मराठी कथा-कादंबरी-लेख Blogs- Entertainment- Travel- Food

"वाचत राहा,जगण्याला प्रेरणा मिळण्यासाठी📖 Stories| Reviews| Entertainment | Greetings | Travel | Food

सण-समारंभ संपूर्ण माहिती

वटपौर्णिमेची संपूर्ण माहिती| पूजाविधी|कथा|स्तोत्र|उखाणे|रांगोळी|शुभेच्छा

हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.

Content:
1.वटसावित्री व्रताची तिथी
2.वटसावित्रीच्या पूजा साहित्य
3.वटसावित्रीच्या पूजा विधी
4.वटसावित्रीच्या पूजा का करावी??
5.वट सावित्रीची प्रार्थना.
6.वट सावित्री ची कथा.
7.वटपोर्णिमेचे उखाणे
8.वटपौर्णिमेची रांगोळी
9.वटपौर्णिमेच्या शुभेच्छा
Check shorts & Subscribe to Channel

वट सावित्री व्रताची तिथी

वट सावित्री व्रत यावेळी 3 जून 2023 रोजी ज्येष्ठ पौर्णिमेला पाळले जाईल. गुजरात आणि महाराष्ट्रात ज्येष्ठ पौर्णिमेला वट पौर्णिमा व्रत पाळले जाते, याला येथे वट सावित्री व्रत असेही म्हणतात. देशाच्या इतर सर्व भागात वट सावित्री वट जेष्ठ महिन्याच्या अमावास्येला केली जाते. पंचांगानुसार 3 जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमेला वट सावित्रीचे व्रत पाळले जाणार आहे. सकाळी 11 वाजून 17 मिनीटाने पैर्णिमा प्रारंभ होईल व दुसऱ्या दिवशी 4 जूनला सकाळी 9.11 वाजता पौर्णिमा समाप्ती होईल. या काळात वड पूजा करता येईल.

# वटपौर्णिमा व्रत पूजा साहित्य 

हळद- कुंकू, सावित्री आणि सत्यवानाची मूर्ती, धूप, दीप, उदबत्ती, निरांजन, पाच प्रकारची फळं, फुले, दिवा ठेवण्यासाठी रोवळी, वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा मोठा धागा, पाणी भरलेला लहान कलश, पंचामृत, हिरव्या बांगड्या.

वटपौर्णिमेचा पूजा विधी

सकाळची नित्यकर्म उरकल्यानंतर सुवासिंनीनी सौभाग्यलंकार परिधान करून देवाची प्रार्थना, तुळशी पूजन करून वडाच्या झाडाजवळ एकत्र व्हावं.

वटसावित्री व्रताचा संकल्प करावा.

षोडशोपचार पद्धतीने वडाची पूजा करावी.

बांबूच्या दोन टोपल्या घ्या, एका टोपल्यात सात प्रकारचे धान्य कापडाने झाकून ठेवा.

माता सावित्रीची मूर्ती दुसऱ्या टोपलीत ठेवावी आणि धूप, दिवा, अक्षत, कुमकुम, माऊली इत्यादी पूजेचे साहित्यही ठेवावे.

माता सावित्रीची पूजा केल्यानंतर वटवृक्षाला सात प्रदक्षिणा घालताना वटवृक्षाला माऊलीचा धागा बांधावा.

पंचामृत नेवैद्य म्हणून दाखवा. 

यानंतर ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला श्रद्धेनुसार दान-दक्षिणा द्यावी.
पूजेनंतर महिलां एकमेकींना आंब्याचे वाण देतात.

या दिवशी विवाहित महिलांनी वटवृक्षाची पूजा करून कथा ऐकावी.

सावित्री आणि सत्यवानाच्या नावाचा जप करावा.

Subscribe to Channel

# वट सावित्री ची पूजा का करावी??

निसर्गतःच दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी. एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही.

सर्व पवित्र वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया `मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे, धनधान्य व मुले-नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे’, अशी प्रार्थना करतात.

#वट सावित्रीची प्रार्थना:

सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी|

तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात्|

अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते |

अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि |

वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन:।

वटाग्रे तु शिवो देव: सावित्री वटसंश्रिता ।।

अशीही प्रार्थना केली जाते.

# वट सावित्री ची कथा:

या व्रतामागे एक पारंपरिक सावित्री आणि सत्यवान यांची पौराणिक आख्यायिका सांगितली जाते. अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली.

सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला.

पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला. व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली.

सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासूसासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरतात.

# उखाणे:

वटपौर्णिमेला, फणसाची असते खूप मागणी,
__ रावांची ७ जन्मासाठी, बनेल मी साजणी.

सुहासिनींचा मेळा जमला, वटपौर्णिमेसाठी,
_ रावांचे नाव घेऊन, निघाले मी वडाच्या पूजेसाठी.

वटपौर्णिमा आहे, सुहासिनींसाठी मोठा सण,
_ रावांनी जिंकले, पहिल्या भेटीतच माझे मन.


आजच्या दिवशी, वडाची पूजा करण्याची आहे प्रथा,
__ रावांसोबत ऐकेन मी, सावित्री आणि सत्यवानाची कथा.

झाडे लावा, झाडे तोडून नका देऊ निसर्गाला त्रास,
_ रावांचे नाव घेते, आज वटपौर्णिमेसाठी खास.

सण आहे आज वटपौर्णिमेचा,
_ रावांसोबत असाच, संसार राहूदे सुखाचा.

आज वटपौर्णिमा म्हणून, सात फेरे मारते मी वडाला.
सातही जन्मी मिळूदे _ रावांसारखे पती, असे मागणे मागते देवाला.

वडाला घालते फेरे, आणि देवाला करते नवस,
_ रावांचे नाव घेते, आज आहे वटपौर्णिमेचा दिवस.

वडाची फांदी लावून, करते मी वृक्षारोपण,
_ रावांच्या म्हणण्याप्रमाणे करेन, मी परिवाराचे संगोपन.

वडाच्या झाडाला फेऱ्या घालण्यासाठी, जमल्या साऱ्या बायका,
_ रावांचे नाव घेते, सर्वजण ऐका.

वडाची पूजा करून, गुंडाळते सफेद धागा,
_ रावांच्या जीवनात, सदैव असुदे माझ्यासाठीच जागा.

सत्यवानाचे प्राण वाचवून, वाढविली सावित्रीने सर्वांची शान,
_ रावांचे नाव घेताना, मला फार वाटतो अभिमान.

# वट पौर्णिमेच्या निवडक रांगोळी:

# वट पौर्णिमेच्या निवडक शुभेच्छा:

अशाच सगळ्या सणांची आणि समारंभाची माहिती,घेण्यासाठी नक्की Subscribe करा..विविध माहितीचा आणि त्याच सोबत कथांचा नक्कीच मनमुराद आनंद घ्या..
Share to ....
0 0 votes
Article Rating

Leave a Reply

13 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Bricerandy
3 months ago

Hey I have just followed your blog please follow mine
Spread the message for me about my website and it’s services to whoever needs them.

Bricerandy
3 months ago

Follow on bnlit.wordpress.com

Priti
3 months ago

Vat Savitei brat is famous in Maharastra! Well shared 👍

Priti
3 months ago

☺️

Mr. Ketan Suryawanshi
3 months ago

Me Marathi…!!!

Priti
3 months ago

Beautiful

Priti
3 months ago

☺️

Mr. Ketan Suryawanshi
3 months ago

खुपच छान माहिती आहे…

error: Content is protected !!
13
0
Would love your thoughts, please comment.x
()
x
%d bloggers like this: