अपेक्षाच उरली नाही!!😢
अपेक्षाच नाही आता !!!!
मी खूप नाही पण थोडी थोडी स्वप्न पाहिली आहेत रे!!
त्या सात वचनांचा अर्थ पण समजून घेतलाय आणि हो ह्या गोष्टीवर पण विश्वास ठेवला आहे की,लग्नाच्या गाठी ह्या वरूनच बांधून आलेल्या असतात..
अगदी सगळं मान्य केलं, तेहतीस कोटी देवांच्या साक्षीने आणि आई-वडिलांच्या आशीर्वादाने.. सगळ्या कौटुंबिक-मित्रपरिवाराच्या साथीने.. आज मी तुझी झाले…
माझ्या वडिलांचे नाव काढून आज मी तुझं नाव लावल…. माझं काय ते नाव फक्त माझं राहील..
लग्नात घेतलेल्या आणि लग्नाच्या आधी घेतलेल्या सगळ्या गोष्टीवर तू ठाम राहशील ,ही मोठी अपेक्षा होती माझी….
सात वचन… सात जन्माच्या गाठी.. सगळं कसं छान होते..
तू आणि मी एकच.. त्यात काहीच मतभेद कधीच होणार नाही…
मग लग्नाच्या पहिल्याच रात्री … तू वरून तू मला ,अहो म्हणायला सांगितलं…
ठीक आहे,मग मी पण म्हणलं..
आदराने आणि सन्मानाने वागवणार होतास ना तू…. मग तो सन्मान कुठे गेला.. लग्न झालं.. तुझ्या नावच मंगळसूत्र मी गळ्यात घातलं आणि मी तुझी झाले…
मी तुझी झाले रे,फक्त…
पण तू माझा का नाही झाला फक्त???
माझे आयुष्य बदलत होते,पण तू त्याच कारण ठरशील अस नव्हतं वाटलं मला..
रोजच माझ्या अपेक्षा तुटत होत्या…
अरे त्या फक्त अपेक्षा नव्हत्या,मी च तुटत होते रोज…
जे हसू आणि विश्वास घेऊन मी आले होते,तुझ्यासोबत.. त्या दिवसाची मी आणि आज तुझ्यामुळे झालेली मी… यातला साधा फरक पण तुला समजत नाही, का रे????
माझी आवड काही राहिलीच नाही की?? तुझ्या आवडीनिवडी सांभाळता- सांभाळता…. मी मलाच विसरले की…
अरे तू माझ्यासाठी माझं आयुष्य बनून गेलास रे… पण तुझ्या आयुष्यातील एक कोपरा पण नाही मिळाला रे मला…
मी आहे म्हणून आपलं नात आहे… जणू तुला काही गरज च नाही… मी आहे काय आणि नाही काय….
तुझ्यासाठी मी माझं अस्तित्व नाकारले, माझी ओळख विसरले.. माझा आत्मसन्मान पायधुळी मिळवला फक्त माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं म्हणून रे…
पण तू माझी लायकीच काढली की, माझा सन्मान चारचौघात पण पायधुळीत मिळवला…
अरे आज मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे,माझी स्वतःची मत आहेत.. पण तुला माझ्या शिक्षणाची लाज वाटतेय… का तर आपली बायको तुझ्या स्वतःपेक्षा जास्त शिकली आहे म्हणून..
छानच की!!!!
मीच वाढवलं माझ्या या गर्भात नऊ महिने, माझ्या पोटच्या गोळयाला.. प्रसूतीच्या वेदना मी भोगल्या… त्याला काही कळत नव्हतं ना… तेव्हा त्याची भाषा फक्त मला समजत होती.. तेव्हा मीच शिकवले ना तुला…. त्याला काय म्हणायचं आहे…
तुला या सगळ्याचा विसर पडला, असू दे.. काही तक्रार नाही….
आणि आज तू त्यांना अस सांगतोस की,हिला काय कळतं… एक नंबर ची गावठी आहे.. हिला अक्कल आहे का?? नशीब माझं वाईट,जी ही माझ्या आयुष्यात आली…
तुझी जीभ नाही का रे जड आली.. ??? अस काही म्हणताना…
माझी हिंमत तोडली तू… मला तोडल तू????
बायको ची मोलकरीण करून ठेवलस…
काम झालं तुझं आता… आता फक्त कचऱ्यात टाकून द्यायचं राहिले आहे ना, हेच होत का तुझं वागणं…
तुला कल्पना तरी आहे का??
मी काय केलं आहे तुझ्यासाठी??? येणार पण नाही तुला कल्पना… आता सगळी तुझी काम पैशावर होतात ना…
माझं अख्ख आयुष्य मी तुला समर्पित केलं होतं रे… जाणीव तुला कधी नव्हतीच..
तू केवढ मोठं पाप घेऊन जगतोस,तुला याची जाणीव पण नाही…
माझ्या मनात तुझ्याविषयी ना… काही राहिलाच नाही बघ आता!!!
तू एवढा निर्लज्जपणे वागला आहे ना की आता माझी काही अपेक्षाच राहिली नाही बघ आता…
अपेक्षा तुटणारच होत्या खऱ्या, कारण वास्तवाचा चित्रच खूप वेगळं होते ना!!
अस ही तुझा खोटा मुखवटा तू किती दिवस मिरवणार होतास ना….
तो पण कधी काढावा लागणार होताच की!!!!!
पण एक सांगू का, तुझ्या अश्या वागण्यामुळे एक गोष्ट मी चांगली समजले…
अपेक्षा मात्र कोणाकडून कधीच ठेवायची नाही…
जेवढं आपल्याला करावं वाटतंय तेवढंच करायचे,पण स्वतःच अस्तीतव सांभाळून…
कारण लग्न मी तुझ्याशी केलं आहे ,तस तू पण तर केलं आहे माझ्याशी….
तुझ्या अपेक्षांवर मी नाही उतरले तर तू शिव्या देऊन तू मला जलील केलंस…
आणि तू माझ्या अपेक्षावर नाही उतरलास, मग मी काय करायचे होते… मी पण शिव्या देऊन ,तुझी लायकी दाखवायची होती का?????
मग शेवटी आपल्या दोघांच्यात काय फरक राहिला असता ना!!
सुखी आणि हसरा दिसणारा संसार ही फक्त माझी कमाई आहे… माझ्या संयमाचे ते फळ आहे… कारण माझं तोंड अजून बंद आहे…
आणि तसही…
मला तुझ्या तोंडी पण लागायचे नाही,तुझ्या सोबत राहून पण मला माझे संस्कार आणि माझ अस्तीतव जगायचे आहे…
कमळ पण चिलखलातच उमलते ना!!!
पण याचा अर्थ असा अजिबात नाही,की मी सगळं सहन करतेय म्हणून…
मी आता फक्त तुझ्या बोलण्याचा पॉझिटिव्ह अर्थ घेतेय,जोरात आणि जोमाने तयारी करतेय… कठीण परिश्रम घेतेय…
कारण तू माझी लायकी काढली होती ना.. तीच तुला दाखवायची आहे…
कारण…
“Work in silence,Let your success to your noise”
आता मी काय करेल…. याचा विचार तू नको करू….
परमेश्वराने सगळ्यांना एक तरी खुबी दिली आहे,जी फक्त त्याच्यातच आहे……
त्यावेळी मी तुझी अपेक्षा मोडली असेल,हे नक्की असेल..
अपेक्षा तुझी मोडलेली असेल,आणि वास्तव मात्र काही वेगळाच असेल…
या सगळ्याच श्रेय मात्र तुलाच देईन मी!!!
पण वाईट या गोष्टीचे वाटेल तुला की, मी अस काही करेल याची तुला अपेक्षा च नसेल!!
आणि खऱ्या अर्थाने माझी लायकी तुला कळेल!!!!!!
पण तेव्हा पण मला तुझ्या कौतुकाची पण अपेक्षा मात्र नसेल…..