आई.. मी मोठा झालोय!!
आई.. मी मोठा झालोय!!
म्हणजे जेव्हा घरातील लहान मूल म्हणते ना..
अगदी.. छोटू छोटूल.. इकडे तिकडे दडवत म्हणते ना ते..
“आई,मी मोथा झालो ना.. आणि सांग ना!”
ते शब्द मन अगदी खळखळून हसायला भाग पडते… आणि अगदी मोकळ्या मनाने हसतो पण आपण… हो हो…. झालं ना माझं बाळ मोठं…पण आई साठी अजून लहानच आहे….
त्यावेळीचा प्रसंगी मोठेपणी पण होतच की.. पण ना आई तीच असते .. आईची काळजी कधीच कोणाला समजणार ही नाही.. आणि तिची कमी मात्र ती जवळ नसली की जाणवल्याशिवाय राहत नाही…
खरंच इव्हलशे बाळ जेव्हा मोठेपणी म्हणते की आई ,आता मी मोठा झालोय ग.. आणि ते पण अगदी ओरडण्याच्या सुरात.. तेव्हा आईच्या काळजाला लागणारा घाव फक्त त्या आईलाच माहिती..
रोहन… खूप लाडका.. आई ची सावली म्हणली तर चालेल.. ते पण दिवस म्हणायला लागतील…
“माझा रोहन कधीच मला सोडून जेवत नव्हता.. म्हणजे मी शेतात काम करत असायची ना.. तर त्याला त्या काळ्या मातीत ढेकळात चालायला.. आणि चल ना,आपण जेऊयात म्हणून मला घरी घेऊन जायचा.. ” सुमन तिच्या जुन्या आठवणी सांगत होती..
“हो ग,पण तू आता रडू नको” काव्या..
“नाही ग.. पण आज सकाळी तो मला अस काही बोलून गेला की मला वाटतच नाही ग की तो माझा रोहन आहे म्हणून” सुमन..
“माझं मुलगा खरंच एवढा मोठा झाला का ग?? मी फक्त त्याला विचारले की अरे तू जेवलास ना??? तर माझ्यावरच उलटला.. आई …. तुला कळतंय का…मी ऑफिसमध्ये आहे म्हणून आणि तू मला मी लहान असल्यासारखं रोज काय विचारतेस ग ,जेवलास का म्हणून???”
त्याचे हे शब्द ना ,माझ्या मनातूनच जात नाहीत ग.. काव्या….
मला त्याला त्रास नव्हता द्यायचा.. समोर ताट वाढून घेतल की येते त्याची आठवण आणि आपसूकच फोन कडे हात जातो….
” ऐक, सुमन…तू पण जास्त मनाला लागून घेऊ नको… त्याला बाकीचा काही ताण असेल ग… कामात असेल… म्हणून म्हणाला असेल… ” काव्या सांगत होती…
“हो.. पण तो मला शांतपणे पण सांगू….” सुमन…
“ह्या मताशी मी पण सहमत आहे बघ,तुझ्या.. शांतपणे तो सांगू शकला असता… आणि त्याने तेच सांगायला हवं होतं…” काव्या बोलत होती….
सुमन खूप नाराज होती… तिच्या मनाला खूप लागलं होतं…
आता मुलाच्या दृष्टिकोनातून ती असेल छोटी…
खर तर त्यादिवशी रोहन ने घरी आल्यावर आई सोबत बोलायला पाहिजे होते.. तसे घरात ते दोघेच असतात..आईला आधार म्हणला तर तोच फक्त… जिने सगळं आयुष्य त्याच्या हव्या-नको त्या गोष्टी घालवले तिच्यासाठी ही गोष्ट खरंच खूप मोठी होती… आणि ते फक्त आईच जाणू शकते…
दुसऱ्या दिवशी पण काही खास म्हणावं तस बोलणं झालं नाही…
सुमन त्याचा टिफिन बनवत होती… तिची घाई चालूच होती..
“आई, मी जातो.. मला आज लवकर जायचंय… आणि टिफिन नको मला.. मी खाईल बाहेर काहीतरी” अस म्हणून बाय करून रोहन खरं निघून गेला…
“बर” सुमनने पण त्याला बाय केलं…
आज ती शांत होती.. दुपारी जेवताना ताट वाढून घेतलं आणि नकळत फोन हातात घेतला पण काल झालेला प्रकार लक्षात आला आणि मनाला समजावत तिने घास तोंडात घातला खरा,पण त्याच्यावर डोळ्यातून पाणी आलं..
गिळलेल्या घासासोबत, कालचा दिवस पण गिळला होता..
आणि आता स्वतःला सावरत जुन्या लहानपणीच्या आठवणींमध्ये हरवून गेली…
रोहनचे काम जवळ जवळ होत आले होते.. पोटात कावळे ओरडत होते म्हणून सहज बॅगमध्ये हात घातला.. तर डबा नव्हता… मग त्याच्या लक्षात आलं की आज मीच नको म्हणलं होते.
“पण आज आईचा फोन पण आला नाही”रोहन स्वतःलाच म्हणत होता..
तेवढ्यात काव्या चा फोन आला..
“हाय, जेवलास का?? नाही ग माऊ” रोहन…
“आवाज का खाली गेलाय” काव्या
“काही नाही ग,आईचा फोन आला होता का तुला आज” रोहन..
“का रे ,नाही.. तुला असेल ना पण . जेवला का बाळा म्हणून… तिला अजून कळत नाही का रे?? तू आता मोठा झालाय,सारख काय रोज-रोज फोन करायचा” काव्या चे बोलणं त्याला समजलं होते..
“तस नाही माऊ ,आई आहे ती माझी… ” रोहन..
“हो ना,तेच ना…मुलं मोठी होतात रे,पण आई नाही होत ना… तिची माया,प्रेम छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये ती खुश असते रे” काव्या…
“हो ना…सॉरी यार… ”
“मला नाही,आई ला” काव्या हसत म्हणली…
रोहन ने आईला फोन लावला…
“अग, आई… भाजी खारट नव्हती झाली ना ग” रोहन..
“गप तू….” आई चे डोळे पुन्हा भरले..
“बर,आज रात्री आज आपण बाहेर जाऊयात..
“बर”
सुमन खुश झाली…. सुमनच्या मनातील सगळे प्रश्न डोळयांच्या पाण्यासोबत वाहू गेले…
आता तुम्हाला वाटलं असेल ,काय तथ्य आहे…. ह्या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा समजायला हव्यात.. आईसाठी तेवढी मुलं संवेदनशील असायला हवीत.. आणि खरचं खूप वाईट वाटते की आजच्या काळात आई-मुलांमधील ते नातं .. ती संवेदना… आईची काळजी…
सगळ्याच गोष्टी बदलल्या आहेत…
बदल चांगला असला तरी, जुनं तेच सोन असते..
मुलांना तर एवढंच सांगते की… नेहमी एकच लक्षात ठेवा..
आई समोर आणि आई सोबत तिची मुलं मोठी होत असतात.. तिच्यासमोर तुम्ही मोठं होत असतात.. पण आई कधीच मोठी होत नाही…
फक्त जपा.. शेवटपर्यंत तिच्या मायेत कधीच तीळ मात्र कमकरता राहणार नाही..
कारण…
आई.. मी मोठा झालोय खूप… पण तुझ्यापेक्षा नाही ग…