माया काहीतरी खाऊन गेली असतेस… ” मोनिका..
“नको ,आई लगेच येईल मी ऍडमिशन घेयच आहे ना फक्त…. ” माया..
माया आणि राघव निघून जातात कॉलेजला.. मनात एक वेगळीच भीती असते,अगदी दोघांच्या पण….
राघव साठी,नीता जे वागली ते विसरण शक्य नव्हतं… आणि माया पण त्याच वाट्यावर जाणार नाही ना?? याची त्याला काहीच खात्री अशी देता येत नव्हती…. विषय वयाचा पण तर आहे ना…. कॉलेज मध्ये या सगळ्या गोष्टी नाही होणार तर मग कधी होणार ना!!
विचारांमध्ये कॉलेज येते…राघव तिला सोडून जातो… जाता जाता तो अगदी कॅम्पस जवळून निरखत होता… स्वतःच्या मनाला तो समजावून सांगत होता…
“बापरे,कसलं कॉलेज आहे… सगळे बाहेर आलेले…जास्तच हाय-फाय आहे.. कपडे पण जरा जास्तच छोटे नाहीत का???? या सगळ्यात माझी तर जास्तच धडधड होयला लागली आहे… कसा निभाव लागणार माझा.. मला नाही वाटत माझं कोणी इथे फ्रेंड होईल म्हणून… “माया विचारात हरवून गेली होती….
सगळे येणारे जाणारे माया कडे मागे -पुढे वळून पाहत होते.. आणि का?? नाही पाहणार… शॉर्ट स्कर्ट च्या जगात तिने जीन्स आणि लॉंग टॉप घातला होता… जिथे सगळे क्रॉप टॉप आणि काहीतर फक्त….
हे सगळं मायासाठी थोडं जड जात होते…
“ऑफिस कुठे आहे आता कोणाला विचारू” माया मनातल्या मनात विचार चालू होते…
समोर बोर्ड दिसला.. जाऊन सगळी चौकशी केली.. सगळं व्यवस्थित समजून घेतले…पैसे भरण्यासाठी चलन पण घेतलं तिने… कॉलेज लगेच चालू होणार होते ,ते पण उद्या पासून…वेळ विचारून.. ती जायला निघाली…
समोरून मुलांचा ग्रुप तिच्या पलीकडील मुलीला पाहत होता…ती कोणाला पण आवडेल अशीच होती.. खूपच आखीव-रेखीव आणि नाजूक….आणि त्यात तिने शॉर्ट स्कर्ट घातला होता… फारच छान दिसत होती…
“तेच तर,माझ्याकडे कशाला कोणी पाहिलं… जाऊ दे आणि बाबा उगीच टेन्शन मध्ये येत होता… “माया स्वतःशी बडबडली आणि घरी निघून गेली…
“ती सुंदर मुलगी माया च्या डोळ्यासमोरून जात नव्हती… माया आरशा समोर पाहून स्वतःला न्याहाळत होती… खूपच गावठी दिसत असेल ना मी,जीन्स- टॉप वर पण… मी पण राहू का अस ?? नको.. बाबा… आई – बाबा समोर असले कपडे कसे घालणार ना! ते पण मांड्यापर्यंत… नको… स्वतःला भानावर घेऊन येतच विषय तिने… कायमचा बंद केला.. आता फक्त अभ्यास.. काही झालं तर बाकी काही नाही.. “
कॉलेज चालू झाल होते…क्लास मध्ये अजून कोणीच ओळखीचं नव्हतं.. सगळे बाहेरून असल्यामुळे तर अजून प्रॉब्लेम होत होता….पुण्यातील फक्त दोन-तीन होते.. त्यात त्यांचा जुना ग्रुप होता.. त्यामुळे तर अजून अवघड झालं होतं…
आता जवळ जवळ आठवडा होत आला होता… कोणीच फ्रेंड झालं नव्हतं… टिफिन पण एकटीला खावा लागत होता… या सगळ्यात मायाचे मन डिस्ट्रब होत होते.. आणि पुन्हा अभ्यासावर फोकस केलं जातं होते.. प्रॅक्टिकल.. आणि प्रोजेक्ट मध्ये दिवस जात होता..
त्यादिवशी.. प्रॅक्टिकल चालू होते..
माया शेजारी यावेळी एक मुलगा आला होता.. म्हणजे माया ने त्याला दोन -तीन वेळा पाहिलं होते पण आज जवळूनच!!
“काय झालंय हे होतच नाही” माया प्रॅक्टिकल करतच म्हणाली…
“हे अस नाही,अस आहे” तो..
“ओह,तरीच म्हणलं” माया..
“हो का” तो..
“हो ना”…म्हणजे… थँक्स” माया…
“नाव काय तुझं”..
“माया आणि तुझं… ”
“मी रणवीर”
“पुण्याचा का???”
“हो,नक्की.. एवढं छान मराठी बोलतोय म्हटल्यावर” रणवीर…
“हो ना,मी आल्यापासून मला एक ही फ्रेंड झाला नाही… नाईस टू मिट यु” माया…
“सेम हिअर” रणवीर…
प्रोजेक्ट सारख प्रॅक्टिकल संपलं होते…
“भूक लागली आहे खर… ” माया..
“चल मग कॅन्टीन मध्ये जाऊयात.. मला पण भूक लागल्यासारख झालाय” रणवीर…
“आज बर वाट्तेय बोलून… यार एक आठवडा झाला तरी मी एकटिच असायची… एक तर मला बोलायला खूप आवडते”माया..
“हो,ते दिसतंय.. सकाळ पासून बडबड करतेस” रणवीर..
“सॉरी, तुला त्रास झाला का??बडबडीचा” माया..
“नाही ग,बोल…” रणवीर..
“तू रोज दिसत नाहीस मला”माया…
“नाही येत मी रोज.. बोअर होते ना,म्हणून” रणवीर…
“मग नोट्स” माया…
“तू आहेस की”रणवीर…
“भारी जोक करतोस” माया..
“हा.. हा… चहा घेणार” रणवीर…
“हो मग,चहा नाही तर काहीच नाही” माया…
“बर झालं… कटींगला कोणी तरी पार्टनर मिळाला” रणवीर…
“पण,त्यासाठी तुला रोज यावं लागेल कॉलेजला “माया…
“तू आहेस म्हणल्यावर.. येणार ना नक्की” रणवीर…
“हो ना…बर चल.. लेक्चर चालू झाल असेल..”माया..
माया आणि रणवीर सोबत जातात.. आणि एकाच बेंच वर बसतात..
लेक्चर मध्ये पण माया त्याच्याशी बोलत होती..
“किती बोलतेस… ” रणवीर…
“हो ना ,राव”माया..
माया आणि रणवीर दोघे हसतात….
नोट्स नोट डाऊन काढत.. लेक्चर करत दिवस संपतो….
“चल बस आहे मला.. “माया…
“थांब ना थोडा वेळ” रणवीर..
“पुन्हा बस नाही रे मला… “
मी येऊ का सोडवायला”रणवीर
“नको.. तूझ्याकडे बाईक आहे ना!!” माया..
“हो,का ग.. ” रणवीर..
“अरे,काही नाही.. म्हणून तू थांबू शकतोस ना…” माया…
“अग पण सोबत नाही ना कोणी” रणवीर…
“हो का…. चल बाय…” माया…
“उद्या वेळे आधी ये.. एक कटिंग घेऊन जाऊयात”रणवीर…
“हो नक्की… पागल.. ” माया..
तसा रणवीर अजूनच हसला….
मायाचा आजचा दिवस तसा खूपच मस्त गेला..
आज कॉलेजला आल्या सारख वाटलं.. रणवीर भेटला त्यामुळे ती अजूनच खुश होती…
कोणीतरी हवं ना फ्रेंड म्हणून… रणवीर च्या विचारात कधी घर आलं तेच समजलं नाही….
“यार…केवढी बडबड करते ती… दिवस कसा गेला तेच समजला नाही…. आता कॉलेजला यायाल मजा येईल… एक फ्रेंड तरी झाली… शट शट… नंबर घ्यायला विसरलो ना.. म्हणजे निवांत वेळ गेला असता… ” रणवीर हसतच म्हणला….
दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद आज सगळयांना दिसत होता….
“कसा होता आजचा दिवस…आज थोडी खुश दिसतेस” मोनिका..
“काही नाही ग.. आई..आज ना मला..” माया बोलता बोलता थांबली…
“काय आज … ” मोनिका…
“अग, बस मध्ये बसायला जागा मिळाली” माया खोट बोलतच…
“बर, असं कर फ्रेश होऊन ये” मोनिका…
“हो, तेच….. ” माया…
“मी आईला खर का नाही सांगितलं… की रणवीर भेटला म्हणून… एक नवीन फ्रेंड झाला आहे म्हणून… नको सांगायला.. एक मुलगा आणि एक मुलगी कधी मित्र नाही होऊ शकत… अशीच वागणार आहे … आणि आता नीता दि मुळे तर आधीच त्यांच्या डोक्यात चालू आहे.. आता काही न सांगितलेले च बर आहे.. ” माया च्या मनात विचार चालू होते…
पण मायाच्या चेहरयावरचा आनंद काही केल्या लपत नव्हता….
“अग, आई मला ना आज,कॉलेज मध्ये एक बडबडी भेटली… “रणवीर घरात पाय ठेवतच ओरडत म्हणाला…
“कोण बडबडी???” सीता… रणवीर ची आई….
“अग, आहे आमच्या क्लास मध्ये.. एकटीच बडबड करत होती.. मग मीच बोललो… तिला कॉलेजला येऊन आठवडा झाला होता पण कोणी फ्रेंड नव्हती झाली….एकटीच असायची…. ” रणवीर…
” अरे वा!!!मग नाव काय आहे…सीता… रणवीर ची आई…
“माया”…. रणवीर..