मराठी कथा-कादंबरी-लेख Blogs- Entertainment- Travel- Food

"वाचत राहा,जगण्याला प्रेरणा मिळण्यासाठी📖 Stories| Reviews| Entertainment | Greetings | Travel | Food

कथा-कादंबरीकथामालिका

💝लग्न बंधन भाग#8💝

“तुझीच वाट पाहत होतो आम्ही”मोना… 

“का ,बरं?? खास कारण” माया… 

“फ्रेश होऊन ये ,मग बोलू.. थोडं निवांत बोलायचं आहे” राघव… 

“ठीक आहे.. आलेच..” माया….

माया तिच्या रूम मध्ये निघून जाते… 

“तिचे पेपर पण चालू होणार आहेत,सोमवार पासून… तिला अभ्यास पण करायचा आहे”मोना.. 

“पण हे स्थळ खूप छान आहे… अगदी माझ्या मनासारखं… मुलाची चौकशी केली आहे मी… एक नंबर आहे मुलगा…. तरी परत करतो.. पण तिला सांगावं तरी लागेल ना??”राघव बोलत होता..

“हो.. सांगावं तर लागेल… “मोना… 

“आई,प्लिज चहा… ” माया… 

“हो ,देते.. बस” मोना… 

“बोल ना,बाबा…काय बोलायच होते” माया..

” सकाळी तुला म्हणलं होते ना.. ते स्थळ.. मुलगा खूप चांगला आहे… तू फोटो पाहून घे… तुला आवडला की मग पुढे जाऊयात… पुण्यातच आहे तो.. चांगल्या कंपनी मध्ये आहे.. आणि घरी शेती पण आहे.. आणि एकुलता एक आहे… अजून काय पाहिजे” राघव…. 

“हम्म… पण मला शिक्षणाला विरोध नकोय” माया… 

“तसं बोलूयात आणि तशी अट च ठेवुयात आपण..जर तो नाही म्हणला तर विषय थांबवूयात… “राघव…. 

“पण बाबा घाई नाही का होत?? मला अजून दीड वर्ष हवी आहेत ना!!!” माया..

“हो,पण लग्नाच्या गाठी तर वर जुळतात ना?? आणि योग असतो ग ,तो.. तुझा आता असेल.. मग त्यात काय वाईट आहे”मोना तिला चहा देत म्हणाली… 

“हम्मम… ” माया.. 

“हे घे फोटो.. “राघव तिला फोटो देत म्हणाला.. 

“हम्म.. ठीक आहे…” मायाने फोटो पाहिला आणि लगेच देऊन टाकला.. 

“अग नीट पाहून घे… परत काही नको” मोना.. 

” सगळं तर पाहिलं आहे ना ,तुम्ही मग आता मला कशाला विचारताय….”माया निघून गेली…. 

“काय पोरगी आहे ही?? हिच्या मनात नाही का लग्न करायचं??? दुसर कोणी आहे का????” राघव ..

“नसेल, तस कोणी… करिअर साठी फक्त म्हणतेय”मोना.. 

“असेल तर सांगा म्हणावं वेळेवर” राघव.. 

“तुम्ही कशाला चिड-चीड करताय” मोना.. 

“चीड-चीड वाटतेय… तुला माझी…. मी तिचा विचार करणार नाही का?? काय करिअर करिअर करत बसलेय ती..आणि तू पण तिला साथ देतेय… घरी सगळंआहे त्यांच्या.. काही कमावण्याची गरज नाही…. असंही आपल्या घरातील मुली बाहेर पैसे कमावण्या एवढं वाईट दिवस नाहीत आले”राघव बोलून गेला… 

“ते तुम्हाला कधी कळलेच नाही..असो… ” राघव च्या या बोलण्यामुळे मोना पण दुखावली होती… 

लग्नाची बेडी तिने पण तर अनुभवली होती की!!! अनुभवाचे बोल कधी  वाया जात नाहीत..हेच खरं असते.. 

“सांगू का रणवीर ला ?? स्थळ आलाय म्हणून…पण काय म्हणून सांगू…. तो वेड्यात काढेल मला….सगळं फाईनल झाल्यावर सांगेल.. अस ही त्याचे विचार मॉर्डन आहेत.. सो.. माझं एवढ्या लवकर लग्न म्हणल्यावर अजून काही तरी चिडवायचा… त्यापेक्षा शांत बसूयात…”माया स्वतःच्या विचारात होती….

“लग्न झालं आणि जर कॉलेजला येऊनच नाही दिल तर… नको असा विचार करायला नको.. बघू अजून वेळ आहे या सगळ्याला…. ”  माया असं म्हणून बेड वर बसणार तेवढ्यात राघव जोरजोरात आवाज देतो… 

“माया … ये पिल्या…” राघव… 

“आता,काय.. बाबा.. मला अभ्यास आहे … ” माया… 

“अग, उद्या रविवार ना…मुलाला सुट्टी आहे… म्हणून ते उद्याच येणार आहेत… भेटायला… म्हणजे तुला पाहायला… छान साडी घाल…. ” राघव बोलत होता… 

“बाबा पण….”माया… 

” चांगल्या कामाला नाट लावू नको… आणि कसली ही रडारड नकोय.. हसत झाले पाहिजे सगळं” राघव थोडं रागातच म्हणाला… 

“हम्म… “मायाच्या डोळ्यांत पाणी होते.… 

“माया रूम मध्ये जाते आणि दरवाजा लावून बसते…. 

“मला छान का वाटत नाही??? माझी इच्छा च नाही मुळात लग्न करण्याची…. माझी तयारी नाही खरं… कोणाशी बोलू आणि काय बोलू…. का रे देवा!! हे माझ्याच नशिबी ते पण एवढ्या लवकर… ” माया एकटीच बडबड करत होती… 

मोबाईल हातात घेते… रणवीर सोबत बोलू का?? 

“हाय.. काय करतोस??” माया.. 

“काही नाही… स्टडी”रणवीर… 

“हम्म…”माया…. 

“तुझा झाला का?? तुझं काय बसली असशील गेली  घरी की बुक मध्ये डोकं घालून… मला काम होते..मी आताच बसलोय”रणवीर.. 

“नाही रे.. मला पण उघडायचे आहे…”माया.. 

“मग काय मुहूर्त पाहायचा का??? कर ना स्टडी आणि मला पण करू दे…ऑफ करतो फोन… म्हणजे लक्ष लागेल”रणवीर… 

“का रे.. लगेच…. “माया.. 

“बोलायचं तर खूप आहे तुझ्याशी पण एक्साम झाल्यावर… आता नाही.. आता मिशन एक्साम”रणवीर.. 

“हम्मम…. वेळ निघून गेलेली नसावी म्हणजे झालं”माया.. 

“अस का म्हणाली…जो पर्यंत तू सोबत आहेस ना!! तो पर्यन्त वेळ माझी…. ” रणवीर….

” हम्मम्म.… करा अभ्यास… बाय”माया.. 

“बाय” रणवीर… 

“रणवीर ला दोष देण्यात काय अर्थ आहे…त्याला काही माहिती …माझ्या आयुष्यात काय चालू आहे… जे आहे ते हसत स्वीकारले पाहिजे… जास्त विचार न केलेले बर आहे…” माया स्वतःच्या विचारात होती… 

तेवढ्यात दरवाजा वाजतो…..

“आई तू… ये ना… “माया… 

“कस आहे बाळ माझं???” मोना.. 

“खर सांगू आई.. माहीत नाही मला.. पण ना मन उदास आहे बघ माझं….” माया.. 

“एक विचारू….तुला का नाही करायचा लग्न.. तुला ह्याच्याशी लग्न नाही करायचे का??? म्हणजे का अजून दुसर कोणी आहे का?? ” मोना.. 

“नाही ग ,आई… मित्र आहे माझा रणवीर.. पण फक्त  मित्रच आहे ग”माया.. 

“मग का नको म्हणतेय… ” मोना… 

“मला भीती वाट्तेय ग.. लग्न एक बंधन नको… मला माझं आयुष्य माझ्या मर्जीने जगायचं.. स्वतःच नाव कमवायच आहे.. स्वतःची ओळख हवी आहे… मला माझं सगळं आयुष्य नवऱ्याच्या मागेपुढे नाही घालवायचे… म्हणजे ना आई… ” माया.. 

“शांत हो तू.. आधी हे समजून घे.. लग्न ही गोष्ट एकदा केली की होत नाही ग…ती सुरवात असते.. मुलगा पाहण्यापासून.. लहानपणापासून एक स्वतःच्या अंशाला वाढवणं आणि ते वयाच्या अगदी वीस-बाविसाव्या वर्षी दुसऱ्याच्या हवाली करणं इतकं सोपं नसते ग… लव मॅरेज ला विरोध नाही आमचा.. पण चुकीच्या मानसासोबत करण्याला विरोध आहे ग.. आणि तुला माहीत आहे ही.. ही परंपरेने चालत आलेली संस्कृती  आहे..…खूप दिवस झाले आहेत” मोना बोलत होती… 

“हो आई ,माहीत आहे मला… सीता चे  स्वयंवर झाले होते….द्रौपदी चे पण झाले होताच…अगदी पौराणिक कथेपासून चालत आले आहे… प्रत्येक मुलीला तिचा जीवनसाथी निवडण्याचा अधिकार आहे… आणि ह्यात मला काहीच शंका नाही.. पहिल्या मुलींची पण ओळख होती ना ग.. त्यांचं पण स्वप्न होतेच की… मला वेळ पाहिजे अजून… बाकी माझा विरोध नाही ग,लग्नाला” माया..  

“हो,पण आताच तुझं वय बावीस आहे अजून थोड्या दिवसांनी…. वयाच्या पुढे लग्न करायचे म्हणलं की स्थळ येत नाही ग” मोना.. 

“हो,आई पण… दिसण्यावर सगळं थोडी असते… माझी ओळख असेल.. काम असेल मला.. ” माया.. 

“अजून ही आपल्या संस्कृतीमध्ये.. महिलांच्या बौद्धिक हुशारी पेक्षा त्यांच्या सौंदर्याला महत्व दिले जाते ग.. कितीही लेडीज फस्ट म्हणलं ना तरी… पुरुषप्रधान या देशात महिलांचे मत कितीही योग्य असले ना तरी ग्राह्य धरले जात नाही.. आणि खूप कमी लोक असतात जे त्यांचा आदर करतात आणि त्यांना योग्य ते न्याय देतात… ” मोना.. 

“हम्मम…. माझं फक्त एवढंच म्हणायचं आहे की.. लग्न माझ्या स्वप्नाच्या आड येणार नाही म्हणून…मला माहित आहे,तुम्ही जो निर्णय घेताल तो माझ्या चांगल्या साठीच असेल” माया मन दाबून म्हणते.. 

“हम्म.. ही घे साडी….उद्या  घालण्यासाठी… आणि हे दागिने… तुझ्या सोंदर्या ला चार चांद लावण्यासाठी…” मोना.. 

“खरंच गरज आहे का याची?? आई.. ” माया…

“प्लिज…. “मोना… 

“मला आईशी अजून बोलायचं होते खरं…. मला पहायचं होते.. मी जे आई-बाबा चे पाहिलं आहे तेच लग्न असते का??? की काका काकी चे जे पाहिलं ते… मी नेहमीच आई आणि काकी ला पाहिलं आहे,स्वतःच मन मारून जगताना…. मला समजून उमजून थोडा विचार करून ठरव्हायचं होते… पण उद्या… लगेच पाहुणे…. किती विचित्र ना…. दुकानात ठेवल्या प्रमाणे… त्यांच्या सगळ्यांसमोर जाऊन बसायचे…नको त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची… ते प्रश्न म्हणजे  आपलं मत विचारात घेण्यासाठी नसतात ना…आपल्याला नीट बोलता येते की नाही ह्या साठी असतात…. मुलगी पाहायला येतात…. नवरा मुलगा तिच्यामध्ये फिगर आणि रूप पाहतो.. तर बाकी मंडळी… काही उणिवा आहेत का ते शोधतात.. अहो पण वय निघून जाईल… रूपाची जादू पण निघून जाईल… चार-पाच आलेले पाहुणे पण निघून जातील त्यांच्या घरी… संसार म्हणजे काय??? समोरच्या माणसाचा स्वभाव म्हणत्वचा का  वाटत नाही??? आणि काय तर म्हणे आपल्या संस्कृतीमधील पारंपरिक कांदा पोहेचा कार्यक्रम करावा लागतो….पण पोहे तरी कुठे त्या मुलीने बनवलेले असतात तेव्हा….. “मायाच्या डोक्यातले विचार  लाव्हारसासारखे उफाळून येत असतात… जे चालू आहे ते तिला अजिबात मान्य नसते… पण शांत बसण्याशिवाय काही पर्याय नसतो.. कारण मुलीचं सगळ्यात जास्त प्रेम बाबांवर असते ना!!!!”

आज मॅट्रिमोनि च्या काळात पण काही सामान्य ठिकाणी कांद्या-पोहेचा कार्यक्रम होतातच… पण किती पालक आपल्या मुलींशी अगदी मनमोकळे पणाने बोलतात… मोना ने मायाशी बोलली खरं… पण समजून मात्र शकली नाही…. 

तुम्हला काय वाटतं कंमेंट करून नक्की सांगा…

Share to ....
0 0 votes
Article Rating

Leave a Reply

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x
%d bloggers like this: