मराठी कथा-कादंबरी-लेख Blogs- Entertainment- Travel- Food

"वाचत राहा,जगण्याला प्रेरणा मिळण्यासाठी📖 Stories| Reviews| Entertainment | Greetings | Travel | Food

कथा-कादंबरीकथामालिका

लग्न बंधन भाग# 5

💝भाग#5💝

“अग, आई मला ना आज,कॉलेज मध्ये एक बडबडी भेटली… “रणवीर घरात पाय ठेवतच ओरडत म्हणाला…
“कोण बडबडी???” सीता… रणवीर ची आई….
“अग, आहे आमच्या क्लास मध्ये.. एकटीच बडबड करत होती.. मग मीच बोललो… तिला कॉलेजला येऊन आठवडा झाला होता पण कोणी फ्रेंड नव्हती झाली….एकटीच असायची…. ” रणवीर…
” अरे वा!!!मग नाव काय आहे…सीता… रणवीर ची आई…
“माया”…. रणवीर..
“गोड आहे की नाव माया” सीता..
“हो,आणि ती पण… खूप बालिश आहे… अल्लड… साधी” रणवीर..
“हो का,मग मायाजाल मध्ये अडकला तर” सीता..
“अग, आई तस काही नाही.. फक्त मी सांगतोय तुला… आज तर ओळख झाली आहे… आणि नक्की चांगली मैत्रीण होईल माझी…. अस वाटतंय मला… बाकी पुढं काही दिसत नाही” रणवीर…
“काही झालं तर मला सांगायला विसरू नका”सीता..
“हो नक्की,तुला नाही सांगणार तर कोणाला सांगणार” रणवीर..
“बर,चला आवरा… मी खायला घेऊन येते.. आल्यापासून माया पुराण चालू आहे” सीता..
“हो ना, आलोच”रणवीर..

रणवीर च्या समोर माया होती… म्हणजे कोणीतरी या वर्षी मित्र नाही पण मैत्रीण तरी भेटली म्हणून तो पण मनोमन खुश होता.. तर तेवढीच खुश माया पण होती एक तरी मैत्रीण व्हावी.. अस तिला वाटत होते पण एक मित्र भेटला हे पण काही वाईट नव्हतं…
कॉलेज म्हणलं की असावं च लागत कोणी तरी… नोटस, प्रोजेक्ट… सेमिनार आणि बरच काही… आणि त्यात कॉलेज ची शेवटची वर्ष म्हणलं ना की प्रेमापेक्षा.. करिअरचे जास्त वेध लागलेले असतात.. तसेच दोघांचे होते…

राघव घरी आल्यानंतर…..
“आज स्वारी खुश दिसतेय.. ” राघव..
“हो ना बाबा, फ्रेंड झाली आज ” माया..
“अरे वा.. नाव काय तीच??आणि कुठे राहते”राघव…
“अरे नाव.. राणीका… आणि ते नाही विचारकले.. मला थोडं काम आहे… आले मी लगेच” माया…
“हो … ” राघव..

“सॉरी बाबा…मनात भीती आहे आणि तुम्हाला अजून विचार करायला भाग नको पडायला म्हणून मला खोट बोलायला लागले… खरच सॉरी बाबा.. रणवीर चांगला मुलगा आहे आणि आमच्यात अस काही नाही.. आणि कदाचित तुम्ही आमची मैत्री समजून घेणार नाही म्हणून सांगत नाही तुम्हाला… बाकी जास्त काही”माया हात जोडून एकटीच बडबड करत असते..
घरात नीता चे प्रकरण अजून मार्गी लागलं नव्हतं.. त्यामुळे माया ने… खर सांगितलं नाही…
कस आहे ना,एक मुलगा आणि एक मुलगी.. कधी मित्र नाही होऊ शकत.. हा समज ना खरच खूप चुकीचा आहे… हे लक्षात येण्याएव्हढी तरी माया च्या आई-बाबा ची पिढी समजूतदार नव्हती.. आणि जेवढी दुनिया त्यांनी पहिली होती तेवढी तर हेच दिसत होते की एक मुलगा आणि एक मुलगी कधी मित्र नाही होऊ शकत.. आणि जरी असले तरी एका बाजूने प्रेम हे होताच.. पण काय गरजेचे आहे का?? की ,हे प्रत्येकाच्या बाबतीत खरं व्ह्यायलाच पाहिजे म्हणून.. अस तर नाही..
प्रत्येकाच्या नजरेतून पहायचं म्हणलं तर दुनिया वेगळीच असते.. प्रत्येक जण प्रत्येकाच्या सोयीने… गरजेने त्या गोष्टीचा स्वतःच्या परिस्थितीने अंदाज लावत असतो.. आणि गंमत बघा ना.. ज्यावेळी आपल्याला स्वतःला निर्णय घेयाचा असतो ,स्वतःसाठी तेव्हा मात्र नेमकं आपण..दुसऱ्याचा सल्ला घेतो.. त्यांच्या नजरेतून त्या त्यांनी अनुभवल्या असतात आणि आपण त्या आपल्याला योग्य ठरतील अस मानत असतो … आणि हो बहुदा त्या योग्य पण ठरतात पण प्रत्येकाला नाही ना!!! असो..
हेच बघा ना… नीता कॉलेजला गेली आणि तिला मित्र झाला.. आणि त्याच्यावरच तिने जीवापाड प्रेम केलं आणि आता ती , त्याच्यासाठी सगळं घर सोडायला तयार झाली…. जे नीता ने केलं ते माया पण करेलच हे कशावरून ना???
पण नाही नीता ने केलं म्हणून माया पण तेच करेल…. म्हणून माया ला सगळे आधीच संशयाच्या नजरेतून पाहत असतात…
आणि याचा अंदाज माया ला असतो म्हणून नाईविलाजास्तव तिला रणवीर फक्त एक आज ओळख झालेला क्लासमेट असतो… अजून मित्र पण नव्हता झालेला… हे कोणी समजून घेईल तर खरं ना!!!

