Review: “When the weather Is Nice”☺️

Wow! When the weather is nice…

cool name na☺️☺️….

हो,जस नाव तसंच अगदी!!! पण आहे काय हे नेमकं… तर नुकतीच माझ्या पाहण्यात आलेली भन्नाट अशी,एक सिरीज… हो पण ही आहे कोरियन… आणि अर्थातच ती चार भाषांमध्ये आहे…. आणि आपल्या सगळ्यांना समजेल अशी हिंदी मध्ये आहे… पण पाहायची कुठे??? तर त्या साठी सगळा ब्लॉग वाचवा लागेल आणि हो, लिंक पण देणार आहे….

कोरियन ड्रामा : Romance

When the weather is nice

Episodes : 16

Audio : Hindi with English subtitles

Actor : Seo Kang Joon

Actress : Park Min Young

इंग्रजीमधून भाषांतर केले-व्हेन द वेदर इज फाईन ही 2020 ची दक्षिण कोरियन टेलिव्हिजन मालिका आहे ज्यात पार्क मिन-यंग आणि सीओ कांग-जून अभिनीत आहेत. ली डू-वू यांच्या 2018 च्या त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित, ती 24 फेब्रुवारी ते 21 एप्रिल 2020 या कालावधीत JTBC वर प्रसारित झाली.

मनाला सहज भावणारी,हिरोच्या सुंदर डोळ्यात हरवून जायला लावणारी… आणि हो,हिरॉईनला हळू हळू बोलत करणारी… तिच्या त्या मादक हसण्यावर भाळायला लावणारी….प्रेम फक्त एकदाच होत,आणि हो ते मनातल्या एका कोपऱ्यात कायम असते… प्रेम हे प्रेम असते,ते मिळवण्यापेक्षा जगण्यात तथ्य असते..

युन्सो म्हणजे कथेचा नायक,अगदी साधा आणि शांत स्वभावाचा… मनातील गोष्टी अगदी मनातच ठेवणारा.. छानसं एक बुक स्टोर चालवणारा,आणि आई च्या स्केटिंग च्या बिजनेस मध्ये मदत करणारा… अर्थात प्रत्येक नवीन भागामध्ये एक तरी ट्विस्ट आहेच… प्रत्येकाला जगावी वाटणारी आणि हो,जुन्या विश्वामध्ये जायला लावणारी ही कथा आहे… शाळेतील दिवस आणि त्या दिवसामधील प्रेम… पहिलं प्रेम कधी विसरत नाही… त्याच्या आठवणीच एवढ्या मजेशीर आणि सुखवणाऱ्या असतात की पुन्हा ते दिवस जगावेत ,याचा मोह झाल्याशिवाय राहत नाही… तर कथेचा नायक हा,बंजारी समाजाचा असल्यामुळे तो डोंगराळ भागात राहणं पसंद करत असतो…. त्याचे वडील आणि काकांसोबत तो रहात असतो…

पण अचानक त्याचे वडील काही कारणाने निघून जातात,अगदी कायमचे… आणि काका ही बाहेर शहरात नौकेवर जातात… तेव्हा मात्र त्याला त्याचा दुसऱ्या एका जोडप्याने घरी घेऊन आलेले असतात… आणि त्याचा अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे संभाळ करतात..

पण त्याला पहिल्यापासून मनावर हेच कोरले गेलेले असते,की आयुष्य हे एकट्यानेच जगायचं असते.. सगळं मनातच ठेवायचं… आपलं मन दुसऱ्याच्या हातात कशाला द्यायचं… मन दुसऱ्या ला दिलं, की त्याला तोडण्याचा अधिकार पण त्याला रितसर मिळून जातो… म्हणजे तो अगदी पहिल्यापासून शांत आणि अगदी मनातील न बोलणाराच राहतो… स्वतःसोबत,पुस्तकांच्या विश्वात रमणारा….पुस्तक हेच त्याच विश्व होऊन जातो….

मोंक हे वाँन…. म्हणजे कथेची अतिशय सुंदर अशी हसरी नायिका… गावी येते… तेव्हा तिला पाहून पुन्हा जुन्या शाळेतील दिवसामध्ये रमायला लावणारी कथा चालू होते….

कथा दोन्ही बाजूनी चालू असते…. एक नायक असतो,जो तिला पहिल्यांदा शाळेत पाहिल्यापासून तो तिच्यावर अगदी निस्वार्थी पणे प्रेम करत असतो.. याची जाणीव देखील नायिकेला नसते…. तर दुसरीकडे…हिरो.. युन्सो तिच्या क्लास मध्ये आहे की नाही.. हे देखील तिला माहीत नसते…. ती आणि तिच्या मैत्रिणी सोबत खुश असते….

मैत्रीण म्हणलं की सिक्रेट आलेच…. असंच एक हे वाँन चे चुकीचं सिक्रेट… म्हणजे तिच्या वडिलांना तिच्या आईने च मारलेले असते…. हे ती जवळच्या मैत्रिणीला सांगते… आणि सगळं तीच शालेय जीवन उदवस्त होऊन जाते… सगळ्या बाजूनी तिला मर्डर ची मुलगी म्हणून ओळखले जाते… खूप मोठ्या प्रमाणात त्रास दिला जातो…. तेव्हा मात्र तिला असच आगाऊ आणि हुशार मुलाने मदत करतो आणि हो ,तो ही तिच्यावर खूप मनापासून प्रेम करतो… आणि तिला सगळ्यातून बाहेर पडायला मदत करतो… अर्थात,त्यावेळी पण तिला तो फक्त मित्रच वाटत असतो… आणि नंतरही…..

मागच्या दिवसानंतर.. पुन्हा ती गावी आलेली असते…. विंटर चालू असतो आणि ती स्प्रिंग येईपर्यन्त गावीच राहणार असते…. त्यावेळी ती पुन्हा तिच्या सगळ्या भावना विसरलेली असते… हसणं, रडणं… अगदी सगळं….. त्याचवेळी गेट टू गेदर.. अगदी त्यांच्या क्लास च्या… जेमतेम सात-आठ जण असतील तेव्हा…. भेटतात… आणि युन्सो ला विचारले जाते की शाळेत तुझं क्रश कोण होते … तेव्हा तो अगदी घाबरत आणि घाईतच हे वाँन चे नाव घेतो आणि… तिथून सुरवात होते … त्यांच्या अबोल नात्याची…..

युन्सो कधीच तिला बोलून दाखवत,नाही… पण तिच्यावर असलेले प्रेम तो प्रत्येक वेळी त्याच्या वागण्यातून दिसत असते…. बुक क्लब ची मीटिंग असो,किंवा सेउल ला जाणं असो…. सगळ्या गोष्टी अगदी ती सोबत करत असतात…

त्याचवेळी.. खूप सारे घटक सोबत होत असतात… तिच्या आईच लव मॅरेज असताना पण त्यांना मारलं जाणं.. अर्थात तो ट्विस्ट आहे… तिच्या मावशीने मारलेले असते पण शिक्षा तिची आई भोगतो…

खूप सारे ट्विस्ट ने मालिका भरलेली आहे… तिच्या मैत्रिणीला युन्सो आवडत असतो… आणि युन्सो ला हे वाँन… त्यामुळे बिघडलेली मैत्री….

तिच्या मावशीला सुंदर आयुष्य जगायचं असते पण बहिनीच्या नवऱ्याला म्हणजे चुकून मारल्यामुळे आणि त्याचा सगळा गुन्हा बहिणीने स्वतःवर घेतलेल्या अपराधीपणा च्या भावनेने तीळ तीच आयुष्य नीट जगायचं राहून गेलं आणि हक्काचं प्रेम ही गमावलं….पण एक मोठी लेखिका मात्र झाली… आणि तिच्या शेवटच्या नोव्हेल मध्ये तिने हे वाँन च्या आई-वडिलांचं सत्य तिने लिहून काढलं आहे… आणि अर्थातच या सत्याचा परिणाम.. हे वाँन आणि युन्सो च्या नात्यावर झालेला आहे..

हे वाँन युन्सो सोबत बुकशॉप मध्ये काम करत असते.. तेव्हा त्याच्यासोबत राहून राहून त्याच्या प्रेमात पडते आणि त्याच प्रेम ही ओळखून जाते….

सगळ्यांच्या आता पर्यंतच्या स्टुडंट चा रयुनिअन असतो,तेव्हा हे वाँन युन्सो ला प्रपोज करते… पण युन्सो काहीच रिऍक्ट होत नाही… पण हे वाँन त्याच्यावर असणार प्रेम मात्र काही केल्या कमी होत नाही…

मग मात्र युन्सो ही स्वतःला थांबवल्याशिवाय राहवत नाही….कारण तिच्या स्वप्नातील आयरीन म्हणजेच हे वाँन असते… आणि तो रोज गुड नाईट क्लब चा ब्लॉग लिहीत असतो,तेव्हा तो त्याच्या बाजने तिच्यावर असणार प्रेम लिहीत असतो.. त्यांचं प्रेम आणि उमलत जाणार नात अगदी,अफलातून साकारले आहे.. त्यांचे किस म्हणजे रोमँटिक पणाचे जणू वास्तव आहेत…

आणि हो हे वाँन चे cello वाजवणं… अगदी अप्रतिम…..

सोळा भागांची मालिका आहे,प्रत्येक भागांमध्ये ट्विस्ट आहे..acting म्हणाल तर अगदी जबराट आहे…

या उन्हाळ्यात जर ,खरच असे वाटत असेल की वातावरण बदललं पाहिजे,तर नक्की ही सिरीज पाहा..

युन्सो आणि हे वाँन जवळ येत असतानाच,स्प्रिंग ची चाहूल लागते.. आणि हे वाँन ची माघारी जाण्याची वेळ येते… आणि तिथेच त्यांची स्टोरी संपेल की काय असे वाटत असतानाच…. स्प्रिंग आठवणी मध्ये… स्वतःला शोधण्यात निघून जातो…आणि पुन्हा विंटर चालू होणार च असतो….. तेव्हा भेटायचं नाही म्हणून ठरवून आलेली हे वाँन ,युन्सो ला घट्ट मिठी मारल्याशिवाय राहत नाही….

आणि युन्सो तिला किती दिवस विचारल्या शिवाय राहवत नाही…..

Conclusion:

  • अतिशय भावणारी आणि मनाला गुंतवून ठेवणारी कथानक आहे.
  • युन्सो आणि हे वाँन ओळखीचे आपल्यातीलच एक भाग असल्यासारखे वाटतात,जणू आपलंच आयुष्य आहे,अस भासवून जाते.
  • प्रेम हे निस्वार्थी असते,करणाऱ्या ने फक्त करायचे असते.मग मन तुटेल किंवा खुश राहील याची जबाबदारी ही प्रेम करणाऱ्याचीच असते.
  • अप्रतिम Acting आहे.

Watch Full Series ⬇️⬇️⬇️

https://www.hotstar.com/in/shows/when-the-weather-is-nice/1260108556?filters=content_type%3Dshow_clips: Review: “When the weather Is Nice”☺️
Share to ....
5 1 vote
Article Rating

Leave a Reply

9 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
KK
KK
8 days ago

खूप छान।

roksanaamelia
7 days ago

I love Korean series ….

roksanaamelia
7 days ago

I will. Thank YOUuuuu for this recommendation ♥️♥️♥️♥️

roksanaamelia
7 days ago

I’ll tell you what I may like about the series ….

Monica Raj
1 day ago

A very pleasant read👍

error: Content is protected !!
9
0
Would love your thoughts, please comment.x
()
x
%d bloggers like this: