राजमाता जिजाऊ :भाषण
Video पाहण्यासाठी येथे क्लिक करा⬇️⬇️⬇️
https://youtube.com/@Inspireinmarathee
स्वराज्याचे स्वप्न बघणाऱ्या आणि फक्त बघणाऱ्याच नाही तर ते सत्यात देखील उतरवणाऱ्या, राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ यांचा 12 जानेवारी हा जन्मदिवस
राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्याचे स्वप्न बघितलं आणि ते स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्यात उतरवलं, जर जिजामाता नसत्या तर कदाचित हिंदवी स्वराज्य निर्माण होऊ शकलं नसतं.
राजमाता, स्वराज्यजननी माँसाहेब जिजाऊ यांच्या कार्याबद्दल माहिती नाही असा एकही माणूस आज आपल्याला सापडणार नाही त्यांनी स्वराज्याचे स्वप्न बघितले आणि फक्त बघितलेच नाही, तर ते सत्यात देखील उतरवले.
आई ही जगातील सर्वात महान योद्धा आहे. आई म्हणजे प्रेम, आपुलकी द प्रेरणा संयम आणि सामर्थ्य यांचा संगम आणि या सर्व गुणांचा सुंदर संगम म्हणजे स्वराज्य जननी बाई शहाजीराजे भोसले. माँसाहेबांचा उल्लेख करताना कुठल्याही संदर्भाची गरज पडत नाही.
अशा या शूर पराक्रमी जिजामाता, (राजमाता जिजाऊ) यांचा जन्म जानेवारी १२ इ.स. १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला.सिंदखेडचे लखुजी जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते.
12 जानेवारी हा दिवस अख्ख्या महाराष्ट्राला लाभलेला सोनेरी दिवस आहे.या दिवशी राजमाता जिजाऊ यांची जयंती ,राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांना व त्यांच्या कार्याला अभिवादन केले जाते.
शहाजीराजे भोसले हे वेरूळ येथील मालोजी भोसले यांचे पुत्र होय. जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये झाला.
निजामशाही आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती अतिशय भीषण होती. त्यांच्या विरुद्ध एक शब्द काढायची हिम्मत कोणामध्ये नव्हती. या जुलमी सत्तेच्या बंधनातून रयतेची सुटका करावी असे जिजामातांना नेहमी वाटे. अशा बिकट परिस्थिती स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले.
19 फेब्रुवारी 1630 रोजी माँसाहेब जिजाऊ यांच्या पोटी पराक्रमी शिवाजी महाराजांचा जन्म झाला.आपल्या पतीचं स्वराज्याचं स्वप्न ज्यांनी पुत्र शिवबाच्या मनात पेरलं. नुसतं पेरलं नाही तर सुसंस्कारांच्या अमृतसिंचनाने ते फुलवलं. फुलवून वाढवलं. त्याला दृष्ट लागू नये म्हणून डोळ्यात तेल घालून जीवापाड जपलं. त्याला नवनवी पानं फुलं दिली.
राजमाता जिजाऊसाहेब यांनी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी छत्रपती शिवराय यांना ज्ञानाच्या दुर्य चरित्र संघटना व पराक्रम अशा राजास व सद्गुणाचे बाळकडू पाजले.प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे ध्येय एकच असते ते म्हणजे पारतंत्र्यात असणाऱ्या लोकांना स्वातंत्र्य मिळवून देणे अशी राजमाता ने शिकवण शिवरायांना दिली होती.
शिवाजीराजे १४ वर्षांचा असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली.
कुशल अधिकाऱ्यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी पुण्यात येऊन दाखल झाले.व उद्ध्वस्त झालेले पुणे, दिमाखात वसवून त्याला नावलौकिक प्राप्त करुन दिला जिजाऊंनी.जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच शिवाजीराजे घडले. जिजाऊंनी नुसत्या गोष्टीच सांगितल्या नाहीत तर शिवरायांना राजकारणाचे पहिले धडेही दिले.
राजमाता जिजाऊंच्या शिकवणीच्या आणि संस्काराच्या जोरावर छत्रपती शिवरायांनी हजार वर्षाचे गुलामगिरी मोडून काढली आणि राजमाता जिजाऊ यांचे स्वप्न साकार करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
स्वराज्याच्या कार्यात शिवरायांना अनेक धाडसी मोहिमा कराव्या लागल्या जीव धोक्यात घालावा लागला. पुत्राचा दररोज मृत्युशी चाललेला संघर्ष, उघड्या डोळ्यांनी बघुनही सैरभैर न होता, व चिंतेची साधी रेघही चेहऱ्यावर उमटू न देता, त्यांनी खंबीरपणे स्वराज्याची निगरानी केली.
एवढेच नव्हे तर राजमाता जिजाऊ या आजी झाल्यावर.
निवृत्तांसारखं न बसता, नातू शंभूराजांच्या मनातही अंत:करणाची पेरणी करून, स्वराज्याभिमानाचं असं स्फुलिंग चेतविलं,! तीन पीढ्यांना स्वराज्याच्या ध्यासाने प्रेरित करणारी अशी राजमाता होती.
राजमाता जिजाऊ म्हटलं की पुरे! नुसतं राजमाता म्हटलं तरी ओठांवर आपसूक जिजाऊ शब्द येतो. राजमाता आणि जिजाऊ हे शब्द म्हणजे जणु एका नाण्याच्या दोन बाजूच होय! स्वराज्य निर्मात्या या राजमातेला, आज त्यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा.
रयतेसाठी लढ पोरा, रयतेसाठी लढ पोरा,
असत्या आईचा आवर्त होता, ती आई म्हणजे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ.
दगडालाही फुटेल पाझर,
शब्दांमध्ये तेवढा प्रभाव पाहिजे,
दगडालाही फुटेल पाझर,
शब्दांमध्ये तेवढा प्रभाव पाहिजे,
पुन्हा या महाराष्ट्राला,
जिजाऊंच्याच विचारांचा लढा पाहिजे,
जिजाऊंच्याच विचारांचा लढा पाहिजे..