मराठी कथा-कादंबरी-लेख Blogs- Entertainment- Travel- Food

"वाचत राहा,जगण्याला प्रेरणा मिळण्यासाठी📖 Stories| Reviews| Entertainment | Greetings | Travel | Food

कथा-कादंबरीकथामालिका

💝लग्न बंधन भाग#6💝

“नकळत का होईना,मन खट्टू झालं होते.. त्याचाच विचार चालू होता… छोट्या छोट्या गोष्टींमध्ये काळजी घेत होता… माझ्यासाठी रोज वाट पाहायचा.. सगळं शेअर करत होता…. म्हणजे छान आहे… मी जो विचार करतेय… तोच विचार तर नसेल ना, करत… काही माहिती…. उद्या विचारू का??? पण काय विचारणार त्याला… ” मायाच्या डोक्यात विचार चालू होते.. 

विचारात घर कधी आले, तेच समजलं नाही… 

“काय ग ,का??? हसतेस???कसला विचार करतेस”राघव.. 

“अरे तू, इथे.. ” माया..

“हो … माझी गाडी खराब झाली म्हणून बस ने आलो… तुला आवाज देत होतो तर लक्षच नव्हते तुझं” राघव… 

“म्हणजे तू माझ्या बस मध्ये होता का?? ” माया

“हो… चल… काही खायचे का???” राघव… 

“नाही नको,घरीच जाऊ” माया… 

माया अगदी शांत होती… म्हणजे तिला समजत नव्हतं… 

“बाबा ची खरंच गाडी बंद पडली होती का??? रणवीर मला सोडायला आलेला त्याने पाहिलं का??? बावळट रणवीर,फ्लाईंग किस द्यायची काय गरज होती?? ते पण नसेल ना पाहिलं… रणवीर चे फ्लट…माझं तर डोक जड आलं” माया स्वतःच्या विचारात झपझप चालत होती.. 

“अग, मी पण आहे… थोडं सावकाश चाल ना….” राघव… 

“हो ना,चल… तू कधी थकलास… चल पळत जाऊयात… ” माया…

दोघेही हसत पळत घरी आले… 

मायाच्या डोक्यात रणवीर पेक्षा आता… राघव चे विचार चालू होते… 

माया ने पाहिलं मोबाईल मधील त्याचे सगळे मॅसेज डिलिट केले… नंबर पण काढून टाकला…कॉल आणि सगळे काढून टाकले… आणि पहिला नंबर रिजेक्ट ला टाकला…. 

“मला तर वाटतय की, त्यांनी नक्की पाहिलं असेल मला…का ?? मी नको ते विचार करतेय..त्यांचा… विचारले तर सांगेल.. प्रोजेक्ट पार्टनर आहे म्हणून..शांत हो… अस काही नाही होणार जे तुला नको आहे.. ” माया स्वतःला समजावत होती… 

“पोहचल्यावर हिने मॅसेज का नाही केला… बराच वेळ झाला… फोन लावतोय तर… कट करतेय… रिप्लाय पण नाही…. ” रणवीर फोन हातात घेत एकटाच बडबड करत होता.. 

त्याच कशातच लक्ष लागत नव्हते… .

“काय आहे हे… जाऊ दे…. बडबडीला भेटले असेल कोणी.. मी कशाला एवढा विचार करू…. मी जातो खेळायला” रणवीर फोन चार्जिंग ला लावून निघून गेला…. 

माया राघव चा अंदाज घेत होती… आज माया तिच्या रूम मधून काही लवकर बाहेर आली नाही…प्रोजेक्ट घेऊन बसली होती… त्याचीच सारवासारव चालू होती… 

“आज आली नाही… बाहेर.. हे घे कॉफी” राघव… 

“हे बघ,किती पसारा आहे ना रे… ” माया…

“बर.. आवर… ” राघव ने जाता जाता तिचा फोन घेऊन गेला…. 

“ओह… नो.…….. म्हणजे पाहिलं” माया… 

” माझं तर कशातच लक्ष लागत नाही आता… कशाला फोन घेऊन गेला असेल… बाबा च्या डोक्यात काय चालू असेल… त्याने जर मला रणवीर बद्दल विचारले तर मी काय सांगू… मित्र म्हणले तर… कोणता मित्र फ्लाइंग किस देईल..रणवीर सोबतच्या मैत्रीने कॉलेज वर तर गदा येणार नाही ना??? ओह  नो…. ” माया रूम मध्ये येरझाऱ्या घालत होती.. चेहरा पूर्ण उतरला होता… 

“काय झालं…का फिरतेस…. ” राघव… 

“काही नाही… का रे…” माया… 

“हा घे,फोन.. माझा फोन डेड आहे…. दादाला फोन करायचा होता म्हणून…”राघव… 

“कसे आहेत गावाकडे सगळे…. आणि नीता चे काय झालं??” माया… 

“काय होणार… कॉलेज बंद आहे… मुलगा पहिला आहे… सुट्ट्यांमध्ये लग्नाची तारीख घेण्याचे चालू आहे” राघव… 

“हम्मम्म…. “माया.. 

“ये आवरून… जेवुयात”राघव… 

“हो आलेच…नीता दि ला फोन करायला पाहिजे… ” माया विचार करतच सगळं आवरत होती…. 

नीता दि च्या वागण्याने मायाच्या आयुष्यात हा बदल होता की?? या वयात सगळ्याच मुलींना सगळ्यातून जावं लागतं… हे प्रत्येक मुलगीच सांगू शकते… 

सगळे जेवून घेतात… 

“आई उद्यापासून मी लवकर जाईल… एक्साम्स आहेत ना… म्हणून सगळे मिळून अभ्यास करणार आहोत…. ” माया सांगते आणि अगदी गप्प च निघून जाते… 

“झोपायची वेळ झाली तरी हिचा अजून मॅसेज नाही.. आता हिला गुड नाईट चा मॅसेजच करत नाही… ” रणवीर स्वतःशीस बडबड करून झोपी गेला… 

“मन भरकटले का माझं??? रणवीर बद्दल अस विचार करून.. पण लग्न करायला काय अडचण आहे त्याच्याशी.. माझ्या स्वप्नांना तो नक्की समजून घेईल..पण तो मला फक्त मैत्रीण मानत असले तर… आणि त्याच्या घरील सगळं…याचा विचार केलाच नाही…. बघू आधी रणवीर सोबत बोलावं” माया रणवीर च्या विचारात झोपून गेली.. 

सकाळी आज खूप गडबड होती…तिच्या लक्षातून निघून गेले होते… रणवीर ला ब्लॉक केला आहे ते.. सकाळपासून ह्याचा फोन नाही…. मॅसेज नाही… म्हणून थोडं शांत होती… 

त्याचा विचार करतच ती कॉलेजला पोहचली….

समोर पहाते.. तर रणवीर सोबत एक अतिशय सुंदर मुलगी होती…. ते अगदी जवळ बसले होते…… तिने तीच डोकं रणवीर च्या खांद्यावर ठेवले होते.. आणि रणवीर फोन मध्ये…. 

“हाय…मी क्लास मध्ये जाते..”माया..

“का?? आज चहा नाही का???”रणवीर..

“हाय..” सुंदर मुलगी म्हणजे जीविका… 

” हाय”माया..

“हे बघ ही माया.. माझी बेस्ट फ्रेंड…”रणवीर… 

माया त्याच्याकडे पाहत राहिली.. 

“आणि जीविकाला जवळ घेत म्हणाला.. ही माझी अगदी कॉलेज च्या सुरवतीपासूनची मैत्रीण… भेटायला आली होती मला… मीच थांबवले तुला भेटून जा म्हणून.. ” रणवीर म्हणाला… 

“हम्म.. बसा तुम्ही… मी जाते…” माया निघून जातच असते… 

“हे माया… चल ना कटिंग घेऊयात”राधिका.. 

“हो ,चला…” माया… 

“तुला तर नको होता ना चहा,मग.. ” रणवीर तिला नजर रोखत म्हणाला.. 

तस मायाने तोंड वाकडं करून त्याला उत्तर दिलं… 

तस जीविका ने त्याला अजून जवळ ओढले… 

“हे कोण ध्यान आता.. ” सारिका ने हळूच विचारले… 

“जुनी मैत्रीण”माया… 

“फक्त मैत्रीण का ?? अजून काही… तुम्ही पण बेस्ट फ्रेंड्स आहात.. पण अस एवढं कधी चिटकलेलं नाही पाहिलं मी….” सारिका ने माया च्या डोक्यात पिन टाकली होती…. 

रणवीर च्या वागण्याचा तिला खूप राग येत होता… पण माया शांत होती.. 

सगळ्यांनाच्या गोंधळ चालू होता… ग्रुप मध्ये… पण माया आणि रणवीर फक्त एकमेकांना न्याहाळत होते… 

त्याच्या मनात वादळ आलं होते… 

“रात्रीपासून हिने मॅसेज केला नाही…. आणि आता पण अस का वागतेय” रणवीर च्या डोक्यात विचार चालू होते…

“मी जाते…. क्लास मध्ये” माया सगळ्यांना बाय म्हणून एकटीच निघून गेली…. 

क्लास मध्ये.. एकटीच बेंच वर डोकं ठेवून बसली होती… मनात विचार चालू होते…. 

आणि तेवढ्यात…. 

“मला वाटायचं तिचं माझ्यावर जीवापाड प्रेम आहे..

फक्त मी विचारायची देरी आहे…

मला ही ती प्रचंड आवडायची…

जेव्हा ती मला आपला बेस्ट फ्रेंड म्हणायची… 

मनातलं गुपित फोडायची..

लाडात येऊन बोलायची,

लटक रागावायची,

माझ्याशी भांडायची..

गप्पा मारायची..

माझ्या कविता ऐकायची..

त्यांना उत्फुर्त दाद द्यायची…

माझ्यावर प्रेम करायची…

पण मला माहित नव्हतं..ती मला..

फक्त आपला बेस्ट फ्रेंड मानायची…..””

रणवीर ने हेडफोन तिच्या कानात घातले होते… 

“छान आहे… हे सगळं खरं आहे का?? म्हणजे आर यु सिरीयस आबाऊट मी???? सेम लाईक पोएम??” माया त्याच्या डोळ्यात डोळे घालून विचारते… 

तसं रणवीर ने हेड फोन घेत म्हणाला… 

“वेडी.. ही मी नाही.. गौरव जोशी ची कविता आहे… तुझा मूड खराब होता ना म्हणून फक्त ऐकवली..बाकी खास नाही काही…. ” रणवीर… 

“ओके… म्हणजे तस काही नाही… नक्की ना…”माया..

“हो ग…”रणवीर..  

“मी आलेच… “माया… 

माया एकटीच बाहेर येऊन बसली… समोर छान गार्डन होते…. डोळ्यात पाणी होते…. मनात धडधड होती… 

“रणवीर आल्यापासूनचे सगळे दिवस ती आठवत होती… एकदा ही त्याने तिला कधी हे भासवले नव्हते की त्याच जीवापाड प्रेम आहे.. फ्लट तो करायचा पण… फ्लट प्रेम नाही होत ना.. आणि मित्र होता ना!!

माया स्वतःला सावरत होती… स्वतःला चुकीचे समजत होती… तेव्हा समोर तिने पाहिलं तर पुन्हा जीविका आणि रणवीर सोबत होते… गळ्यात हात घालून मस्त आईस्क्रीम खात होते… एवढं तर आम्ही पण कधी जवळ पण आलो नाही… असो.. माझंच काही तरी चुकलं.. मीच जास्त अपेक्षा ठेवल्या… “

“काय झालं… आज काहीतरी बिनसलं आहे..” रणवीर तिच्याकडे येत म्हणला… 

“काही नाही”माया. 

“आईस्क्रीम खाणार का??” जीविका.. 

“नाही नको,मी आले क्लास मधून” माया म्हणतच निघून जाते… 

क्लास मधून काही नोट्स घेऊन…. तसेच ती घरी निघून जाते.. कॉलेजमधून घरी…. 

रणवीर चा नंबर अजून ब्लॉक होता… आणि माया च्या लक्षात नव्हतं…त्यामुळे मायाचा समज झाला की जीविका रणवीर साठी खूप काही आहे… आणि तिने पुढचे दोन-तीन दिवस कॉलेजला जाणं टाळले… 

तिच्या कॉलेजला न येण्याने रणवीर ला जाणीव होणार का?? तिची… त्याला समजेल का,ज्याला तो मैत्री म्हणतोय ते अजून काही आहे… की माया च्या क्लीअर न बोलण्याने एक चांगला मित्र गमवावा लागणार आहे का??? का रणवीर सारखा मित्र एक चांगला लाईफ पार्टनर  बनू शकला असता का??? आयुष्याच्या वाटेवर जे आहे ,ते उघड्या डोळ्यांनी पाहणं तितकंच गरजेचे असते…. 

पुढे नक्कीच ट्विस्ट आहे…

Share to ....
0 0 votes
Article Rating

Leave a Reply

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x
%d bloggers like this: