Real Man Never Rape
कोणत्या घटनेची बातमी करायची…. आणि त्या बातमीला कथा कशी साकारायची… याच उत्तम उदाहरण म्हणजे भारतीय संविधानाचा चौथा स्तंभ..तो चांगला ओळखतो आणि जाणतो…
त्यांच्या साठी ती बातमीच असते…. टीआरपी चे गणित असते.. आणि भावनांचे खेळ असतो…
मनाचा उद्रेक झालाय…. हो,कारण ही कथा आहे… आणि ती रोज घडणारी बातमी आहे…
खर सांगायचं झालं ना,तर ती खरंच फक्त बातमी म्हणून राहतेय…
आणि रोज येणारी बातमी.. आता खेळ होऊन बसला आहे…
कारण सगळ्यांनी मौन धरायचे ठरवलं आहे…
त्यादिवशी,रात्र नव्हती बर का.. हे आधीच मी सांगतेय… नाहीतर सगळयांना हेच वाटेल की ह्या सगळ्या गोष्टी रात्रीच्या .. अपरात्री.. निर्मनुष्य ठिकाणीच होतात म्हणून..
त्यादिवशी नाही रात्र होती आणि नाही निर्मनुष्य ठिकाण होते.. सगळीकडे सगळ्यांची गडबड होती.. रस्त्यावरून वाहनांची ये-जा चालूच होती….
ठिकाण : विरार
स्थळ : हायवे
मी म्हणजे मुलगी… कोणाची तरी कन्या… म्हणून या फक्त कल्पना करून लिहिलेल्या कथेतून ,मी तिची भावना समजण्याचा प्रयत्न करते आणि हो तिची सत्य परिस्थिती यावरून ही वेगळी असेल आणि तिचा अनुभव पण भयानक असेल…
माझी तर ही फक्त कल्पना आहे… आणि कल्पना फक्त सत्याला जोडून असते…. खर सत्य कधीच नसते..
म्हणूनच,नायिकेचे नाव,”कन्या” च ठेवुयात…
कन्याचे वय तसं जास्त नाही; बावीस वर्ष असेल.. आणि तिला त्यादिवशी बाहेर गावी जायचे होते… कुठेच वाहनांची सोय होत नव्हती.. जवळच जायचे होते.. म्हणून हाय वे ला थांबले… म्हणलं,एखादी गाडी भेटली तर त्यामध्ये जाऊयात..
आणि त्यात ती एकटी नव्हते ना.. तिच्या सोबत दहा महिन्याचे बाळ ही होते..
वाहन खुप चालू होती, रस्त्यावर खूप वाहनांना हात पण केला पण कोणी थांबायचे नाव घेत नाही…
तेवढ्यात एक कार थांबली…
“देवच पावला,” कन्याने मनोमन म्हणाली.
ती तिच्या लहान दहा महिन्याच्या बाळासोबत कारमध्ये बसली..
आता कार मध्ये किती जण होते ,ते कन्याला च माहिती..
थोडस बोलणं झालं… कन्या ला पण थोडा आधार वाटला…
पण पुढे अस काही झालं… नाही त्याला शब्द आहेत आणि लिहिताना ही किळस येतेय..
जो कोणी होता… किंवा होते.. त्या नराधमांनी.. तिच्यावर चालू गाडीत बलात्कार केला… तिच्या वर अत्याचार केला… आणि तिच्या त्या दहा महिन्याच्या बाळाला कारमधून खाली फेकून दिले…
आणि थोड्यावेळाने तिला ही…
बातमी टीव्ही वर पाहताना मन सुन्न झाले होते… राग.. संताप.. आक्रोश वाटत होता…
खूप विचित्र गोष्ट आहे…. कोण काय बोलणार…
जिच्यावर ही परिस्थिती ओढवली आहे,त्याची तर आपण फक्त कल्पना च करू शकतो… वास्तव फक्त भोगणाऱ्यालाच माहिती…
अहो,पोलीस स्टेशन मध्ये जाऊन ,तक्रार करायला पण हिंमतच लागते ना! अन्याय झाला आहे आणि काय झालंय ते सांगणं पण कठीण होते..
त्यावर केस चालू होते… विचारपूस चालू होतं असेल.. आणि नंतर आयुष्य न जगलेले बर असेच वाटत असेल ना!
एक नाही अशा बऱ्याच घटना होत आहेत…. जस की अजूनही चर्चेत आहे ते श्रद्धा वालकर ची घटना .. आणि आज अकोल्यात घडलेली घटना… दोन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला..
करणारे भामटे तिच्या ओळखीचे होते… म्हणजे त्यातील एक मित्र ओळखीचा होता..
सहन कोणाला करावं लागलं… आणि एवढं सगळं होत असताना ,असा कोणताही कायदा नाही किंवा असा कोणतीही शिक्षा नाही…. ज्याने करून त्याच्यवर आळा बसेल.. वाईट प्रवृत्तीच्या लोकांवर भीतीचे सावट तयार होईल….
भीती त्यांना वाटायला पाहीजे… मुलगी एकट्याने जात असल्यावर,त्यांच्या अंगावर काटा आला पाहिजे… मुलीच्या नाही.. मुलीच्या मनात संकोच नाही राहिला पाहीजे..
कर्मभूमी-धर्मभूमी.. म्हणतो ना आपण.. महाराष्ट्राला… मग कुठेय ते….
माऊलींचा महाराष्ट्र आहे… छत्रपत्री शिवाजी महारांजांच्या शिकवणीत घडलो आहोत आपण सगळे… स्त्रीचा आदर केलाच पाहिजे… स्त्रीला देवीचा दर्जा आहे… सगळ्याच जास्त आणि सहनशीलता असणारी ती आहे..
पण ना!! आता तिच्यातील सहनशक्ती संपली आहे…. तिच्या सहनशक्तीचा अंत झाला आहे….
अंत हा कधीच अंत नसतो, नवीन इतिहास घडणार असतो… आणि हा इतिहास आता घडवावा लागणार आहे..
नाहीतर एकवेळ अशी येईल की, बाईलाच बाई चा जन्म देऊ वाटणार नाही आणि कारण फक्त एक असेल की नराधमाच्या वाढता सुळसुळाट…
असले,नराधम आजूबाजूला असतात ना,म्हणून आता.. मुलींना त्यांच्या आवडत्या ठिकाणी.. आवडत्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी ही गमवावी लागते.. त्यांच्या मनात नसताना ही फक्त,दिवसा आणि घरापासून जवळ आहे म्हणून काम करावं लागतं…
आणि त्याच मुली लहान असताना त्याना,किरण बेदी; इंदिरा गांधी… सावित्रीबाई फुले, आनंदीबाई…. मेरी कोम.. सानिया मिर्झा.. कल्पना चावला… यांच्या शौर्याची कहाणी सांगून मोठे केले जाते… त्यांच्या पंखांना बळ दिले जाते आणि ज्यावेळी उडण्याची खरंच वेळ येते.. तेव्हा मात्र या नराधमांना मुळे नाही उडून दिल जात..
स्वप्न मग फक्त स्वप्न च राहून जाते…
पाच मिनिटं… म्हणजे फक्त तीनशे सेकंद…. जरी उशीर झाला ना,मुलीला यायला…. तर त्या बापाचं काळीज बघा.. त्या आईची धडपड बघा… विचारांचे चक्र असे जोरात चालते ,ना… की नको ते विचार येतात..
एवढी असुरक्षितता वाढली आहे,स्वतःच्या मुलीवर शंभर टक्के विश्वास जरी असला ना तरी तिला भेटणारा नराधम असू शकतो हा त्यांचा दोनशे टक्के विश्वास बनून जातो..
नराधमांचा एवढा सुळसुळाट एवढा वाढला आहे की त्यांना लहान मुलींच्यात पण त्यांना निरागसता दिसत नाही…
काय चूक असते,त्या निष्पाप जीवांची..
कसं, वाढवायचे आपल्या मुलींना ,हा सगळ्यात मोठा प्रश्न होऊन बसलाय.. त्यांना स्वतःच्या प्रोटेक्शन साठी कराटे, जुडो शिकवले जाते.. पण त्यासाठी भिडणारे पाहिजेत ना.. त्याच्या तर एवढा पण दम नसतो, कधी त्यांच्या पेयामध्ये गुंगीचे औषध टाकून तर,कधी… त्यांच्यावर भ्याड असा ऍसिड हल्ला करून… त्याना तोडलं जाते..
खर,ना.. त्यांच्या डोळ्यावर झापड आली आहे,मुलगी ही साधन वाटत आहे,त्यांच्या शरीर सुखासाठी.. एक साधन बनून घेतलंय..
एकीकडे ,असे नराधम खुलेआम फिरतात आणि तेच जेव्हा छत्रपती शिवरायांच्या जयंतीला येतात ना, तेव्हा सगळ्यांनी त्यांचा भाषणाचा विषय हा त्या जमीनदाराला काय शिक्षा दिली होती ना,जेव्हा त्याने महिलेवर हात टाकण्याचा प्रयन्त केला होता तेव्हा..
तो प्रसंग का नाही,कोणी सांगत…
सांगितलं पाहिजे,लोकांपुढे त्याच्याबद्दल आणि तशीच भीती राहिली पाहिजे..
शिवरायांचे मावळे ना आपण,मग वागा ना त्यांच्यासारखे.. गरज आहे… त्याची… खरंच…
कधी तर असे वाटते ना की,सगळ्या मुलींनी त्यांचा ड्रेस कोड बदलला पाहिजे,सगळ्यांनी देवीची रूपे धारण केली पाहिजेत.. त्यांच्या दिसण्यात….त्यांच्या बोलण्यात सगळ्या देव्या अवतरल्या पाहिजेत ,तेव्हा कुठे त्यांना थोडे मन कापली जातील..
कायदा कधी येईल, माहीत नाही.. त्याच्यावर काम चालू आहे ,आपण वाट पाहण्याशिवाय काहीच करू शकत नाही..
पण तो पर्यंत सगळ्या भगिनिंना एकच विनंती आहे,स्वतःच संरक्षण स्वतः करा..
समोरच्याचा वागण्याला हेरा,त्याचा दृष्टिकोन बघा..
थोडी जरी शंका वाटली, तरी तिथून लगेच निघा..
किंवा जवळच्या अगदी घरातील सदस्यांना कल्पना द्या.
जाणून-बुजून कोणी त्रास देत असेल,तरी लगेच घरात सांगा..
सगळ्यात म्हणत्वाचे म्हणजे,स्वतःकडून काही चुकणार नाही याची काळजी घ्या.. समोरच्याला कोणत्याच गोष्टीला प्रवोक करू नका..
तुमच्या जवळचे सगळेच मित्र-मैत्रिणींना घरच्यांशी ओळख करून द्या..
त्यांच्या बद्दल प्राथमिक माहिती ठेवा..
फक्त ओळखीचा आहे,एवढी माहिती अशा प्रसंगांना आमंत्रण देते..
शक्यतो,रात्री-अपरात्री एकट्याने प्रवास टाळा..
हे असं म्हणणं जरी चुकीचे असले तरी आता ती वेळच आली आहे..
आणि सगळ्यात म्हणतावच,प्रेम म्हणजे त्याग नसतो… किंवा आसक्ती नसते…
प्रेम म्हणजे फक्त काळजी असते ,एकमेकांचा आदर असतो.. ते ओळखायला शिका….
नाहीतर कधी कधी ज्याच्यावर जीवापाड प्रेम असते,तेच लोक पस्तीस -पस्तीस तुकडे करायाला पण मागे नाही पाहत…
सगळ्यांनी स्वतःची जगण्याची मूल्य जपा..
मुलींना खरच जपा…
Very true!