असो,माया ला रणवीर सारखा क्लास मेट भेटला होता..त्यामुळे अजून अभ्यासाला आता जोर लागणार होता…
“सुसंगती सदा घडो,सुजन वाक्य कानी पडो”
असच काहीसं!!!!

“आज कॉलेजला जायला थोडं छान वाटतंय” माया तयार होतंच म्हणाली…
“जाऊ दे, कोणी नसण्यापेक्षा ,कोणी तरी फ्रेंड आहे.. हे काही कमी आहे का…. “मायाचे विचार चालूच होते..
“आई ,मी जाते गं”माया…

माया अगदी हसतच,कॉलेजला निघून गेली… मन हसत होते… रणवीर आहे ना.. आता…. क्लास मेट आणि फ्रेंड पेक्षा जास्त कोणी कधी होणार पण नव्हता…
माया बस ने कॉलेजला जात असे,रोजच!!!

“अरे ,तू इकडे…. टपरी चक्क” माया रणवीर ला पाहून म्हणते..
“हो , तुझीच वाट पाहत होतो…चहा घेऊयात ना” रणवीर…
“हो ,नक्कीच… कधी आला तू??” माया
“झाले ,दहा मिनिटं.. तो अगदी टाइम वर येते” रणवीर…
“लवकर येऊन करणार काय,सो.. आपलं वेळेत” माया.
“हे…… ” रणवीर..
“नो,वेज… तू… घेतोस का???”माया…
“नाही… ” रणवीर…
“घेत असशील पण मी नको म्हणले म्हणून ना… आणि हे बर केलं … आय हेट स्मोकरर्स” माया..
“अग, हो… सोडली आज पासून…. म्हणजे तू सोबत असताना तरी… आता ते तू ठरवायचं आहेस मला कधी पर्यन्त सोबत देणार आहेस ते..” रणवीर हसत म्हणाला…
“हो का.. फ्लट करायला मीच मिळाले का??? ” माया.
“हो ना.. कॉलेजला आहे पण शाळेपेक्षा पण बेकार दिवस आहेत.. म्हणून म्हणलं थोडी मजा” रणवीर..
“चला क्लास चालू झाले असतील” माया..
“हो, पुढे.. ” रणवीर…

रणवीर आणि माया क्लास मध्ये एकत्र जातात.. आणि एकाच बेंचवर बसतात.. शांत बसतील तर कसले…
हे.. गप्पा चालू असतात…

अर्थात त्यामुळे सगळा क्लास डिस्ट्रब होत होता…पण त्यांच्या ह्या बिनधास्त वागण्यामुळे.. असाच एक बिनधास्त ग्रुप तयार झाला… हो..बिनधास्त टवाळ ग्रुप…. जो अगदी शेवटच्या तीन बेंचवर.. जवळ जवळ सहा जण होते…
आता खरी मजा येत होती…
मजा कसली.. फुल धिंगाणा.. एवढा गोंधळ आणि गडबड असायची की कधी कधी क्लास मधून बाहेर काढलं जायचं…आणि हो कॉलेज चे दुसरे काही काम असेल ना,जस काही इव्हेंट्स किंवा काही मोठे प्रोजेक्ट तेव्हा मात्र या ग्रुप ला पाहिलं बोलावलं जायचं..
माया आणि रणवीर मध्ये खूप चांगलं मॅनेजमेंट स्किल होते… तर सुप्रिया मध्ये वकृत्व होते.. सागर आणि पराग.. सांगकाम्या होते… तर प्रिया मात्र खूप अभ्यासू किडा…. यांना अधून मधून कधी कधी राधिका आणि रश्मी पण जॉइंट होत असायच्या… पण कधी तरीच… तशा त्या दिल्ली च्या होत्या दोघी.. या टवाळक्यांच्या मध्ये राहणं त्यांना थोडं जड जायचं…
एवढा सगळा ग्रुप नाही नाही म्हणत वाढत होता.. कोणी नवीन येत होते… थोडे दिवस थांबायचे परत सोडायचे… पण ही सहा जण मात्र शेवट पर्यन्त राहिली… पण माया मात्र त्यांना एका वर्षात निघून गेली…पण का???? असो…..

दिवसामागून दिवस जात होते.. माया आणि रणवीर यांचे नाते एकदम घट्ट बनत चाललं होते… सगळ्या कॉलेज मध्ये एकच अफवा होती… ती म्हणजे माया आणि रणबीर एक कपल आहे म्हणून.. मैत्रीच्या पलीकडे त्यांचं नात आहे ,हेच समजत होते…
पण खर सांगायचा तर याचा विचार नव्हता केला ,त्या दोघांनी पण… माया कडून तर अस काहीच नव्हतं… आणि मनात जरी विचार आला तरी घरचे कधीच तयार होणार नाहीत ,याची जाणीव होती तिला…..

त्यादिवशी..
कॉलेज मध्ये… लेकचर नव्हते… म्हणून सगळे कॉरिडॉर मध्ये बसले होते.. सगळे म्हणजे दोन्ही वर्षाचे… अगदीच सगळे होते.. . दुसऱ्या वर्षाचे सगळेच बसले होते…
“रणवीर, ही कोण आहे रे… जाम कडक आहे राव…. दिवसभर सोबत असते तुझ्या” राकेश रणवीर ला माया कडे पाहतच म्हणला..
“एक मिनिटं,कडक काय कडक…. थोडा आदर करू शकतोस तू… मला माहित आहे तू सिनिअर आहेस मला… पण प्लिज.. आणि ती फक्त माझी मैत्रीण आहे ,चांगली… आणि हो…तिच्याकडे घाण नजरेने पाहू नको” रणवीर अगदी शांततेत समजवायचा प्रयत्न करत असतो…
“तुझी फक्त मैत्रीण आहे तर,एवढं काय झोंबल तुला” राकेश…
“तुला सांगितलेले कळतं नाही का??? मी तुझा खूप आदर करतो… म्हणून अजून पण समजावून सांगतोय” रणवीर…
“पण राव मला ती पाहिजे” राकेश…

तेवढ्यात माया रणवीर कडे जाते..
“चल ना यार, कटिंग घेऊयात… खूप बोअर होतंय मला” माया…
“हम्म,चल”रणवीर…
“आम्ही पण येतो चल.. सगळेच जाऊयात”राकेश रणवीर ला म्हणतो..
माया राकेश कडे पाहून छानशी फक्त एक गोड स्माईल करते… सवयीनुसार..
“हाय” राकेश माया ला म्हणतो…
माया त्याला भाव न देता… पुढे निघून जाते..
“चल… ” रणवीर मागून येत म्हणतो…
“हम्म.. मला ना तो अजिबात आवडत नाही बघ.. जेव्हा पासून मी कॉलेजला आले आहे ना… तेव्हा पासून तो मला खूप वाईट नजरेने पाहतो… म्हणून…. ” माया बोलत होती..
“हे ऐकून न कळत का होईना… रणवीर ला मनात छान वाटून गेलं…आणि तो मगाशी आपसूकच कसे चिडलो ना… राकेश म्हणतोय ते खरं आहे म्हणा.. मैत्रीण आहे तर मग राग यायला नको ना… “रणवीर मनात विचारात होता…. काहीच न बोलता फक्त हसत होता….

“वेडा आहेस का?? मी काही सांगतेय तुला” माया…
“ऐकतोय ना… बोल.. “रणवीर..
“काही नाही… सोड… बर…ऐक ना.. सेमिस्टर एक्साम आल्यात.. स्टडी करावा लागेल ना…. ” माया..
“हो ना…. उद्यापासून च सुरवात करूयात… म्हणजे थोडं लवकर ये… सगळं व्यवस्थित करूयात”रणवीर…
“हो … एक्साम च्या आधी सगळं करूयात… “माया…
“हम्म.. लास्ट इअर ला …. कंपनी जॉईंट करूयात… म्हणजे माझा विचार चालू आहे… म्हणजे कॉलेज आणि जॉब दोन्ही पण… तुझं काय प्लॅन आहे… ” रणवीर…
“प्लॅन तर खूप आहे… कॉलेज पूर्ण झालं की… काही वर्षे जॉब आणि मग स्वतःची कंपनी…. स्वतःची ओळख.. माया…माझं नाव माझा ब्रँड असेल… ” मायाच्या या बोलण्यात पण खूप धमक होती… डोळ्यात तेज होते… आणि एक वेगळीच एनर्जी वाटत होती…. रणवीर तिच्याकडे पाहताच राहिला….
“अरे वा!!!!” रणवीर….
“पण त्यासाठी अभ्यास करावा लागेल ना…आणि चल आता चहा घेऊन झालाय ना!! नसेल लेक्चर तर गजर जाते मी” माया..
“थांब ना थोडा वेळ…”रणवीर…
“नको… उद्या लवकर येते… ” माया..
“किती लवकर.. पण… ” रणवीर…
“मॅसेज करेल…. ओके.. ” माया…..

Share to ....
0 0 votes
Article Rating

Leave a Reply

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x
%d bloggers like this: