मराठी कथा-कादंबरी-लेख Blogs- Entertainment- Travel- Food

"वाचत राहा,जगण्याला प्रेरणा मिळण्यासाठी📖 Stories| Reviews| Entertainment | Greetings | Travel | Food

कथा-कादंबरीकथामालिका

💝लग्न बंधन भाग#७💝

💝भाग#७💝

“मनं स्टेबल होत नाही,तो पर्यन्त कॉलेजला न गेलेलं च बर आहे… चांगला मित्र म्हणून नाही गमवायचं मला… त्याच्या मैत्रीला प्रेम समजले ही चूकच झाली माझी…. ” मायाच्या मनात विचार चालू होते… रणवीर डोळ्यासमोर होता… नजरेत… पडणाऱ्या अश्रूंच्या थेंबात होता… 

सहजच माया ने मोबाईल घेतला.. तर एक ही रणवीर चा मॅसेज नव्हता… 

बाकी सगळ्यांचे मॅसेज होते.. पण फक्त एकट्याचा नव्हता… 

“अजून ही रूम मधून बाहेर कशी आली नाही… आजारी तर नाही ना ही???”राघव मोनाला म्हणला…

“नाही… नसेल काही.. काल पासूनच खूप शांत होती…  मी चाललेय तिच्याकडेच… ” मोना…

“हो,ये बघून… मी आलो आंघोळीला जाऊन… ” राघव…

मोना मायाच्या  रूम मध्ये जाते.. दरवाजा उघडाच असतो… 

“माया.. ये पिल्या.. उठला का नाही अजून” मोना.. 

“आई…. तू… उठलेय पण आज लोळाव वाटतंय… आज ब्लॅंकेट मधून बाहेरच येऊ वाटत नाही बघ…. “माया अजून ब्लँकेट अंगावर ओढून म्हणाली… 

“आणि कॉलेज… परवा तर म्हणाली की लवकर जायचं आहे म्हणून… मग आज…” मोना… 

“काही सब्जेक्ट चा अभ्यास घरीच करते… दोन -तीन दिवस नाही जात…. मग जाईल… ” माया… 

“बर… पण सगळं ठीक आहे ना??कॉलेज मध्ये काही झालं नाही ना????”मोना…. 

” नाही ग,कॉलेज मध्ये काय होणार आहे  तेव्हा… ” माया…

“मोना…. माया… खाली या…. ” राघव एकसारखा त्यांना आवाज देत असतो…. 

“ते आले वाटते ,अंघोळी वरून.. चल ये लवकर”मोना… 

“हो,आई ब्रश करून आले लगेच” माया… 

“काय,झालं का एवढा गोंधळ करत होता… काय झालं…” मोनिका… 

“काही नाही… दादा चा मॅसेज आलाय… त्याच्या पाहण्यात एक मुलगा आलाय…. त्याने बायोडाटा  आणि फोटो पाठवला आहे” राघव सांगत होता.. 

माया ने सगळं ऐकलं होतं.. मायाच्या मनावर आधीच आघात झाला होता… त्यात हे अजून…  रणवीर नाही म्हणाला आहे म्हणल्यावर… अरेंज मॅरेज च करावं लागणार आहे… आणि लग्न हे टाळण्यासारखी गोष्ट नाही .. 

“आई चहा…. “माया… 

“अग, दादा ने…. ” राघव..

“बाबा ,मी आताच ऐकलं सगळं… नको काही सांगू.. ” माया… 

” हम्मम… पण पाहायला काय हरकत आहे… पाहता करता दोन वर्षे निघून जातील… आणि तुला आवडलं तर हो म्हणायचं…. ” राघव… 

“तुझा बाबा खरं बोलतोय… आणि असं पण आपल्या घरात तुझंच लग्न उशिरा होतेय…नीता मुळे तू भरडायला नको.. “मोना… 

“दि आणि माझं काय संबंध नाही.. दि ने प्रेम केलं होतं… आणि माझ्यावर कोणी प्रेम पण करत नाही…. ” माया बोलून गेली… 

“म्हणजे … “राघव… 

“काही नाही.. तू बघ… स्थळ… पण माझ्यासाठी माझं करिअर खूप महत्वाचं आहे… त्यावर गदा येऊन नाही चालणार कधी.. मी आताच सांगते… आणि हो दोन वर्षे नाही काहीच…”माया चहा चा कप घेऊन तसंच रूम मध्ये जाते… 

मोबाईल पाहते तर अजून रणवीर चा मॅसेज नसतो… 

राधिका,सारिका… बाकी जणांचे मॅसेज असतो… पण नेमका त्याचाच नसतो…. 

“रणवीर.. माया नाही आली आज.. ठीक आहे ना सगळं… मॅसेज ला रिप्लाय पण देत नाही”सारिका

“यार ,मला काही माहिती… मला का विचारात आहात तुम्ही…मला च तिने ब्लॉक ला टाकलंय आज तीन दिवस होतील…” रणवीर चिडत म्हणाला… 

“भांडण झाले का???” राधिका..

“नाही काही.. अगदी मजेत गेली होती त्यादिवशी घरी… परत काय माहिती… जे असेल ते बोलून दाखवायचं ना” रणवीर निघून गेला… 

ग्रुप मध्ये सगळी शांतता होती… 

रणवीर ला कॉलेजला येऊ वाटत नव्हतं… तिने ब्लॉक केलं म्हणून ह्याने पण तिला ब्लॉक केलं… मॅसेज नाही… कॉल नाही…

मायाच्या कॉलेजला ला नसण्याने रणवीर ला तिची जाणीव होत होती.. तिची बडबड… छोट्या छोट्या गोष्टीला रणवीर रणवीर… करत येणं… सगळं कसं खूप मिस करत होता तो… 

रणवीर अजूनच माया च्या जवळ जात होता,मनाने पण माया..  

माया ने पक्के ठरवलं होतं.. की रणवीर पासून लांब राहायचं… अजिबात बोलायचं नाही…. 

दोन-तीन दिवस म्हणता म्हणता.. जवळ जवळ एक आठवडा ते लांबच राहिले… फोन नाही का मॅसेज नाही… 

एकदम शांत…. 

त्यादिवशी ती कॉलेज मध्ये गेली…. 

समोर टपरीवर तो नेहमी प्रमाणे वाट पाहतच होता…. 

“हाय… ऑल ओके..” रणवीर…. 

“हो.. का रे… अगदी मजेत…. ” माया.. अस म्हणून तसेच पुढे निघून जाते…. 

“चहा नाही घेणार का??”रणवीर… 

“सोडला…. “माया… 

“कोणाला????” रणवीर.. 

“चहा आणि चहावाला पण… “माया तसच पुढे निघून गेली… 

सहा महिने ते दोघे एकाच बेंच वर बसत असतात…पण आता … 

चक्क पहिल्या बेंच वर बसली.. माया.. 

कोणासोबत बसली आहे… तिचे नाव पण माहीत नव्हतं..  

“हाय…. ” माया.. 

“फस्ट डे….”

“नाही…. तुझं नावं” माया.. 

“पाखी” 

“ओह….. नाईस  टू मिट यु” माया.. 

“मी पहिल्यांदा पाहिलं तुला”पाखी… 

“मी पण…” माया… 

“हॅलो.. आय एम टॉप ऑफ धिस क्लास” पाखी… 

“आता हिच्यासोबत दिवस घालवावा लागणार” माया हळूच पुटपुटली…. ” माया….

माया ने मस्त स्माईल दिली… आणि मोबाईल पाहू लागली…. 

तसा रणवीर ने हातातून फोन घेतला…. आणि काही न बोलता ब्लॉक लिस्ट मधून नंबर काढला…. 

आणि तिला दाखवला… 

“ओह….नो…. माझ्या लक्षात नव्हतं…. सॉरी” माया च्या आपसूकच तोंडातून निघून गेले… 

“धन्य” रणवीर ने हात जोडून म्हणाला… 

“चल मागे…हिच्या शेजारी बसून अजून वेड्यासारखी करशील”रणवीर… 

“तू ना…. “माया हसत त्याच्या सोबत गेली… 

“काय झालं… बोल ना” रणवीर… 

“काही नाही रे…नंतर बोलू.. सर आलेत…. ” माया….

ब्रेक मध्ये सगळे जण… मायाच्या भोवती जमतात… 

“का नाही आली.. एवढ्या दिवस…. त्या महामाया मुळे का????” सारिका हळूच विचारते…. 

“नाही ग…. तस काही नाही” माया…

“चल… मला बोलायचं आहे…. ” रणवीर हाताला घेऊन निघून जातो,कॅन्टीन मध्ये…. 

“ब्लॉक का केलं होतं???”रणवीर..

“अरे चुकून झालं… का रे… ” माया… 

“हे हाय… “जीविका… 

“ही रोज तुला भेटायला येणार का????”माया… 

“तिने ऍडमिशन घेतलं आहे,पलीकडे” रणवीर… 

“हम्मम…. बोला मग… जाऊ का मी???”माया… 

“नको,चल ना आम्ही मुवि ला चाललोय” जीविका…. 

“ओह… ” माया ने रणवीर कडे पाहत म्हणाली… 

“नाही नको… जावा तुम्ही… माझा मूड नाही…. ” माया रागाने निघून आली… 

रणवीर ला कल्पना आली होती… तो मायाच्या मागे जाणार तेवढ्यात जीविकाने त्याचा हात पकडला.… 

आणि रणवीर चा सगळा जुना ग्रुप आला…. त्यामुळे त्याला निघताच आले नाही…. 

असं पण उद्या रविवार आणि सोमवार  पासून एक्साम होत्या… त्यामुळे दोघांची भेट आता होणार नव्हती.. 

रणवीर सगळ्यामध्ये असल्यामुळे त्याला मायाला फोन करायला वेळच मिळाला नाही.. त्यादिवशी पण बोलणं झालं नाही…. 

आणि कदाचित इथून पुढे पंधरा दिवस तरी बोलणं होईल म्हणून वाटत नव्हतं… 

एक्साम चालू झाल्या होत्या.. माया वेळे वर येणं च पसंद करत होती… त्यात दोघांचा रोल नंबर पण खूप टोकाचा होता…त्यामुळे काही भेटणं होत नव्हतं… 

शेवटी मॅसेज वर बोलणंच पसंद करत होते… 

“मला बोलायचं आहे तुझ्याशी,खूप महत्त्वाचं”रणवीर ने मायाला मॅसेज केला… 

“का रे,काही झालं का????”माया… 

“भेटून बोलूयात का?? ” रणवीर… 

“हो पण एक्साम झाल्यावर… आता सध्या फोकस तर केला पाहिजे ना… मागे नको राहायला” माया.. 

“तुझं पण बरोबर आहे… सध्या एक्साम च डोक्यात घेऊ…  पुन्हा आहेतच ना अजून दीड वर्ष… आणि तू कुठे जाणार आहेस… कितीही भांडली तरी… “रणवीर.. 

“हो का… मी मनातील भावना खूप कमी बोलते.. बाकी माझ्या बडीबडी वर जाऊ नको” माया.. 

“तेच ना,मला तू कळतं नाही…. ” रणवीर.. 

“आता नको,मला समजून घेऊ.. सध्या सिल्याबस समजून घे…” माया म्हणाली…. 

“हम्मम….” रणवीर… 

“ओके..बाय” माया..

रोज माया आणि रणवीर एकमेकांना बेस्ट लक् देत असायचे… रोज पेपर नंतर भेटायचं ते ठरवत होते… पण बस मुळे माया ला लवकर निघावं लागायचं… 

“तुझं नेहमीच झालाय राव… मी येऊ का सोडवायला तुला” रणवीर… 

“नाही नको.. उगीच कोणी पाहिलं तर…चर्चेला उधाण”माया.. 

“अग, लांब सोडतो घरापासून”रणवीर… 

” नाही ,नको… ” माया… 

” ठीक आहे… पण ऐक पेपर संपले ना की…आपण नक्की जाऊयात…..म्हणजे निवांत सुन्न ठिकाणी.. बोलायचं आहे ग” रणवीर… 

“हो रे..आता जाऊ का??? खूप लेट होईल”माया.. 

“हम्म.. बाय”रणवीर…. 

“सध्या तरी मला अजिबात तर्कवितर्क लावायचे नाहीत.. त्याला माझ्यासोबत काही बोलायचे असेल ते बोलून घेऊयात… कदाचित मला जे वाटतय ते पण त्याला वाटत असेल तर… आमच्यात प्रेम आहे की नाही माहीत नाही…पण माझ्या करिअरला आणि माझ्या स्वप्नांना तो नक्की समजून घेईल… नंतर बाबाला विश्वासात घेऊन सांगता येईल.. बाबा हो म्हणला तर.. ठीक आहे… “माया च्या डोक्यात चक्र चालू होते.. आणि त्या चक्रात ती घरी पण आली.. 

पण त्याच वेळी अजून एक गोष्ट होत होती..  राघव आणि मोनिका ने माया साठी खूप मोठा निर्णय घेतला असतो.. आणि त्यांना खात्री असते,की माया त्यांना नाही म्हणार नाही म्हणून… म्हणजे आई -बाबा म्हणून त्यांनी ते गृहीतच धरलेले असते…. 

पण काय असेल निर्णय.. हे ऐकण्यासाठी… कथा वाचत राहा आणि भरभरून प्रतिसाद द्या…तुमचं रेटिंग.. आणि कंमेंट म्हणजेच लिखाणाला मिळालेली पावती आहे….. 

Share to ....
0 0 votes
Article Rating

Leave a Reply

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x
%d bloggers like this: