लग्नबंधन भाग#9
💝भाग#९💝
कांदे-पोहे कार्यक्रम..
“कालचा विषय अजून पूर्ण झाला नव्हता!! मनात प्रश्नाचं काहूर होते… मन चलबिचल होतच अजून…. काय करणार.. मनाची स्थिती स्वतःलाच समजत नव्हती… मुळात लग्न करण्याची इच्छा च नव्हती ना!! कोणासोबतच…. मन च खुश नाही,तिथे चेहऱ्यावर कुठून येणार आनंद”माया स्वतःला आरशात पाहत म्हणत होती…
“झालं का माया” मोना..
“हो… अंघोळ करून आलेय मी…. मला साडी नाही घालता येत ग.. ” माया..
“हो,पण शिकावं लागेल ना… लग्न झाल्यावर साडीच घालावी लागणार ना,. रोज”मोना…
“पण आई मला येत नाही,हे तुला पण माहीत आहे… पण ड्रेस घातला तर काय बिघडत.. ” माया.
“अग, पण गावाकडे अजून पण सगळे लोक साडी मध्ये वावरतात… तिथली ती सांस्कृती आहे… ती जपली पाहिजे ना!!!” मोना…
“अग, पण ज्या संस्कृती … रुढींमध्ये जर आपण सुखी नसेल तर त्या का जपाव्यात???” माया…
“ते तुला आता नाही कळणार.. अजून तुला समज कमी आहे” मोना..
“मग तेच ना.. मला खरच कळत नाही… तर मग लग्न नको ना मला” माया..
“माया,अति होतंय आता… पाहुणे कधी पण येतील.. चल साडी नेसवते पाहिले…आणि मग तुझा मेक अप कर… म्हणजे जास्त काही लावू नको.. फक्त पावडर… आणि टिकली… डोक्यावर पदर… हातात बांगड्या घाल.. पैंजण… आणि केस मोकळे नको.. वेणी घाल… आणि तयार झाली की मला आवाज दे…. काही राहील तर सांगेल मी… ” मोना साडी नेसवत नेसवत.. माया ला समजावून सांगत होती…
“हम्मम्म्म… आई तू…. ” माया पुढे बोलणार तोच… मोना मध्येच बोलते..
“आता काही नाही… मी जे सांगतेय तेच कर… आणि सगळेजण हेच करतात… त्यात वेगळं अस काहीच सांगितलं नाही मी,तुला” मोना… अस म्हणून निघून जाते..
“मी चहा आणि पोहे बनवतेय.. तो पर्यंत “मोना किचन मध्ये जाते…
“हो… मला वाढवताना.. माझ्यावर संस्कार करताना… मला जग दाखवताना… का शिकवले तुम्ही मला मनाप्रमाणे जगायला… चुकीच्या ठिकाणी आवाज उठवायला… भरपूर अभ्यास करून परीक्षेत पाहिलं यायला.. कशाला वेगवेगळे कला शिकवायच्या… आणि आज तू मला बुरसटलेले विचार सांगतेय… आज तू मला स्वतःच्या सुखापेक्षा संस्कृती आणि बुरसटलेल्या परंपरा शिकवतेय…. का ग???? मला उत्तर हवी आहेत.. जर कदाचित मला तू स्वतंत्र विचारांचे बनवलं नसते ना ,तर जास्त बर झालं असते ग… आज माझ्यावर अन्याय होतोय याची जाणीवच झाली नसते… तुम्ही आई-बाबा आहात… तुमच्या जागी तुम्ही बरोबर आहात.. पण माझं काय??? माझा लग्नाला विरोध नाही मुळीच… पण मला स्वतःला स्वावलंबी बनायचे आहे… आई सारख किंवा काकी सारख नाही जगायचं” माया च्या डोक्यात विचार चालू होते… खूप सारे प्रश्न होते.. त्याची उत्तर तिला मिळतील की नाही ,हे ही तिला माहीत नव्हतं…
आणि हे सगळं विचारण्याची हिंमत पण कुठल्या मुलीसमोर नसते ना,जेव्हा ती तिच्या आई-बाबांच्या डोळ्यात ती जगातील सगळ्यात मोठा आनंद पाहत असते…
पण मुलींना सगळं व्यवस्थित पाहून देण्यापेक्षा… त्यांना चांगलं शिक्षण आणि त्यांना स्वतःची नोकरी किंवा स्वतःला सांभाळू शकेल.. स्वतःची जबाबदारी ती उचलू शकेल.. किंवा तिच्यातील कलागुणांना वाव द्या… तिचे छंद जोपासायला लावा… आयुष्य कुठल्या वळणावर काय घेऊन येईल हे सांगता येत नाही,पण त्या सगळ्यासाठी तुमची लाडली तयार असेल ना पण!!! ती हिमतीची आहे ना???? की काही झाले की रडत येणार आहे लगेच तुमच्याकडे??? तिला शिकवलं पाहिजे आणि ते अर्धवट कधीच ठेवलं नाही पाहिजे…
नाही तर कधी पण असं होते ना… की जे आई – बाबांनी पूर्ण केलं नाही , ते कधीच तिसरं कोणी पूर्ण करू शकणार नाही.. आणि केलंच तर.. चांगला आहे पण न करेलच कशावरून ना!!!
त्यासाठी अर्धवट काही ठेवू नका!!! असो…..
माया च्या डोक्यातील चक्र कदाचित सगळ्याच मुलींच्या डोक्यात असतील असे नाही… काहींना लग्नाचे वेध पण असतात… काहींना लग्न म्हणजेच जीवन असते,स्वप्न असते आणि आयुष्य बनून जाते….
पण त्याच काय ज्यांच्या डोळ्यात स्वप्न आहे… त्यांच्या डोळ्यांत राहून त्याचे अश्रू तर होणार नाहीत ना!!!
म्हणून लग्न त्यांना सजा का नाही वाटणार?? आयुष्यभर घातलेली बेडी का नाही वाटणार???
ज्याला जे पाहिजे ते नाही मिळत पण.. जे आहे त्यातुन मार्ग तर काढायला शिकवलं पाहिजे ना!!!
माया ने सगळं आवरलं होते.. अगदी आई ने सांगितलं तसं…
“झालं का तुझं बाळा??? किती गोड दिसतेस ग!!!” मोना म्हणाली..
” हम्म” माया..
“अग, ये पाहुणे आलेत” राघव ओरडतच आत आला..
“अरे,वा!! कमाल दिसतेस… थोडा चेहरा हसरा ठेव पण” राघव माया ला म्हणला..
माया ने पण अगदी मोठी खोटी स्माईल दिली….
“मला ना फार काही चांगलं वाटत नाही… माझ्या आतून मला काही चांगल्या वाईब्स येत नाहीत.. काही कळेना” माया स्वतःशीस बोलत होती….
“या ना.. वाटच पाहत होतो आम्ही तुमची” राघव म्हणला..
“झाला थोडा उशीर” मध्यस्थी गृहस्थ म्हणले…
“बसा ना!! मी आलोच” राघव…
“पाणी दे ग,मी आलो बाहेर देऊन” राघव मोना ला म्हणाला..
“पाणी घ्या… ” राघव सगळ्यांना पाणी देतो…
इकडच्या तिकडच्या गप्पा होतात… सगळ्यांची ओळख होते.. सगळे निवांत बोलतात….
” बोलावा,मुलीला…..” एक गृहस्थ…
“हो,आलोच घेऊन” राघव….
राघव मायाच्या रूम मध्ये जातो…” चल बाहेर… अजिबात घाबरायचे नाही.. जे बोलायचे आहे ते अगदी मोकळ्या मनाने बोल” राघव मायाला म्हणला..
“हो”माया…
मायाने पहिल्यांदा साडी घातली होती.. त्यामुळे चालताना तिला थोडा त्रास होत होता…
ती येऊन पाटावर बसली..
आणि हो पाटावर बसताना नेहमी उजवा पाय टाकायचा… हे पण सांगितलं होतं…
त्यामुळे सगळे तिच्या पायाकडे पाहत होते…
पाय पुढे केला तोपर्यन्त..
“अरे,वा..छान.. अंगठ्या शेजारचे बोट लांब आहे.. म्हणजे संसारिक आहे” एक गृहस्थ…
माया ने त्यांच्या कडे वर पाहिलं,” काय पण काही… कुठून शोधून आणलेत काय माहिती…”
माया मनातल्या मनात म्हणाली…
माया बसली..
हळदी- कुंकु लावण्याच्या कार्यक्रम झाला…
आता एक एक तिच्याशी बोलत होते.. कारण कोणाचीच नाव तिला माहीत नव्हतं…
खुद्द नवरा मुलाचे पण नाव माहीत नव्हतं…
“नाव काय तुझं??”
“माया”
“स्वयंपाक येतो का???”
“नाही,अजून… कॉलेज मुळे काही वेळ नाही भेटत”
“काय शिकण्याची ईच्छा आहे,आधी??”
“आधी एम. बी.ए. करायचे आणि एक मल्टि नॅशनल कंपणी मध्ये जॉब करायचा.. आणि थोड्याच दिवसात कंपनी काढायची… स्वतःची”
माया बोलत होती.. तसे तिथे बसलेले सगळे हसायला लागले.. अगदी जोर जोरात… तिने सगळ्यांची चेहरे पाहिले.. प्रत्येकाच्या चेहरे तिला असुरासारखे वाटत होते…
त्यातील एक जण म्हणाला..
“अग, तस नाही.. स्वयंपाक मध्ये काय शिकशील आधी???”
“ठरवलं नाही अजून मी,जाऊ का मी??
राघव ने माया कडे रागात पाहिलं…
“नवऱ्या मुलाला काही प्रश्न विचारायचे आहेत का?? पाहिलं का तू मुलीला??? ”
“हो… नाही काही तुम्ही विचारले तेच झालं की” नवरा मुलगा…
“तू पण पाहून घे ग.. परत म्हणू नको मी पहिलाच नाही मुलगा म्हणून” माया ला म्हणतात..
माया ने त्याच्याकडे पाहिलं.. काही खास फील नाही आला.. कदाचित डोक्यात राग असल्यामुळे…
“नमस्कार करा.. आणि आत गेला तरी चालेल”
“माया सगळयांना नमस्कार करते… आणि आत निघून जाते… “
“का?? हसत होते सगळे.. गावठी कुठचे” माया रागात साडी हातात धरत भर भर येरझऱ्या घालत होती…. ”
“जावा आता निघून .. पहिली ना मुलगी.. मग निघा..” माया स्वतःलाच बडबड करत होती…
“तिची फक्त एक अट आहे,तिला तिचे शिक्षण पूर्ण करायचे आहे…. ” राघव म्हणून गेला..
“आमची काहीच हरकत नाही” माणिक म्हणजे मुलाचे वडील म्हणले….
“हो ना रे,विराट” त्यांनी त्यांच्या मुलाकडे पाहत म्हणले…
“चालेल की”विराट म्हणला..
म्हणजे नवरा मुलगा विराट आणि नवरी मुलगी माया…
“विराटमाया”
“तरी आम्ही फोन करून सांगतो??”माणिक म्हणाले… आणि निघून गेले….
“हो चालेल”राघव…
सगळे निघून गेले.. तसा दोघांचा मोर्चा मायाकडे आला…