मराठी कथा-कादंबरी-लेख Blogs- Entertainment- Travel- Food

"वाचत राहा,जगण्याला प्रेरणा मिळण्यासाठी📖 Stories| Reviews| Entertainment | Greetings | Travel | Food

Lifestyle - जीवनशैली

Fact of Weight Loss (सुधारित जीवनशैली)

अनुभव आल्याशिवाय एखाद्या गोष्टीमधील सत्य कळत नाही,कितीही कोणी सांगितलं तर ते गवसत मात्र नाही… 

असंच काहीसं…. 

“खूप वाचलं आणि त्यानंतर खूप पाहिलं, समजून घेतलं..ऋतुजा दिवेकर पासून ते गुंजन शॉऊट्स… फिट युट्यूबर… आणि सात्विक मोमेंट पण.. अजून सदगुरु पण आणि वेगवेगळे फॅशन एक्सपर्ट सुद्धा… जवळ जवळ सगळेच नाही पण सत्तर टक्के यू ट्यूबर अगदी नव्याने पाहिले… म्हणजे आता सांगण्यात पॉईंट नाही हा सगळा अट्टहास कशासाठी म्हणून… 

“हो ,तुम्हला समजले हे कळलं मला पण..” 

“तुमचं पण होतंय का असच???”

म्हणजे नुकतेच मी तीस वर्षाचे झाले.. म्हणजे तारुण्याची झालर जशी काढावी अगदी तसच काहीसं झाल्यासारखं वाटलं…  अचानक दोन-तीन महिन्यात वजन वाढले… तोंडावर छोटे छोटे पिंपल्स पण आले.. सुरकुत्या अजून तरी नव्हत्या आल्या पण त्या पण येतीलच की… जुना एक पण ड्रेस बसत नव्हता.. म्हणजे कोरोना मुळे अस पण काही नवीन घेणं नाही झाले.. जे जूण आहे तेच नव्याने घालावं म्हणलं तर ते बसत नव्हतं… 

“काय सांगू, रडूच आलं ना??? जस काही ही गोष्ट आता लगेच घडली आहे माझ्यासोबत… पण अस नव्हतं ना!! 

रोज आरशात पाहत होते मी,पण फरक काही पाहतच नव्हते.. दिसत होता खर पण त्याला वेगळे वेगळे कारण देऊन सोडून टाकला  विषय मनातून…

शिल्पा शेट्टीला पाहत परत दिवस जायचा,तिचे शॉर्टस.. तिच्या रेसिपी.. तिचा डाएट…. 

अहो ती फक्त रात्री सुपच घेते,बघावं म्हणलं करून तस… 

“मग ठरल्याप्रमाणे सात वाजता केलं सूप मिक्स भाज्यांचे आणि  छान मस्त डायनींग टेबलवर बसून घेतलं… आणि लगेच मी डाएट वर आहे…. हे ठीक होते…. 

सात वाजता सूप घेतलं… आठ पर्यंत ठीक वाटलं.. डाएटिंग चालू आहे म्हणून दहा पण कसेबसे वाजू दिले..  पण आता ते शक्य नाही… अकरा वाजले होते… आणि पोटात जी जोराची भूक लागली होती ना…. की जणू पाच-सहा दिवस काही खाल्ले नाही…मग काय स्वयंपाक तर काही शिल्लक नव्हता… म्हणून चिप्स.. थोडी मिठाई…बिस्कीट.. कुकीज.. केक.. जे घरात होते ना ,ते सगळं भरलं पोटात.. आणि वरून एक मोठा मग कॉफी घेतली.. काय तर म्हणे कॉफी ने फॅट लॉस होतो… 

कॉफी ने फॅट लॉस होतो पण कुठल्या बिनादुधाच्या आणि साखरेच्या.. मस्त पूर्ण दुधाच्या नाही बर का?? 

तेवढ्याने काय होणार आहे म्हणून घेतली फुल क्रीम दुधाची कॉफ़ी मस्त गोड लागण्यासाठी साखर टाकून अगदी… 

एक फॅक्ट सांगू का?? तेवढ्याने काय होणार आहे असं म्हणत म्हणत 60 चे 90 झालं होतं… आणि आता परत माघारी जाण्याचा विचार पण करवत नाही पण पुढे जाऊ नाही म्हणून मात्र देवापुढे हात जोडाव वाटत… 

वजन!!!!

वजन कमी करायचे म्हणून ते कमी  होत नाही.. आणि जरी करायचे म्हणले तरी त्याच्या मुळाशी गेल्याशिवाय जमत नाही.. कितीतरी जण असे आहेत… मूळ शोधतच नाही…. 

पाहिलं म्हणजे वजन का वाढले??? कशामुळे?? ज्यावेळी ते वाढत होते,तेव्हा का म्हणून लक्ष दिलं नाही??? 

जर समजा मी डाएट घेतला तर तो मी किती दिवस करू शकेल आणि सोडला तर पुन्हा वजन वाढणार नाही कशावरून”?? 

वजन कमी करण जेवढं अवघड आहे ,तेव्हढाच ते मेंटेन करणं अवघड आहे… 

सगळं पाहिलं आणि अनुभवलं… एक नक्की झालं.. डाएट काही पाळाला  जाणार नाही,मग आता पुढे काय??? 

मग म्हणले.. 

आधी ना आपल्या शरीराला समजून घेऊयात… 

माझे शरीर एक मशीन आहे…

आणि मशीन चालण्यासाठी त्याला फ्युल लागणार ना!! आणि शरीरासाठी लागणारे फ्युल ते आपल्याला अन्नातून मिळते.. 

जेवढं आपले शरीर काम करते.. तेवढं इंधन संपून जाते.. पण जर तेवढं काम नाही केलं तर मग मात्र शिल्लक राहिला.. आणि तेच शिल्लक राहिलेले इंधन … फॅट च्या रूपाने साचत जाते.. 

आपण खात राहतो आणि खात राहातो… 

आणि इकडे गरजेपेक्षा खूप कमी हालचाल झाल्यामुळे वजन वाढत जाते…. 

कधी कधी असे पण होते ना.. गरजेपेक्षा खूप खातो आणि त्या दृष्टीने श्रम खूप कमी होते… 

जेवढी ऊर्जा आपण मिळवतो तेवढीच ती खर्च पण केली पाहिजे… 

आणि रोजच्या रोज जर आपण जेवढे अन्न घेतले म्हणजे जेवढया कॅलरी आपण घेतल्या तेवढ्या जर त्या बर्न झाल्या तर  आपले हेल्थ आणि वजन दोन्ही गोष्टी अगदी सुरळीत चालू शकतात… 

ज्यावेळी  लहान असतो,त्यावेळी  आपले मेटाबॉलिझम  जास्त असते म्हणजे खाल्लेले पचवण्याची ताकद चांगली असते… 

पण जस वय वाढू लागते,आणि शारीरिक हालचाली पहिल्या पेक्षा कमी होतात आणि अर्थातच कॅलरी पण कमी बर्न होतात… पण याच तुलनेत आपलं अन्न ग्रहण करण्याची क्षमता कमी होत नाही… 

आता साधं आणि सोपं गणित सांगते….. 

जेवढं शारीरिक श्रम जास्त तेवढा आहार आपण ग्रहण केला पाहिजे.. 

जर समजा आपण रोज तुम्ही बसून काम करत असाल.. म्हणजे जिथे फक्त बौद्धिक श्रम लागत आहे आणि शारीरिक श्रमाचा काहीच उपयोग जर होत नसेल तर मग नक्कीच वजन वाढण्यास सुरवात होते… 

पण त्याच्या उलट जर सारखी धावपळ करणार किंवा सारख पायी चालतं जाणार… पायऱ्या चड-उतार करणारी काम असतील…. किंवा अजून ज्याने शारीरिक कष्ट होणार आहे,अशा लोकांचे अर्थातच वजन अजिबात वाढणार नाही… 

म्हणजे समजलं असेल थोडक्यात..

“अन्नग्रहण करणं किंवा खाणं हे कशावर अवलंबून असले पाहिजे… तर आपल्या शारीरिक श्रमावर.. म्हणजे जेवढं आपण शारीरिक श्रम करू तेवढंच खाल्लं पाहिजे…. चवीसाठी… किंवा मानसिक .. भावनिक हेतूने जेवण दोन – तीन टाईम केलच पाहिजे .. हा अट्टहास धरून जमणार नाही.. कारण खाल्लेलं पचण्यासाठीही शरीराच्या हालचालींची गरज आहे.. फक्त बसून ते पचवता येणार नाही.. म्हणून आपल्या कामाच्या पातळीवरून आपल्याला किती अन्नग्रहण केलं  पाहिजे,हे ज्याचं त्यानं ठरवले पाहिजे , खरं आहे ना… ” 

अजून पुढे जाऊन सांगायचं म्हणलं… आता नक्की काय खाल्लं पाहिजे…

जे निसर्गाने आपल्याला दिल आहे ते.. म्हणजे जास्तीत जास्त फळ… ज्याला काही करावं लागतं नाही.. एकदा धुतले की ते आपण खाऊ शकतो.. शक्य तेवढी फळ नक्की खाल्ली  पाहिजेत… दिवसातून एक तरी…

ड्रायफ्रूट पण आपण खाऊच शकतो… 

त्यानंतर येतात त्या आपल्या भाज्या… 

त्यामध्ये पण काकडी,टोमॅटो,बिट,गाजर,मुळा,कोबी… ज्याच्या त्याच्या आवडीनुसार आपण खाऊ शकतो… 

आता राहिल्या बाकीच्या भाज्या त्या आपण शिजवुन मस्त भाजी बनवून खाऊ शकतो पण योग्य तेलात आणि मसाले वापरून… 

रिफाईंड पदार्थ जास्त खाऊ नका.. म्हणून सगळे डायटीशन ओरडत असतात… 

ते ही खरच आहे.. जे मूलतः उपलब्ध आहे त्याच्या अजून प्रोसेस करून त्याला पचनासाठी हलकं न बनवता जड बनवलं जाते.. मग अर्थातच ते हानिकारक होते.. 

“एक नियम लक्षात ठेवायचा आहे,जे निसर्गाने दिल आहे… ते आहे तस खाण्याचा प्रयत्न करा… खूप सारे मसाले वापरण्यापेक्षा.. तिखट करणारी मिरची आहे…. गोड करणारे खजूर आणि गुळ आहे.. आणि आता अगदी साध गुलाबी मीठ पण आहे ,ज्यामध्ये कोणतीच प्रक्रिया केलेली नाही… आणि हो सात्त्विक मोमेंट मध्ये तेलाला पर्याय म्हणून त्यांनी ओल खोबऱ्याचा पर्याय दिला आहे… लक्षात फक्त एकच ठेवायचं आहे.. जे निसर्गाने दिल आहे आणि ते लगेच वापरता येणार आहे असंच खायचं आहे”

आता पुढे जाऊन आपण मोड आलेले कडधान्य पण जास्त प्रमाणात वापरू शकतो….

त्यानंतर आपल्याकडे आहेच की गहू,ज्वारी..बाजरी..नाचणी,तांदूळ… अशी भन्नाट धान्य आहेत… ज्यांना फक्त बारीक करून वापरायचे आहे… 

मग साजूक तूप… शेंगदाण्याचे लाडू.. नारळाचे लाडू.. मस्त मुरमुरा भेळ,मखाना चिवडा,फुटाणे,भाजलेले शेंगदाणे -गुळ.. मुरावळा , काही नाही तरी एक ग्लास दूध तर आहेच की… 

हे मस्त ऑपशन आहेत… काय ते स्नॅक्स म्हणून खायला… 

ऋतुजा दिवेकर म्हणतात ना,कमी पॅकेट फोडा.. नाहीतर तुम्हीच पॅकेट सारख होऊन जाताल.. अगदी असच… पॅकेट मधील काहीच खायचं नाही… जे पण काही खायचं आहे ते अगदी घरी बनवून आणि ताजे ताजे खायचं आहे.. 

सूर्योदय आणि सूर्यास्त… का होत असेल बर????

जर खूप आधी जर हा प्रश विचारला असतात तर सगळ्यांनी सांगितलं असते.. काम करण्यासाठी.. कारण काम फक्त त्याच वेळेत करणार असतो,एकदा का सूर्यास्त झाला की मग अंधार आणि काही काम नाही… मग फक्त आराम… 

आणि त्याच पद्धतीने आपलं शरीर रचना पण आहे.. 

कारण मानव शरीर हे  प्रकृतीची रचना आहे..आणि ती किती तरी वर्षांपासून चालत आलेली आहे… तिची रचना आणि कार्य.. सूर्योदय-सूर्यास्त यावरच अवलंबून आहे… 

ते कसं????

आपलं शरीर.. सगळ्यात जास्त ऍक्टिव्ह सकाळी असते… आणि त्याची ताकद कमी होत…. अगदी संध्याकाळी… 

म्हणजेच जेवढी ताकद अन्न पचवण्याची सकाळी असते… त्यानंतर मात्र ती कमी कमी होत जाते आणि सूर्यास्तानंतर मात्र अगदी मंद होते… त्यामुळे संध्याकाळी अगदी कमी जेवण करायचे असते.. ज्याने करून ते पचन पण झालं पाहिजे.. 

सूर्यास्तानंतर काही खाल्लं नाही… जे काही दिवसभर खाल्लं आहे त्याला पण पचायला वेळ मिळतो… आपलं मशीन नीट काम करते.. जर आपण सारखाच खात राहिलो तर मग पाहिले अन्न जोपर्यंत पूर्ण पचत नाही,तोपर्यन्त आपण दुसरं भरतो आणि ते तसच साठून राहते.. त्यासाठी पूर्ण पचनक्रियेला वेळ मिळाला पाहिजे.. म्हणजे जवळ जवळ संध्याकाळपासून ते सकाळी पर्यंत…. 

आता टाईम वर सांगयच म्हणलं तर रात्रीचे जेवण ६-६.३० पर्यंत झालं पाहिजे आणि सकाळी तुम्ही सूर्योदयानंतर… सूर्याने थोडं तोंड वर काढेपर्यंत म्हणजे साधारण दहा पर्यंत आपण आपला आहार घेतला पाहिजे… त्यावेळी पचनशक्ती पण चांगली असते आणि रात्रभर सगळी काम करून पोट ही रिकाम असते.. त्यामुळे अजून जोमाने ते पचवले जाते… 

आणि हो आज काल त्याला IF (Intermittent Fasting ) पण म्हणतात ,बर का!!!!

एकंदरीत समजलच असेल… की आपण काय खाल्लं पाहिजे आणि किती खाल्लं पाहिजे…. हीच जीवनशैली जगली पाहिजे ,अनुभवली पाहिजे… मग मात्र वजन काय ,शरीराची कोणती व्याधी पण होणार नाही…. 

शरीर नावाचे मशीन नक्कीच सुरळीत आणि नीटनेटके वर्षानुवर्षे विनातक्रार चालू राहील… 

आणि मशीन चालण्यासाठी वेळोवेळी जशी ऑइल ची गरज असते,अगदी तसेच वेळोवेळी शरीर चार्ज आणि कार्यरत राहण्यासाठी पाण्याची गरज असते.. 

त्यामुळे पचनासाठी.. स्किन ग्लो करण्यासाठी पाण्याची जास्तीत जास्त आवश्यकता असते… दोन लिटर पेक्षा पाणी कमी कधीच प्यायचं नाही आणि जास्त घेतलं तर उत्तम!!! 

पण तस होत नाही.. हो ना!!!!

मग तुम्हाला काय म्हणायचं आहे??????

🔊🔊Subscribe to ▶️ You Tube Channel ⬇️⬇️⬇️

Like to Vedio

🎧🎧Listen on Spotify as 🎤 Podcast ✅✅

🎤🎤🎧🎧Podcast
Share to ....
0 0 votes
Article Rating

Leave a Reply

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
1
0
Would love your thoughts, please comment.x
()
x
%d bloggers like this: