नेवेद्याची “भूक” नेमकी कोणाला???
विचार काही केल्या मनातून जात नव्हता!!
विचार कसला तो, वास्तव परिस्थिती होती ती!!!
जर त्यांनी ठरवलं असते ,तर नक्की झालं असते… पण त्यांच्या मनात नसेल का आलं??? की मनात येऊन पण कोण करणार हे सगळं म्हणून नसेल करावं वाटलं??
माझ्या हातात पण काही नाही; मी त्यावेळी कदाचित काही करू शकले असते.. पण नाही करता आलं काही… ko
काही करता नाही आले,म्हणून खंत राहिली खरी मनात!!
म्हणून म्हणले,थोडं तुमच्याशी बोलून पाहावं..
सगळीकडे नवरात्रीचे धूम होती…सगळीकडे देवीचा जागर चालू होता…
एकोना – एक देवीला प्रसन्न करायचा अट्टहास होता तर, काही ठिकाणी मस्त धूम होती, नटण्या-मुरडण्याची…दांडिया खेळण्याची…. नऊ दिवस -नऊ रंग घालायलाचं पाहिजेत… एवढ्या वर कुठे थांबतंय….कोणी कोणाला शोधत होते…. या नवरात्रीत सगळं होते पण एक गोष्टी कडे कोणाकडेच लक्ष नव्हतं का????
का?? सगळ्यांच्या लक्षात होते पण,कृती कोणालाच करायची नव्हती…
त्या दिवशी शेवटची माळ होती,म्हणजे नववी… या नऊ दिवसात सगळे जण अगदी लांबून लांबून मंदिरात येत होते… सगळ्या देवीच्या मंदिरात रेलचेल होती.. अगदी सगळे जण कडाकण्या आणि नेवेद्य…घेऊन जात होते… वातावरण सगळं प्रफुल्लित होते.. धूप-अगरबत्यांचा सुवास दरवळत होता.. परडी असणारे देवीचे निस्सीम भक्त परड्या घेऊन बसले होते.. जे काही देतील ,त्यात ते समाधानी पण होते…
घरून खूप अट्टहासाने ,नेवेद्य आणि कडाकण्या घेऊन गेले… हिंदू संस्कृती म्हणा किंवा लहानपणी पासूनचे संस्कार म्हणा… आपल्याकडे कोणताही सण असला की आपण देवाला नेवेद्य दाखवतो.. ही आपली संस्कृती आहे ,आणि तोच नेवेद्य उद्या कचऱ्यात टाकून देण्याची वृत्ती पण आहे,काही ठिकाणी…
असो,त्याला प्रत्येकाची काही कारण असतील पण नेवेद्य दाखवून तो आपण परत खाऊ शकतो ना!!
ते राहिलेच…
त्यादिवशी खूप सारे नेवेद्य घेऊन ,कडकण्या घेऊन मंदिरात पाऊल ठेवलं..तिथले वातावरणाने मन मोहून टाकलं… देवापुढे नेवेद्य ठेवायचं आणि तिचा आशीर्वाद घ्यायचा… देवाला नेवेद्य दाखवणं म्हणजे खूप आत्मिक आणि वेगळंच समाधान आहे…
खूप आस्थेने नेवेद्य घेऊन गेलो होतो,पण तिथे बोर्ड लावला होता…
“नेवेद्य आणि कडाकण्या स्वीकारल्या जाणार नाही.. इथे कुणीही नेवेद्य ठेवू नका.”
वाचून खूप राग आला…. यांना काही फरक नाही का?? किती आस्थेने नेवेद्य करून घेऊन येतो… काय ईच्छा असते,आपली घरून खूप वेगळ्या भावनेने , तिच्यासाठी कष्टाने घेऊन जातो… पण तिथे ते लिहिलेले दिसलं आणि डोकच फिरलं…
पण तरीही ठरवलं की नाही ,मी घरून करून आणलाय तर मी ठेवणार… त्यासाठी मी डब्यातून नेवेद्य काढून ताटात वाढून घेतला..
“अहो,तुम्ही हे वाचलं नाही का??? ”
“हो, वाचलं आहे मी,पण मला ठेवायचा आहे…”
“अस ,नका करू तुम्ही ठेवला तर सगळे ठेवतील आणि आम्ही हे सगळं ठेवलेले नेवेद्य कचऱ्यात नेऊन टाकतो…. “
हे सगळं ऐकल्यावर काही बोलण्याची ईच्छा च राहिली नाही….
शेवटी मग देवीच्या चरणांवर ठेवून ,पुन्हा घरी आणले…
नेमका राग कशाचा आला होता?? त्यांनी नेवेद्य ठेवू न देता,त्यांचे स्पष्ट मत सांगितल्यामुळे की मी एवढं कष्ट करून पण देवीपर्यंत पोहचला नाही म्हणून??? पण त्यांचा डोळस निर्णय योग्य होता का?? की माझं फक्त मानसिक समाधानासाठी ,माझी चिडचिड होत होती…
शांत डोकं ठेवून ,विचार केला…
घरी पण असचं ,होते ना!!
देवापुढे नेवेद्य ठेवतो,आणि तो तसाच राहिला तर दुसऱ्या दिवशी मग तो कचऱ्यात जातो….
पण या प्रसंगावरून तर समजलं होते की,देवाला फक्त नेवेद्य दाखवून तो परत सगळयांना वाटून खाऊ शकतो..
आणि कचऱ्यात जाण्यापेक्षा पोटात गेलेला,कधी पण चांगला ना!!
सगळ्या नवरात्री मध्ये ,खूप मोठ्या प्रमाणात देवीला,नेवेद्य आले असतील ना?? प्रत्येक घरातून आले असतील, पण तेवढेच नेवेद्य कचऱ्यात पण गेले असतील….
सगळ्यांच मंदिरात अशा पाट्या नसतात,ना की नेवेद्य स्वीकारले जाणार नाहीत म्हणून…
एकअर्थी पटलं होते,नेवेद्य कचऱ्यात जाण्यापेक्षा तो माघारी घरी घेऊन जायला सांगितलं…
पण असं पण करता आले असते,किती तरी लोक आहेत ,ज्यांना दोन टाईम चे काय, एकावेळेचे जेवण पण नीट भेटत नाही….
अशा लोकांवर जणू अन्नपूर्णा देवी,नाराज झालेली आहे…
हे सगळे नेवेद्य,त्याच्या मुखात गेले असते,तर…
कदाचित याच्या पेक्षा जास्त देवी प्रसन्न झाली असते…
ऐकीव महितीनुसार,काही काही भागात अन्नाच्या पूर्णवापर होण्यासाठी किंवा शिल्लक अन्न गरजूंना पोहचवण्याचे,काही संस्था पण काम करतात..
अशा वेळी खर,प्रत्येक मंदिरात त्याचा फोन नंबर किंवा पत्ता द्यायला पाहिजे…
त्या गरजूंना पोहचवण्याचा ते दुवा ठरतील..
घरुन करून आस्थेने आणलेला नेवेद्य,त्याच्या मुखात गेल्यावर भेटणारा आनंद पण काही वेगळं नसेल ना!!
शेवटी,विचार केल्यावर तथ्य समजलं होते, त्याच्या हातून अन्नचा उपद्रव होयला नको,म्हणून त्यांनी तशी पाटी लावली होती आणि घरी नेवेद्य घेऊन जायला सांगितलं होतं…
पण जर त्यांनी तिथेच अशा संस्थानाची किंवा स्वतः त्यांनी ते सगळे नेवेद्य गरजूंना पोहचवण्याचे काम करू शकले असते..
आणि हे काम खूप मोठ्या प्रमाणात झाले पण असते.. कारण ते एक मंदिर चालवतात.. पण नेवेद्याची पण जबाबदारी पण घ्यायला हवी ना!! जशी ते आपण भरलेल्या ओटीची घेतात… महागड्या साड्या.. आणि इतर दान केलेल्या गोष्टींची घेतात,तसेच अगदी नेवेद्याची पण घ्यायला पाहिजे आणि प्रत्येक गरजू मुखात अन्न जाईल…
त्यांनी काय करावं ,हे आपण फक्त सांगू शकतो…
पण आपण पुढच्या वेळी मात्र नक्की करू शकतो ना…
कारण थोड्याच दिवसात दिवाळी येतेय.. आणि देवाच्या चरणांवरून नेवेद्य दाखवून ,तो घरी घेऊन जाऊयात किंवा अशीच कोणाची तरी दिवाळी अजून गोड करूयात!!!
आणि हो,तुमच्या पाहण्यात किंवा ऐकण्यात अशा काही संस्था असतील ,तर कमेंट मध्ये त्यांचा नक्की समावेश करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा…
नवरात्री आणि दसरा तर गेला,पण आता दिवाळी नका घालवू….
दिवाळीचे डब्बे ,पाहुण्यासोबत इतर पण गरजूंना देऊयात….
दिवाळी खऱ्या अर्थाने,एक नवीन विचाराने प्रजवलीत करूयात!!!!
मला नुकतीचK गूगल वर मिळलेली, nofoodwaste साईट…..☺️☺️
तुम्हाला भेटली असेल तर,कमेंट करायला विसरू नका,तुमच्या कमेंट ने कोणाची भूक ,भागू शकेल…..