अनपेक्षित घडलं सारं!!

अपेक्षांचे ओझे वास्तव जगू देत नाहीत!!! 

अपेक्षा ठेवण पण तरी चुकीचेच आहे….

वास्तव जगायचं असते,अनुभवायचं असते पण अपेक्षांच्या ओझ्याखाली आपलाच बळी तर जात नाही ना!! याची पण तर काळजी घेयची असते…

खर सांगायचं झालं,जे आहे त्यात समाधानी न राहण्याची सगळ्यात जास्त वृत्ती मानव जातीमध्ये आहे , आणि हो सगळ्यात जास्त आकलन क्षमता पण मानवाकडेच पण त्याला हे का काळात नाही?? 

की जगण्याचा सरळ संबध हा वास्तवाशी आहे…. वास्तविक आयुष्य जगले तर सगळ्याच गोष्टी सोप्या होऊन जातील..नाही का?? 

आणि अपेक्षा वास्तविक आयुष्य अजिबात सुखाने काही जगू देत नाहीत.. हे पण तितकंच खरं आहे…

परिस्थिला दोष देण्याशिवाय,आणि अपेक्षित काहीच घडत नाही म्हणून सारख रडत बसण्यापेक्षा आयुष्यात खूप गोष्टी आहेत… ज्या आपण पूर्ण करून आपले वास्तव बदलू शकू आणि जे पाहिजे ते अपेक्षित रित्या पूर्ण करू शकतोच की… 

अगदी परिस्थितीवर मात करून!!!!

“ज्यावेळी गोष्टी आपल्या मर्जीप्रमाणे होत नाहीत ना,तेव्हा नक्कीच त्यात देवाची मर्जी असते.. हे नेहमी लक्षात ठेवायचे आणि ते रुजवायचे….”

ठरवलं होतं तिने.. परिस्थिती काहीही असो.. 

मला जग जिंकायचं आहे.. स्वतःच्या विचारांचे राज्य निर्माण करायचे आहे.. 

या सगळ्यासाठी शिक्षण महत्वाचे होते.. म्हणून अगदी मास्टर केलं… आता एवढं शिक्षण झाले म्हणजे नक्कीच छान काम मिळेल आणि स्वतःची ओळख पण.. 

जे तिने ठरवलं होतं ते झालं असते,तर आयुष्याचा अर्थच समजला नसता तिला… 

कारण त्यात पण तिने स्वतःला सिद्ध करण्याचा अट्टहास सोडला नाही… 

काही कारणास्तव तिला जॉब नाही करता आला.. घराची जबाबदारी आली.. लग्न झालं.. मुलं झाली… सगळ्यांच्या मागे- पुढे करता करता स्वतःची ओळख निर्माण करण्याची स्वप्न तशीच राहिली.. 

उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न,नीट झोपू पण देत नाही आणि नीट जगू पण देत नाही..

परिस्थितीला दोष न देता, माझ्याच बाबतीत अस का?? म्हणत म्हणत तिने सुरवात केली… 

तिची एक सुरवात ,पुढं काय घेऊन येणार होती याची जाणीव पण तिला नव्हती.. 

जॉब करू शकत नव्हती.. बाहेर जाऊन काम करू शकत नव्हती.. 

स्वतःच्या छंद जोपासवेत म्हणून, छंदावर जोर दिला… 

अस कोणते काम आहे ,जे मी नेहमी करू शकते अगदी न कंटाळता… तासन-तास..दिवसोनदीवस.. वर्षानुवर्षे…. आणि हे सगळं करताना जर फक्त आपल्याला आनंदच भेटणार असेल तर…. तो छंदाची जोपासना  का करू नये….

एक छंद तिचे आयुष्य बदलून टाकेल याची जाणीव तिला ही नव्हती…. 

आवड होती वाचनाची,त्यावर विचार करण्याची.. 

आणि स्वतःच्या भाषेत ते लिहिण्याची.. स्वतःच्या विचारांना मनाच्या दृष्टीकोनाची साथ मिळाली..  

आणि एक अखंड प्रवास चालू झाला… 

अगदी कशाचीच अपेक्षा न ठेवता.. 

फक्त निखळ प्रयत्न…. 

स्वतःसाठी लेख लिहायला सुरुवात केली.. नंतर मोमस्प्रेसो आणि प्रतिलिपी मिळालं… हे सगळं करत असताना ब्लॉगिंग विषयी समजलं… स्वतःच हक्काच व्यासपीठ मिळालं.. 

Blog… 

आणि प्रवास चालू झाला एक ब्लॉगर होण्याचा… 

छोट्या-मोठ्या कथा… कधी कधी पुस्तकाबद्दल… कधी कधी विचारविनिमय… कधी चालू घडामोडी.. तर कधी कधी मोठ्या कथामलिका….. 

रोज लिहीत – लिहीत.. मोठा ब्लॉग झाला… 

मराठी-कथा-कादंबरी-लेख

हाच तो ब्लॉग….. 

आणि अनपेक्षितपणे ब्लॉग एवढा वाढला की त्याला google adsense ने पण approval दिल… 

आणि खऱ्या अर्थाने कष्टाचे चीज झालं.. 

जे कष्ट कधी कष्ट वाटलंच नाही… ते परिश्रम कधी वाटलंच नाही.. 

फक्त एक आवड होती,ती जोपासत होते… 

यशाची अपेक्षा तिने केलीच नव्हती… 

पण जे अनपेक्षित यश तिने अनुभवलं त्यासाठी मात्र तिला शब्दच सापडले नाहीत… 

अनपेक्षित मिळालेले यश,खरच दाखवता येत नाही… 

तो आनंद शब्दात सांगता येत नव्हता… 

शेवटी काय ते शब्द च होते ,ज्यांनी इथं पर्यंत पोहचवले होते… 

शब्दांचा किती आदर करावा,तेवढा कमीच होता… 

प्रवास इथे थांबला नव्हता.. जग जिंकू पाहणाऱ्या तिला अजून चालायचे होते… 

प्रवास चालू झाला होता… 

आता You Tuber बनण्याचा…. आणि एक Podcast बनवण्याचा…

🎤🎤🎤 Podcast 🎧🎧

▶️. You Tube Channel

अपेक्षित काहीच नसते, फक्त वास्तव काय रंगावतोय ना…. त्यावरून भविष्यकाळ अवलंबून असतो…. 

शेवटी तिला हेच वाटलं, बर झालं जॉब नाही लागला तेच… 

नाहीतर मी एक लेखिका होऊ शकते ,याची जाणीवच झाली नसते… 

प्रवास हा चालू ठेवायचं आहे पण कुठे पोहचायचे आहे हे पण तितकंच म्हणत्वाचे आहे.. काही अपेक्षित आणि अनपेक्षित घडणा घडतच राहतील… जे अनपेक्षित घडेल,तेव्हा मात्र नक्की एक समजायचं आहे की जे आपण ठरवलं आहे त्यापेक्षा काही तरी चांगलं होणार आहे,आणि आपली वाटचाल चालूच ठेवायची आहे,निरंतर… 

Subscribe  & Follow both⬇️⬇️⬇️

Coming soon 🎧🎧🎤🎤Podcast….

Just subscribe to You tube channel….

Like to Vedio👍👍

Listen🎧🎧🎧
Share to ....
0 0 votes
Article Rating

Leave a Reply

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x
%d bloggers like this: