निरोगी आणि तुकतुकीत त्वचेचे रहस्य:

सुंदर आणि अगदी निरोगी त्वचा कोणाला आवडत नाही???सगळयांना असं वाटत की माझा चेहरा,सुंदर आणि अगदी कोणतेही डाग नसलेला पाहिजे… अगदी पिंपल्स तर लांब पण रंगाचा टोन पण एकसारखा पाहिजे.. डोळ्यांखाली काळेपणा नको आणि हो,ओठाच्या बाजूला आणि हुनवटीवर तर अजिबात काळे पॅच नकोच…

सुंदर त्वचेसाठी करायचे काय???

  • भरपूर पाणी प्या :हे काय,पाणी प्या.. हे सगळ्यांना माहीत आहे त्यात वेगळं काय आहे. तर आहे. पाण्यामध्ये खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात खनिजे असतात. पाणी जास्त प्यायल्यामुळे शरीरातील सगळे विषारी घटक युरिन मधून निघून जातात.आणि त्यामुळे टॉक्सिन्स निघाल्यामुळे नितळ चेहरा होयला मदत होते. पण निदान दोन ते तीन लिटर पाणी प्यायला सुरवात केल्यानंतर दोन दिवसानंतर थोडा थोडा फरक जाणवायला लागेल.नियमितपणे केल्यास नक्कीच नितळ त्वचा होऊन जाते.
    • त्वचेसाठी व्हिटॅमिनचे फायदे: सगळ्याच प्रकारचे व्हिटॅमिनचे त्वचेसाठी अनन्य साधारण महत्व आहे,तरीदेखील आपण थोडं सविस्तरपणे पाहुयात.सूर्याच्या हानिकारक किरणांपासून व्हिटॅमिन सी आपल्या त्वचेचे संरक्षण करते. शरीराला पुरेशा प्रमाणात या जीवनसत्त्वाचा पुरवठा झाल्यास वय वाढल्यानंतरही आपली त्वचा सतेज दिसते. आंबट फळे आणि भाज्यांचा आहारामध्ये समावेश करावा. उदाहरणार्थ चेरी, ब्रोकोली, बेरी आणि हिरव्या पालेभाज्यांमध्ये सर्वाधिक ‘व्हिटॅमिन सी’ चा समावेश असतो. निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी नियमित या फळ-भाज्यांचे सेवन करावे.
  • व्हिटॅमिन ई हे एक अँटी ऑक्सिडेंट आहे, जे सूर्याच्या किरणांपासून आपल्या त्वचेचं नुकसान होण्यापासून बचाव करते. आपली त्वचा निरोगी राहण्यासाठी व्हिटॅमिन ई युक्त फेस पॅक लावा. याव्यतिरिक्त अ‍ॅव्होकाडो आणि सॅल्मन यासारख्या व्हिटॅमिन ई युक्त पदार्थांचा आपल्या आहारामध्ये समावेश करावा.
  • व्हिटॅमिन डी आपल्या आरोग्याप्रमाणेच त्वचेसाठीही फायदेशीर आहे. कोवळ्या उन्हाद्वारे आपल्याला व्हिटॅमिन डी मिळते. शरीराला पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन डीचा पुरवठा झाल्यास त्वचेशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत. पण कडक ऊन अंगावर घेण्याची चूक करू नका, यामुळे त्वचा काळवंडण्याची शक्यता अधिक आहे. सॅल्मन आणि टुना मासे यापासून तुम्हाला व्हिटॅमिन डी मिळेल.
  • एखादी दुखापत झाल्यानंतर रक्त गोठण्यास ‘व्हिटॅमिन के’मुळे मदत मिळते. स्ट्रेच मार्क यासारख्या समस्या व्हिटॅमिन के मुळे कमी होण्यास मदत मिळते. हिरव्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिन के अधिक प्रमाणात असते. ब्रोकली, कोबी, पालक, डाळिंब, कीवी, गाजर इत्यादी फळ आणि भाज्यांचा आपल्या आहारामध्ये समावेश करावा.
  • बीटा कॅरोटीन त्वचेसाठी पोषक आहे. या अँटी ऑक्सिडेंटमुळे आपल्या त्वचेचं सूर्याच्या किरणांपासून संरक्षण होते. बीटा कॅरोटीनचा सर्वात चांगला स्त्रोत म्हणजे गाजर. याव्यतिरिक्त तुम्ही आहारामध्ये पालेभाज्या आणि पाणीदार फळांचा समावेश करावा. यामुळे त्वचा सैल पडत नाही आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक देखील येते.
  • सेलेनियम हे आरोग्यासाठी आवश्यक असलेले खनिज आहे. यामुळे वृद्धत्वाची लक्षणे कमी होतात. ऑइस्टर, ब्राझील नट, सूर्यफुलाची बिया, आणि मशरूममध्ये सेलेनियम भरपूर प्रमाणात असते. यामुळे आपल्या त्वचा निरोगी राहण्यास मदत मिळते. निरोगी आणि सतेज त्वचेसाठी या व्हिटॅमिन आणि खनिजांचा आपल्या आहारामध्ये समावेश करणं आवश्यक आहे. यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या देखील येणार नाहीत.

एवढे सगळे व्हिटॅमिन आहेत आणि त्याचे एवढे सगळे फायदे जर मिळत असतील तर ,रोजच्या आहारात त्यांचा समावेश करण तेवढंच महत्वाचे आहे,हो पण ते ही अगदी योग्य प्रमाणातच घेण्याचे आहे,अतिप्रमाणात काहीही घेण्याचे नाही.

  • नेमकं काय खावं :

1.पपई पपईमध्ये असलेलं कॅरोटिन डोळ्यांसाठी खूप फायदेशीर ठरतं. डोळ्यांचं तेज वाढविण्यासाठी पपई खावी. जे लोक नियमित पपई खातात, त्यांना कँसर होण्याची भीती कमी असते. पपई कॅल्शियम पण असतं, त्यामुळं शरीराची हाडं मजबूत होतात आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो. काही परिस्थितीत मात्र पपई खावू नये. उदाहरणार्थ गर्भवती महिलांनी पपई खावू नये. पपईमध्ये व्हिटॅमिन सी सोबतच व्हिटॅमिन ए, ई आणि अँटीऑक्सिडंट पण असतात. त्यामुळं त्वचेवरील डाग दूर होतात आणि पोटाचे आजारही पपई दूर करते.

2. ब्रोकली – ब्रोकलीमध्ये व्हिटॅमिन सी आणि ई अधिक प्रमाणात असतं. तसंच अँटीऑक्सिडंट पण असतात. त्वचेचा रंग उजळण्यासाठी ते मदत करते. 

3. गाजर – गाजर खाणं अतिशय फायद्याचं आहे. यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, सी, कॅल्शियम आणि पॅक्टिन फायबर असतात. हे कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढू देत नाही. गाजरात व्हिटॅमिन सी आणि कॅरोटिनही असतं. त्यामुळं त्वचा आणि केसांसाठी हे बेस्ट आहे. सुंदर त्वचा मिळविण्यासाठी दररोज गाजरचा ज्यूस प्यावा. 

4. सोयाबीन – सोयाबीनच्या प्रत्येक उत्पादनाता व्हिटॅमिन सी आणि जस्त (झिंक) असतं. सोयापासून बनलेले पदार्थ खाल्ल्यानं पुरळ आणि त्वचेच्या समस्यांपासून आराम मिळतो. आपण आपल्या डायटमध्ये सोयाबीनचा समावेश करून आपली डल स्कीन चमकदार बनवू शकता.

5. कीवी– कीवीमध्ये व्हिटॅमिन ए, बी12, आयरन, फायबरसोबत भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं. कीवी दररोज खाल्लायनं चेहऱ्याचा रंग बदलायला लागतो. स्किन हेल्दी होते. जर चेहऱ्यावर डाग असतील तर त्यावर कीवी बारीक करून लावल्यास डाग जातात.

6. बीट – बीटमध्ये व्हिटॅमिन, सोडियम, पोटॅशियम, फॉस्फोरस, क्लोरीन, आयोडिन, आयरन इत्यादी सत्व असतात. याच्या सेवनानं त्वचेचे छिद्र खुले होतात आणि ब्लड सर्कुलेशन वाढतं. रंग उजळायला लागतो. त्वचेच्या समस्यांपासून वाचण्यासाठी बीटचा रस दररोज प्यावा आणि याचा फेस पॅकही लावावा.

7. पालक – 100 ग्राम पालकातून 26 किलो कॅलरी ऊर्जा, 2% प्रोटीन, 2.9% कार्बोहार्डेट, 92% आर्द्रता, 0 .7 % चरबी, 0 .6 % फायबर, 0 .7 % खनिज असतं. पालकात कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन ए, बी, सी इत्यादी भरपूर प्रमाणात असतात. म्हणून पाल खाल्ल्यानं त्वचा अधिक खुलते. 

8. स्ट्रॉबेरी – स्ट्रॉबेरीत भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. म्हणून त्याच्या नियमित सेवनानं वाढत्या वयाचा त्वचेवरील प्रभाव कमी होऊ शकतो. त्यात व्हिटॅमिन सी पण भरपूर प्रमाणात असतात. स्ट्रॉबेरी दररोज खाल्ल्यानं चेहऱ्याचा रंग गुलाबी होतो.

9. हिरव्या पालेभाज्या – हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन, पोषक तत्व आणि मिनरल्स खूप असतात. त्यामुळं त्वचा उजळते. 

10. शिमला मिर्ची – आधुनिक शोधांनुसार शिमला मिर्चीत बीटा कॅरोटीन, ल्युटीन आणि जिएक्सेन्थिन आणि व्हिटॅमिन सी सारखे महत्त्वपूर्ण रसायन असतात. शिमला मिर्ची खाल्लायनं शरीर बीटा कॅरोटीनचं रेटिनॉलमध्ये रुपांतर करतं. रेटिनॉल खरं तर व्हिटॅमिन ‘ए’चं रुप आहे. या सर्व रसायनांच्या मदतीनं हृदयाशी संबंधीत आजार, ऑस्टियोपोरोसिस, आर्थरायटिस, ब्रॉकायटिस, अस्थमा सारख्या समस्यांमध्ये फायदा मिळतो. यामुळं त्वचेचा रंगही उजळतो. 

11. टोमॅटो – टोमॅटोमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन तत्व असतात. कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी असतं. याशिवाय टोमॅटो खाण्याचे अनेक फायदे आहेत. टोमॅटोमध्ये लायकोपिन असतं. लायकोपिन स्किनसाठी उत्तम असतं. दररोज टोमॅटो खाल्ल्यानं वजन कमी होतं आणि कँसरपासून बचाव होतो.

12. ग्रीन टी – ग्रीन टी केमेलिया सायनेन्सिस नावाच्या झाडापासून बनवली जाते. याला कमी किण्वन पासून तयार केलं जातं. म्हणून हा चहा शरीरासाठी फायदेशीर ठरतो. यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. हे सनबर्नला ठीक करतं. त्वचेवरील डाग दूर करत त्वचा कोमल आणि हेल्दी बनवते. 

उन्हाळ्यामुळे टॅन झालेल्या त्वचेच्या निखरण्यासाठी लागणाऱ्या होम रिमेडिज लवकर पाहुयात... 

Fact of Weight Loss (सुधारित जीवनशैली)

Daily writing prompt
Who would you like to talk to soon?
Share to ....
5 1 vote
Article Rating

Leave a Reply

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x
%d bloggers like this: