गव्हाच्या पिठाच्या पौष्टिक रेसिपी : गूळ पापडी
गव्हाच्या पिठाच्या पौष्टिक रेसिपी # १ : गूळ पापडी

साहित्य :
२ tbsp बदाम
२ tbsp काजू
२ tbsp पिस्ता
१ tbsp खोबर्याचा खिस
१/२ tsp विलायची पावडर
३/४ कप गूळ
१/२ कप साजूक तूप
१ कप गव्हाचे पीठ
कृती :
- प्रथम मिक्सर मधून बदाम,काजू आणि पिस्ताची बारीक पावडर करून घेऊयात.
- तसेच विलायची ची पण पावडर करून घेऊयात आणि त्याचबरोबर खोबर्याचा कीस पण तयार ठेवूयात.
- त्यांनतर आपल्याला गूळ पापडी करायची आहे म्हणजे त्यांच्या छान वड्या पाडायच्या आहेत त्यासाठी तुमच्याजवळ असेल ते पसरट भांडे किवा एखादे ताट घ्या आणि त्याला तूप लावा कींवा तुमच्याजवळ असेल तर बटर पेपर लावा,नसला तरी चालेल ,तूप लावले तरी चालेन.
- आता गॅस चालू करा आणि त्यावर एका पॅन मध्ये अगोदर तूप टाका आणि त्यानंतर त्या मध्ये १ कप गव्हाचे पीठ टाका आणि मंद आचेवर छान भाजून घ्या,जास्त फ्लेम मोठी करू नका ,अगदी सावकाश भाजत रहा,त्याचा छान सुगंध सुटत नाही तो पर्यन्त,साधारण १५ मिनिट लागतात.
- त्याला तूप सुटल्यासारखे वाटू लागेल म्हणजे frothy वाटेल तेव्हा त्यामध्ये काजू,बदाम आणि पिस्ताची बारीक केलेली पावडर टाका.तुमच्याकडे जे काही सुका मेवा असेल तो टाकला तरी चालेल.
- त्यानंतर त्या मध्ये १tbsp खोबर्याचा कीस घालून चांगलं मिश्रण हलवा .
- काळजी घ्या की ते करपले तर अजिबात नाही पाहिजे.
- नंतर गॅस बंद करा आणि मिश्रण थोडे थंड करायला ठेवा.
- खूप थंड नाही,कारण त्यामध्ये आपण बारीक केलेला गूळ घालणार आहोत आणि तो गॅसवर न ठेवता आपल्याला मिक्स करून त्याच्या वड्या पाडायच्या आहेत .
- म्हणून गॅस वरुण खाली ठेवले की त्यामध्ये बारीक केलेला गूळ घाला आणि विलायचीची पावडर पण त्यामध्ये घालून घ्या.
- मिश्रण पूर्ण एकरूप झाले पाहिजे एवढे ते मिक्स करा ,पूर्ण ते एकजीव झाल्यासारखे वाटत असेल आणि थोडे गरम ही लागत असेल.
- त्याचवेळी त्याला तूप लावल्याला भांड्यामध्ये काढून घ्या आणि त्याला पसरवा अगदी चांगल्या रीतीने आणि गरम असतानाच तुम्हाला पाहिजे त्या शेप मध्ये कट मारून घ्या .
- म्हणजे थंड झाल्यावर त्याच्या छान वड्या पडतील.
- खाताना कोणाला ही वाटणार नाही ही वडी गव्हाच्या पिठाची आहे म्हणून अगदी शेंगदाण्याच्या चक्की सारखी खुसखुशीत आणि चवीला पण एकदमच भारी लागते.
- नक्की बनवून पहा आणि कशी वाटली रेसिपी, ते कमेन्ट करून सांगा.
Hey please subscribe my blog support view ,likes thanks…!!!
Yes…. Sure…
Can you write something about my blog or site… In your blogging topic.. As like a Guest Post..
Think about it…🙏🙏
subscribe emy blog…please
👍👍