मराठी कथा-कादंबरी-लेख Blogs- Entertainment- Travel- Food

"वाचत राहा,जगण्याला प्रेरणा मिळण्यासाठी📖 Stories| Reviews| Entertainment | Greetings | Travel | Food

प्रेरणादायी कथावैचारिक कथा

Resolution2023 |जीवन बदलणारे संकल्प

Subscribe|Like| Comment

सगळं शून्य आहे,असं म्हणून सुरवात करायची..
संकल्प हे मोडण्यासाठी मुळीच नसतात..
संकल्प म्हणजे,आपल्याला ठरवलेली एक संधी असते.. जे आपल्याला मनाप्रमाणे आणि त्यातून फक्त चांगलंच होणार आहे..
जस की झाड लावल्यानंतर त्याची गोड फळं खायला मिळणारच ,हे नक्की असते…. अगदी तसंच…
एवढी चांगली संधी आहे,जून जे झालं ते,सगळं सोडून.. विसरून… नवीन सुरवात करणार आहोत….
2022 संपल,त्याच्या सोबत सगळं जुनं काही होत,ते पण बाजूला ठेवुयात…
अर्थात चांगलं घेऊन जाणार आहोतच पुढं….
2023…. आज चालू झालं..
या वर्षात म्हणजे 360 दिवसात… आज केलेले फक्त उद्या पण करायचा आहे….


मी ठरवलं आहे,काय करायचं आहे ते….
1.आज जे काही आहे… 2023 मध्ये आहोत.. यासाठी thankful असायचं आहे.. आणि या वर्षातील प्रत्येक दिवसासाठी thankful च राहायचं आहे.
2.कोणालाही अगदी ,खूप घनिष्ठ संबंध असलेले किंवा अगदी नव्याने भेटलेल्या व्यक्तींना कधीच Judge नाही,करायचं.. Judgement नाही होयचं.
3.प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते,त्यांची भूमिका वेगळी असते,तिचा आदर करायचा.. देता आली तर साथ देण्याचा प्रयत्न करायचा पण त्याला मागे किंवा त्याला अपशब्द नाही वापरायचे.
4.जे काही आहे ,त्यात समाधानी तर राहायचं आहे आणि नवीन निर्माण करण्याची ताकद पण ठेवायची आहे…
5.नशिबाचा निर्णय आपण स्वतः नाही घ्यायचा..
6.कोणाच्याही मागे वाईट नावे नाही,ठेवायची.. कारण एक तर त्यांना ते कळणार नाही आणि समजलच तर आपल्या स्वतःकडून न समजता दुसऱ्याकडून समजल्यामुळे अजूनच तणाव निर्माण होऊ शकतात..
7.एखादी गोष्ट नसेल पटली,तर नाही म्हणून टाका.. विचारांमध्ये मतभेद असू शकतात.. आणि ते स्वीकारा.. दुसऱ्यावर लादु नका….
8.रोज शरीराला 30 मिनटं घ्याच..कारण शरीर एक मशीन आहे.. सगळे अवयव व्यवस्थित चालू राहिले तर,नक्कीच आयुष्य वाढणार आहे..
9.साधी गोष्ट,भरपूर पाणी प्या..हे पण न होणार काम आहे..ते करायला सुरुवात करा..
10.व्यायामाने जस शरीर सदृढ होते,तसच विचार सदृढ होण्यासाठी चांगले विचार ऐकत जा… किंवा चांगलं वाचन करत राहा..

11.जर काही चुकलं.. छोटी चूक असो किंवा मोठी.. ती स्वीकारा… त्याची कबुली द्या आणि ती सुधारण्याचा प्रयत्न करा..
12.न पेटलेल्या गोष्टींना नकार द्या… कुढत राहू नका..
13.दुसऱ्याची काळजी तुम्ही घेत असालच… पण स्वतःची ही चांगली काळजी घ्या.. स्वतःची काळजी घेणं,स्वार्थीपणा नसतो… ते स्वतःसाठी स्वतः ने दिलेलं एक गिफ्ट असते.. जर आपण स्वतःची काळजी स्वतः नाही ,घेतली तर दुसऱ्यांनी घ्यावी याची अपेक्षा ठेवणं ही चुकीचं आहे.
14. स्वतःच कर्म करत राहा, स्वतःची तत्वे समोरच्याच्या वागण्यावर अवलंबुन नका ठेवू… कर्माच फळ मिळेलच.. पण त्यासाठी आसक्त नका राहू.
15.आई-वडिलांनी मुलांचे संगोपन करण हे आईवडीलांचे कर्तव्य जरी असले तरी,आई वडिलांना आधार देणे आणि त्यांच्या उतारवयात त्यांच्यातील लहान मुलाला समजून घेऊन ,मुलांनी त्यांचं आई-बाप होऊन काळजी घेणं गरजेचं आहे.
16.स्वछता हा ,सार्वजनिक विषय नसून तो व्यक्तीगत आहे ,ते समजून घ्या.. स्वतःकडून काही कचरा होणार नाही याची काळजी घ्या..
17.चांगल्या कामाचे,कौतुक करा.. मग चांगला काम करणारा आपला शत्रू असला तरी!
18.रोजची काम रोज करा… उद्या कधीच येत नाही…आज च काम आज केलं ,तर उद्याची गरजच भासणार नाही
19.वाईट काळातही चांगल्याची आशा सोडू नका.
20.कितीही राग आला,तरी तो बोलू व्यक्त करू नका.. विचार करून त्याच्यावर तोडगा काढा.
21.पुन्हा पुन्हा समस्या गिरवू नका,त्या कशा सोडवली जातील.. या कडे लक्ष द्या.
22.प्रत्येक नात्यांचा आदर करा.. नाती आहेत तर सगळं आहे…
23.सगळ्यात महत्त्वाची माणुसकी आहे,मग सगळं आहे.. शत्रुत्व पण..
24.कोणाला जाणून-बुजून त्रास देऊ नका..आणि कोणाचा त्रास पण सहन करून घेऊ नका..
25.जीवन वर्तमान काळात जगायला शिका..भविष्याच्या तडजोडीत ” आज ” विसरू नका….

अजून तुम्हाला ,काही सुचत असेल तर Comment करून मला नक्की कळवा..
आणि 2023 सगळ्यांनी मिळून छान बनऊयात…
आणि आज 1 जानेवारी 2023…जीवनाची मूल्य जपायला सुरवात करूयात आणि येणारा 31 डिसेंबर 2023 ला त्याचा रिझल्ट पाहूयात.. आणि अर्थात हे सगळे दिवस आपण एकत्रच असणार आहोत.. नवीन नवीन कथा…. गोष्टी.. विचार…ऐकण्यासाठी….
पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या नवीन दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा!!!

Share to ....
0 0 votes
Article Rating

Leave a Reply

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x
%d bloggers like this: