कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥
कोणालाही वेळेच्या अगोदर नशीबापेक्षा जास्त मिळत नाही….
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥
अर्थातच हे वाकय आहे भगवतगीते मधील…
गीतेमध्ये सांगितल्यानुसार…. आपण सगळे कटपूतली आहोत… श्री कृष्णाच्या हातातील..
ज्याचं त्याच भाग्य आधीच लिहिलेले आहे…
याचा अर्थ असा मुळीच होत नाही की,मग आपण काय करायचेच नाही का?? आहे तस जगायचं का मग???
म्हणून च पाहिले दोन वाक्याने सुरवात केली आहे…
नशीब नावाचा शब्द कमजोर करतो ,अतिउत्साही माणसांना… आणि त्यांना असे वाटते की नशीब वगैरे काही नसते.. जेवढं कष्ट करू एवढं नक्की आपल्याला मिळणार..
पण
कधी कधी असं पण होते ना ! की आपण खूप कष्ट करतो,पण म्हणावं तस नाही भेटत आपल्याला.. मन उदास होयला लागत… नकारत्मक विचार मनात यायला लागतात.. आणि नकळत… पुन्हा बोट नशिबावर जाते… आणि जाणीव होते की खरंच नशीब असते का???? म्हणजे असतेच.. नाहीतर माझ्याबाबतीत अस का झाले असते ना!!
कोणतीही गोष्ट असो ते जगताना,आपल्याला ती गोष्ट काही तरी संकेत देत असतेच की…. ते संकेत म्हणजे पुढे येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी देण्यात येणार बळ असते…
पण लक्ष असेल तर समजेल ना!!!
हे खरं आहे की, वेळेआधी आणि नशीबापेक्षा जास्त नाही काही मिळत आपल्याला..
मग करायचे काय??? सोडून द्यायचं का सगळं…
काय करता येईल..
ज्या वर्तमानात आपण आहोत ,ते खऱ्या अर्थाने परिपूर्ण जगलं पाहिजे…
खूप वेळ,अगदी खूपदा.. सगळ्यांच्याच नाही … पण माझ्या सारख्या सामान्य माणसांच्या आयुष्यात नक्की ही गोष्ट होतेच होते…
की भविष्याची स्वप्नां एवढी रंगवली जातात की.. चालू वर्तमान काळ … त्याच्यामुळे खराब केला जातो…आणि फक्त वाट्याला येते ते तळमळ.. चिडचिड.. नैराश्य आणि वाद…
या सगळ्यांच्या परिणाम आपल्यावर तर होतोच पण समोरच्यावर…. आपल्याशी जोडलेल्या सगळ्यांशी होतो..
समोर असणाऱ्या मानसाकडे एखादी मोठी कार आहे पण माझ्याकडे साधी छोटी स्कूटर पण नाही… म्हणून मन हेलावत बसतो आपण आणि अजून सध्या भाषेत सांगायचे म्हणलं तर जळत.. कुढत बसतो.. आणि याचा सगळा दोष आपण आपल्या सोबतच्या लोकांना देतो किंवा नाहीच कोणी तर सरळ देवाला…
पण आपण कधी हा विचार का नाही करत की???
“हो,आहे माझी इच्छा ही गाडी माझ्या दारात असावी… आणि ती माझी असावी… त्यासाठी मला अजून काय काय करावे लागेल.. ते पाहावं लागेल.. पैसे जमवावे लागतील.. काही तरी काम करावे लागतील ना… की फक्त पाहून कार नाही ना,होणार आपली”
अशी पण काही महत्वाकांक्षी लोक असतात आणि काही जण असे पण असतात..
काही न करताच, माझ्या नशिबात नाही म्हणून सोडून जातील…
पण असे पण वाटत असेलच ना की… नशिबात असेल तर नक्की भेटेल म्हणून…
अहो ,पण नशीब तेव्हाच चार्ज होइल ना,जेव्हा त्याला कष्टाची साथ मिळेल…
वर्तमानात जगण्याची सवय लागली ना,की सगळ्या गोष्ट वेळेतच मिळतात.. वर्तमान जगताना फक्त.. कर्म करत राहायचे आहे.. उगीच म्हणत नाही ना…
ज्या-त्या वेळेत झालेल्या गोष्टी चांगल्या असतात…
आणि केलं तर होणार आहे…
विचारांना कृतीची जोड हवीच…